Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सणासुदीच्या काळात लॉजिस्टिक क्षेत्रात लक्षणीय वाढ अपेक्षित: फेडएक्स

 सणासुदीच्या काळात लॉजिस्टिक क्षेत्रात लक्षणीय वाढ अपेक्षित: फेडएक्स

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२४: दिवाळी हा भारतात साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे. या सणासुदीच्या काळात लॉजिस्टिक क्षेत्राच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, एफएमसीजी कंपन्या आणि किरकोळ विक्रेते ग्राहकांच्या खरेदीमध्ये मोठ्या वाढीची अपेक्षा करतात ज्यामुळे लॉजिस्टिक क्रियाकलापांमध्ये चांगली वाढ होईल.




फेडएक्सचे मध्य पूर्व, भारतीय उपखंड और आफ्रिकेतीलएयर नेटवर्कचे विपणन उपाध्यक्ष नितीन नवनीत तटीवाला यांनी सांगितले की, "आम्हाला सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. ई-कॉमर्स सेगमेंटने लॉजिस्टिकची मागणी १०% पेक्षा जास्त वाढवली आहे. भारतातील लॉजिस्टिक क्षेत्र सणासुदीच्या उच्च मागणीची पूर्तता करण्यासाठी सक्रियपणे विस्तारत आहे आणि नवनवीन उपाययोजना करत आहे. फेडएक्स एआय संचालित लॉजिस्टिक आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टमचा वापर करत आहे आहे ज्यामुळे डिलिव्हरीमध्ये लवचिकता येते आणि ग्राहकांना चांगला अनुभव मिळतो. तसेच हे व्यवसायांना वाढीव मागणी आत्मविश्वासाने हाताळण्यास सक्षम करत आहे."   

भारतातील लॉजिस्टिक उद्योग हा जगातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. एका उपलब्ध डेटानुसार याच्या बाजाराचा आकार २०२५ पर्यंत ३८० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. लोक भेटवस्तू, सजावट, कपडे आणि बरेच काही खरेदी करत असल्याने उत्सवाच्या हंगामात ग्राहकांच्या खर्चात मोठी वाढ होते. परिणामी लॉजिस्टिक कंपन्याकडे ऑर्डर्सचा खच पडलेला असतो ज्या विशिष्ट कालमर्यादेत प्रक्रिया करून पाठवणे आणि वितरित करण्यावर त्यांचा भर असतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.