*नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा हे कसलेले अभिनेते असलेल्या ‘वनवास’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित*
https://www.instagram.com/reel/DBsj7sgp1uE/?igsh=MWJ5cXF1aHgxZ2Rnbw==
झी स्टुडिओज आणि अनिल शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत 'वनवास' चित्रपटाचा टीझर अलीकडेच प्रदर्शित झाला. 'वनवास' या चित्रपटात नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा हे दोन कसलेले बडे कलावंत नव्या अवतारात दिसतील, जे रक्ताचे नाते पुन्हा परिभाषित करतात!
अनिल शर्मांचा 'वनवास' हा आगामी चित्रपट कुटुंब, सन्मान आणि त्याग या सर्वांचा मनापासून शोध घेणारा असून, हा प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहील. ‘अपने’, ‘गदर: एक प्रेम कथा’ आणि ‘गदर २’ यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांसह झी स्टुडिओ आणि अनिल शर्मा यांनी यशाचा एक अद्भुत फॉर्म्युला निर्माण केला आहे. आणखी एक सिनेमॅटिक चमत्कार घडवून आणत, त्यांनी ‘वनवास’ या त्यांच्या पुढील भव्य सिनेप्रकल्पाची घोषणा दसऱ्याच्या मुहूर्तावर केली होती.
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये, दिग्गज नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा हे ताकदीचे अभिनेते याआधी न दिसलेल्या, अशा अत्यंत वेगळ्या भूमिकेत दिसतात. त्यांच्या ताकदीच्या अदाकारीतून कौटुंबिक बंध परिभाषित होत असताना, त्यातील सच्च्या भावना आणि तीव्रता पडद्यावर व्यक्त होतात. या चित्रपटातील प्रत्येक संवाद हृदयाला भिडतो, कौटुंबिक निष्ठा तसेच प्रेमाच्या आणि कर्तव्याच्या नावाखाली केलेल्या त्यागांची एक नवीन कथा जोडली जाते. अनिल शर्मा आणि झी स्टुडिओ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून निर्माण झालेल्या ‘वनवास’ प्रकल्पाच्या भव्यतेची खात्री जणू या टीझरमधून मिळते.
अनिल शर्मा यांचे उत्कंठा वाढविणारे कथन आणि दिग्गज कलावंत यामुळे ‘वनवास’मधून पारंपरिक नाट्याच्या पलीकडे पोहोचत, कालातीत संकल्पनेतून खोल भावनिक प्रवास सादर होतो. अनिल शर्मा लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट झी स्टुडिओज अंतर्गत जगभरात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना अशा कथा बघण्याचे आमंत्रण देतो, ज्यातील प्रत्येक कांगोऱ्याचे प्रतिध्वनि पिढ्यानपिढ्या उमटत राहतील. ही अजिबात चुकवू नये अशी एक कौटुंबिक गाथा आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सिनेगृहांत दाखल होईल.