फेडएक्सद्वारे डिजीथॉन २०२४चे आयोजन
मुंबई, २७ ऑक्टोबर २०२४: फेडएक्स कॉर्पची साहाय्यक कंपनी आणि जगातील अत्यंत मोठी एक्सप्रेस ट्रान्सपोर्ट कंपनी असलेल्या फेडरल एक्सप्रेस कार्पोरेशनने अलीकडेच डिजीथॉन २०२४ या इनोव्हेशन स्पर्धेचे समापन केले. या कार्यक्रमात अधिक लवचिक सप्लाय चेन बनवण्यासाठी क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्सचा उपयोग करण्याबाबत फेडएक्सची वचनबद्धता अधोरेखित झाली.
भारतातील प्रादेशिक कार्यालयांत आयोजित करण्यात आलेल्या डिजीथॉन २०२४ ने फेडएक्स टीमच्या सदस्यांना फेडएक्स लीडरशिप द्वारा प्रस्तुत करण्यात आलेल्या प्रत्यक्ष जीवनातील आव्हानांचे निराकरण करण्यासाठी पाचारण केले. यामध्ये अशा गोष्टींचा उल्लेख होता, ज्या ग्राहकांना जाचक वाटतात. त्या ओळखण्यासाठी आणि त्यांचा आधीच अंदाज बांधण्यासाठी तसेच सेवा विनंत्या ऑटोमेट करण्यासाठी अॅडव्हान्स सेंटिमेंट व टॉपिक मॉडेलिंग टेक्निक, शिपमेंट वितरण ऑप्टीमाइझ करण्यासाठी शिकण्याची प्रणाली मजबूत करण्यासाठी साधन, आणि सप्लाय चेनची क्षमता वाढवण्यासाठी पूर्वानुमान करणारी मॉडेल्स व डिजिटल ट्विन सिस्टम विकसित करणे समाविष्ट होते.
एमईआयएसएचे मार्केटिंग आणि एअर नेटवर्कचे उपाध्यक्ष नितीन नवनीत टाटीवाला म्हणाले, “फेडएक्स`मध्ये, सर्वांसाठी अधिक स्मार्ट सप्लाय चेन बनवण्याच्या आमच्या मिशनमध्ये इनोव्हेशनची महत्त्वाची भूमिका आहे. डिजीथॉन २०२४ सारखे उपक्रम क्रॉस फंक्शनल कोलॅबरेशनला प्रोत्साहन देतात तसेच टीमच्या सदस्यांना असे बदल घडवणारे विचार सादर करण्यास सक्षम बनवतात जे ग्राहकांचा अनुभव आणि संचालनाची परिणामकारकता वाढवतात व लॉजिस्टिक्सच्या भविष्याला आकार देतात.”
ऑगस्टमध्ये सुरू होऊन ऑक्टोबर २०२४ पर्यंत चाललेले डिजीथॉन विविध टप्प्यांमधून पसार झाले, ज्यात मेंटरशिप सत्र आणि प्रोटोटाइप डेव्हलपमेंट सामील आहे. आयआयटी बॉम्बे आणि मद्रास मधील फेडएक्स सेंटर ऑफ एक्सलन्सच्या आयआयटी प्राध्यापकांनी विशेष मार्गदर्शन प्रदान केले. ज्यातून टीम्सना अॅडव्हान्स टेक्निक्स आणि कार्यप्रणालीची माहिती मिळाली. त्या व्यतिरिक्त पीएचडी आणि एमटेक स्कॉलर्स निवडक प्रॉब्लेम स्टेटमेंट्सशी यापुढेही संलग्न राहतील व अशाप्रकारे, शिक्षण क्षेत्र आणि फेडएक्स लीडरशिप यांच्यातील वर्तमान सहयोगाला अधिक बळकटी मिळेल.