Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

#SatarkNagrik बना आणि एआय-समर्थित धूर्त घोटाळ्यांपासून स्‍वत:चे संरक्षण करा*

 *यंदा सायबरसुरक्षा जागरूकता महिन्‍यामध्‍ये #SatarkNagrik बना आणि एआय-समर्थित धूर्त घोटाळ्यांपासून स्‍वत:चे संरक्षण करा* 


घोटाळेबाज तंत्रज्ञानासह फसवणूक करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये वाढ करत आहे, पण तुम्‍ही दक्ष राहत त्‍यांच्‍या एक पाऊल पुढे राहू शकता. सायबर सिक्‍युअर भारताला प्रबळ करण्‍याच्‍या प्रयत्‍नांसह व्हिसा ५ उदयास येत असलेले एआय-समर्थित घोटाळे आणि स्‍मार्ट टिप्‍स निदर्शनास आणत आहे, ज्‍यामुळे तुमची घोटाळेबाजांकडून फसवणूक न होण्‍याची खात्री मिळू शकते.   


१. बनावटी उत्‍पादनांची फॅन्‍टॅसी: एआयमुळे घोटाळेबाज विश्‍वासार्ह बनावटी वेबसाइट्स डिझाइन करण्‍यामध्‍ये सक्षम झाले आहेत, ज्‍या वैयक्तिक व आर्थिक डेटाची चोरी करू शकतात, ग्राहकांना अस्तित्त्‍वात नसलेल्‍या आकर्षक ऑफर्सबाबत भुरळ घालू शकतात. नेहमी विश्‍वसनीय वेबसाइट्सवर खरेदी करा आणि टोकनाइज्‍ड कार्डस् सारख्‍या सुरक्षित डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर करा, ज्‍या तुमच्‍या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करतात आणि तक्रार निवारणाची खात्री देतात. 


२. डीपफेक व्हिडिओ कॉल्‍स: एआय निर्मित व्हिडिओ कॉल्‍ससह फसवणूक करणारे परिचित किंवा अधिकारी म्‍हणून वापरकर्त्‍यांना मोठ्या प्रमाणात पेमेंट्स करण्‍यास सांगू शकतात. ते ३ सेकंदांपेक्षा कमी वेळेचा क्‍लोन वॉईस देखील तयार करू शकतात . अशा कॉल्‍सच्‍या खोट्या आश्‍वासनामुळे घाबरून न जाणे महत्त्वाचे आहे. त्‍वरित कॉल डिस्‍कनेक्‍ट करा आणि इतर विश्‍वसनीय चॅनेल्‍सच्‍या माध्‍यमातनू विनंती सत्‍यापित करा. 


३. खोट्या कागदपत्रांसह फसवणूक: एआय टूल्‍स बँक स्‍टेटमेंट्स व कॉर्पोरेट रेकॉर्डस् सारखी खोटी कागदपत्रे तयार करू शकतात. अशी खरी वाटणारी कागदपत्रे असत्‍यापित स्रोतांकडून असतील तर त्‍याबाबत दिशाभूल होऊ नका. कोणतीही कृती करण्‍यापूर्वी संबंधित अधिकारी किंवा तुमच्‍या बँकेसह त्‍या कागदपत्रांचे सत्‍यापन करा. 


४. सिन्‍थेटिक आयडेण्टिटी फ्रॉड: एआय कृत्रिम ओळख निर्माण करण्‍यासाठी ख-या व बनावटी डेटा ब्‍लेंड करू शकतात, ज्‍याचा समकालीन फसवणूक ओळखणाऱ्या सिस्‍टम्‍सवर परिणाम होऊ शकतो. हे बनावटी प्रोफाइल्‍स अनेकदा कायदेशीर वाटणारी खाती तयार करण्‍यासाठी चोरी केलेल्‍या वैयक्तिक माहितीचा वापर करतात. सत्‍यापनासाठी बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन व मल्‍टी-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन अशा प्रगत सुरक्षा उपयायोजनांचा वापर करा. 


५. एआय-पॉवर्ड फिशिंग ईमेल्‍स: एआयमुळे आता घोटाळेबाजांना प्रवाही भाषा व फॉर्मेटिंगसह फिशिंग ईमेल्‍स व स्मिशिंग (एसएमएस) टेक्निक्‍स तयार करण्‍यास मदत होत आहे, जे कायदेशीर व्‍यवसाय स्थितींप्रमाणे असू शकतात. या ईमेल्‍समध्‍ये बनावटी वेबसाइट्स असलेल्‍या लिंक्‍स असू शकतात, ज्‍या वैयक्तिक माहितीची चोरी करतात किंवा मालवेअर निर्माण करू शकतात. असामान्‍य प्रेषक अॅड्रेसेसपासून सावध राहा आणि वैधतेची पडताळणी केल्‍याशिवाय कोणत्‍याही लिंक्‍सवर क्लिक करू नका. 


सतर्क राहा. #SatarkNagrik बना आणि एआय-संचालित फसवणूकांपासून स्‍वत:चे संरक्षण करा. घोटाळेबाजांना तुमची फसवणूक करू देऊ नका!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.