Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

झिप इलेक्ट्रिक डिलिव्‍हरी सहयोगींना देणार दिवाळी भेट

 झिप इलेक्ट्रिक डिलिव्‍हरी सहयोगींना देणार दिवाळी भेट


मुंबई, २८ ऑक्टोबर २०२४: झिप इलेक्ट्रिक या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान-सक्षम ईव्‍ही-अॅज-ए-सर्विस प्लॅटफॉर्मने आपली फेस्टिव्‍ह मोहिम 'झिप दिवाळी बोनान्‍झा: भारतभरातील टॉप ३० राइडर्सना मिळणार सोन्‍याची व चांदीची नाणी' लाँच केली आहे, जी २० ऑक्‍टोबर ते २० नोव्‍हेंबर २०२४ पर्यंत राबवण्‍यात येणार आहे. ही मोहिम दिवाळी सण साजरा करण्‍यासोबत गिग कर्मचाऱ्यांचे उत्‍पन्‍न व दीर्घकालीन फायदे वाढवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला फेस्टिव्‍ह रिवॉर्ड उपक्रम आहे. या मोहिमेचा विद्यमान व माजी झिप पायलट्सना सक्षम करण्‍यासोबत विशेष फेस्टिव्‍ह बेनीफिट्स देण्‍याचा मनसुबा आहे, जेथे त्‍यांची अथक मेहनत आणि कंपनीप्रती योगदानांना सन्‍मानित करण्‍यात येईल. 




या मोहिमेचे खास आकर्षण म्‍हणजे पाच समर्पित पायलट्ससाठी १५ लाख रूपये मूल्‍य असलेला एम्‍प्‍लॉयी स्‍टॉक ओनरशीप प्‍लॅन (ईएसओपी) लाँच करत दीर्घकाळापासून सेवा देणाऱ्या झिप पायलट्सना सन्‍मानित करण्‍याप्रती झिप इलेक्ट्रिकची कटिबद्धता होय. या उपक्रमाचा त्‍यांच्‍या सातत्‍यपूर्ण योगदानाला व समर्पिततेला सन्‍मानित करण्‍याचा मनसुबा आहे, तसेच त्‍यांना आर्थिक सुरक्षितता व निवृत्ती फायदे देण्‍यात येतील. ईएसओपी प्‍लॅन गिग कर्मचाऱ्यांना सक्षम करण्‍याप्रती झिप इलेक्ट्रिकच्‍या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे, ज्‍यामधून खात्री मिळते की ते गिग अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये सहभागी असण्‍यासोबत कंपनीच्‍या शाश्‍वत विकासाच्‍या दिशेने प्रवासामधील खरे सहयोगी देखील आहेत. 


झिप इलेक्ट्रिकचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. आकाश गुप्‍ता म्‍हणाले, ''आम्‍ही झिप पायलट्स म्‍हणून संबोधित करणारे डिलिव्‍हरी एक्झिक्‍युटिव्‍ह्ज आमच्‍या कार्यसंचालनांचे प्रमुख आहेत. यंदा दिवाळीला आमची त्‍यांचे ऋण फेडण्‍याची इच्‍छा आहे, ज्‍यामुळे मोठा बदल घडून येईल. त्‍यांच्‍या अथक मेहनतीमुळे आम्‍ही दर महिन्‍याला ६ दशलक्ष हरित, कार्बन-मुक्‍त डिलिव्‍हरीज देऊ शकलो आहोत. झिप दिवाळी बोनान्झासह आम्‍ही त्‍वरित फेस्टिव्‍ह रिवॉर्ड्स देत आहोत, तसेच आमच्‍या समर्पित पायलट्ससाठी ईएसओपी सारखे दीर्घकालीन फायदे सुनिश्चित देखील करत आहोत. त्‍यांची अथक मेहनत व कटिबद्धतेचे आभार मानण्‍याची आमची ही पद्धत आहे. झिप पायलट्सना कंपनीमध्‍ये भागीदार बनवण्‍याचे नेहमी स्‍वप्‍न राहिले आहे आणि आम्‍हाला अखेर ते स्‍वप्‍न सत्‍यात आणण्‍याचा आनंद होत आहे.'' 


सणासुदीचा काळ क्विक-कॉमर्स, ई-कॉमर्स व फूड डिलिव्‍हरीजसाठी पीक कालावधी असतो, जेथे सक्रिय गिग कर्मचारीवर्गाची गरज असते आणि प्रत्‍येक डिलिव्‍हरी सहयोगी अथक मेहनत घेतो. त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना सन्‍मानित करण्‍यासाठी झिप इलेक्ट्रिकने विशेष मोहिम लाँच केली आहे. या मोहिमेचा भाग म्‍हणून टॉप ३० झिप पायलट्सना त्‍यांच्‍या कामगिरीनुसार सोन्‍याची व चांदीची नाणी मिळतील. तसेच, गिग कर्मचारीवर्गाला अधिक सहभागी करून घेण्‍यासाठी झिप ३१ ऑक्‍टोबर रोजी उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याची संधी देत आहे, जेथे विद्यमान व माजी पायलट्सना या स्‍पेशल दिवशी त्‍यांचे उत्‍पन्‍न वाढवण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे. कंपनीने आपल्‍या पायलट्ससाठी रेण्‍ट-टू-ओन फॉर्मेटमध्‍ये झिप इलेक्ट्रिक स्‍कूटर ओनरशीप प्‍लॅन देखील लाँच केला आहे, ज्‍यामुळे ते विना अतिरिक्‍त खर्चामध्‍ये राइड करणाऱ्या स्‍कूटर्सचे मालक होऊ शकतील.


झिप इलेक्ट्रिक भारतातील आघाडीचा तंत्रज्ञान-सक्षम ईव्‍ही-अॅज-ए-सर्विस प्लॅटफॉर्म आहे, जो शाश्‍वत इलेक्ट्रिक गतीशीलता सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून लास्‍ट-माइल लॉजिस्टिक्‍समध्‍ये परिवर्तन घडवून आणत आहे. गिग कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण आणि नाविन्‍यपूर्ण लॉजिस्टिक्‍स सेवांवर लक्ष केंद्रित करत कंपनी गिग अर्थव्‍यवस्‍थेसाठी हरित आणि अधिक सर्वसमावेशक भविष्‍य निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. कंपनीचे सध्‍या २२,००० हून अधिक झिप डिलिव्‍हरी पायलट्स आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.