हिरो मोटोकॉर्पकडून ईआयसीएमए २०२४ मध्ये भावी गतीशीलता दृष्टिकोनाचे प्रदर्शन
जागतिक बाजारपेठांसाठी उच्च कार्यक्षम मोटरसायकल्स आणि इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण
युरोप आणि यूकेसाठी विस्तारीकरण योजनांची आखणी
'''बी द फ्यूचर ऑफ मोबिलिटी' या आपल्या दृष्टिकोनाशी बांधील राहत हिरो मोटोकॉर्पचा मर्यादांना दूर करण्याचा आणि नवकल्पना व शाश्वततेमध्ये नवीन मानक स्थापित करण्याचा मनसुबा आहे. आम्ही भावी पिढ्यांना फायदा होण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या गतीशीलतेच्या भविष्याला आकार देणाऱ्या अग्रगण्य तंत्रज्ञानांप्रती आमच्या कटिबद्धतेसह कार्यरत आहोत.
जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी म्हणून हिरो मोटोकॉर्प 'इनोव्हेटिंग अॅण्ड मेकिंग इन इंडिया फॉर वर्ल्ड' या तत्त्वाप्रती बांधील आहे. या तत्त्वामधून आमच्या कार्यसंचालनांचे प्रत्येक पैलू दिसून येतात, १२० दशलक्ष ग्राहकांना सेवा देण्याप्रती आमची समर्पितता अधिक दृढ होते, तसेच पर्यावरणीय स्थिरतेवरील भर कायम राहतो.
हिरो मोटोकॉर्प विश्वसनीय जागतिक अग्रणी कंपनी आहे, जी आमच्या मशिन्सची विश्वसनीयता व स्थिरतेसाठी ओळखली जाते. हा प्रेमळ विश्वास आणि आमची जागतिक दर्जाची उत्पादने दृढ पाया निर्माण करतात, जेथे आम्ही युरोप व यूकेमध्ये विस्तार करत आहोत.
आम्ही चार जागतिक दर्जाच्या उत्पादनांचे अनावरण करण्यास उत्सुक आहोत. प्रत्येक उत्पादनाची विशिष्ट जागतिक ओळख आहे, तसेच प्रत्येक उत्पादनामध्ये कॅटेगरी-लीडिंग वैशिष्ट्ये, प्रगत तंत्रज्ञान आणि प्रख्यात अभियांत्रिकी सर्वोत्तमता आहे, जी हिरो मोटोकॉर्पला नव्या उंचीवर घेऊन जाते.''
डॉ. पवन मुंजाल
कार्यकारी अध्यक्ष, हिरो मोटोकॉर्प
हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्स व स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने ईआयसीएमए २०२४ येथे उत्साहवर्धक व बहुप्रतिक्षित नवीन मोटरसायकल्स आणि इलेक्ट्रिक स्कूटरच्या श्रेणीचे अनावरण केले. कंपनीने २०२५ च्या उत्तरार्धात विविध युरोपियन आणि यूके बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या योजनांची घोषणा केली.
'बी द फ्यूचर ऑफ मोबिलिटी' या आपल्या दृष्टिकोनाशी बांधील राहत हिरो मोटोकॉर्पने नवीन व विद्यमान इंटर्नल कम्बशन इंजिन (आयसीई) आणि इलेक्ट्रिक वेईकल (ईव्ही) उत्पादनांची प्रीमियम श्रेणी दाखवली, ज्यामध्ये पुरस्कार-प्राप्त, भावी सर्ज एस३२, एफआयएम वर्ल्ड चॅम्पियनशीप विजेती अॅडवेन्चर मशिन हिरो ४५० रॅली आणि उल्लेखनीय इलेक्ट्रिक कन्सेप्ट्सचा समावेश आहे.
उत्पादनाचे प्रदर्शन
प्रीमियमाझेशनचा प्रवास सुरू ठेवत आणि नवीन श्रेणींमध्ये आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत हिरो मोटोकॉर्पने तीन नवीन मोटरसायकल्सचे अनावरण केले - एक्सपल्स २१०, एक्स्ट्रीम २५०आर आणि करिझ्मा एक्सएमआर २५०.
वैविध्यपूर्ण मोटरसायकल श्रेणी ऑफ-रोड/ अॅडवेन्चर ते स्ट्रीट व ट्रॅकपर्यंत विविध राइडिंग स्टाइल्स व रस्त्यांवरील ड्रायव्हिंगची पूर्तता करते. तसेच व्हिडा झेड इलेक्ट्रिक स्कूटर पर्यावरणाप्रती जागरूक ग्राहकांना स्टाइल व कार्यक्षमतेचा अनुभव देते.
व्हिडा झेड जागतिक ग्राहकांसाठी उत्पादन आहे, जे सर्वोत्तम वैशिष्ट्ये व स्टाइलिंगमुळे बार्सीलोना ते बोगोटापर्यंत लोकप्रिय आहे. ग्राहक अधिक सूक्ष्मदर्शी झाले असताना नवीन तंत्रज्ञान-सक्षम शाश्वत उत्पादनाचा स्वातंत्र्य, उत्साह व आनंदाचे अभिव्यक्ती असण्याचा मनसुबा आहे. व्हिडा झेडचे डिझाइन तत्त्व कार्यक्षम असण्यासोबत 'धमाल' राइडचा आनंद आहे. या स्कूटरमध्ये सुसंगत डिझाइन आहे, जी विशिष्ट सिल्हूटमुळे सहजपणे दिसून येते आणि समर्पक आहे.
हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीचे एफआयएम वर्ल्ड चॅम्पियन रॉस ब्रांच यांच्या अभिप्रायासह विकसित करण्यात आलेली एक्सपल्स २१० जागतिक स्तरावर लोकप्रिय उत्पादन आहे, जे प्रभावी राइडिंगच्या पैलूला कॅप्चर करते. या मोटरसायकलमध्ये मिनिमॅलिस्टिक डिझाइन आहे आणि रोमहर्षक राइडचा आनंद देते. या मोटरसायकलची अॅडवेन्चर-सुसज्जता प्रत्यक्ष शोरूममधून दिसून येते.
एक्स्ट्रीम २५०आर अल्टिमेट स्ट्रीट चॅम्पियन असण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. या मोटरसायकलची डिझाइन, आकर्षकता व कार्यक्षमतेधून 'स्पोर्टी' डीएनए दिसून येते. आकर्षक स्टायलिंग आणि शक्तिशाली स्टान्ससह ही मोटरसायकल लोकप्रिय एक्स्ट्रीम पॉवर ब्रँडचे विस्तारीकरण आहे.
करिझ्मा एक्सएमआर २५० सर्वांचे लक्ष वेधून घेते. या मोटरसायकलमध्ये कार्यक्षमता व स्टाइलचे उत्तम संयोजन आहे. आकर्षक डिझाइन, तसेच रेसिंग-प्रेरित विंगलेट्स मोटरसायकलच्या व्हिज्युअल आकर्षकतेमध्ये अधिक भर करतात आणि हाइट-अॅडजस्टेबल क्लिप-ऑन हँडलबार्स सारखी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये राइडरला आरामदायीपणाची खात्री देतात. रेसट्रॅकवर राइड करायचे असो किंवा खुल्या रस्त्यावर उत्साहपूर्ण राइडचा आनंद घ्यायाचा असो करिझ्मा एक्सएमआर २५० उत्साहवर्धक अनुभव देते.
जागतिक विस्तारीकरण
२०२५ च्या उत्तरार्धापर्यंत युरोप व यूकेमध्ये व्यावसायिक कार्यसंचालनांचा विस्तार करण्याच्या ध्येयासह हिरो मोटोकॉर्प नवीन इलेक्ट्रिक स्कूटर व्हिडा झेड लाँच करत बाजारपेठांमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच, कंपनीची आपली श्रेणी उच्च क्षमतेच्या प्रीमियम इंटर्नल कम्बशन इंजिन (आयसीई) मोटरसायकल्सपर्यंत विस्तारित करण्याची योजना आहे.
हिरो मोटोकॉर्पचे युरोपमध्ये तंत्रज्ञान केंद्र - टेक सेंटर, जर्मनी (टीसीजी) आहे आणि हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅली टीसीजीबाहेर देखील स्थित आहे. कंपनीची विद्यमान व नवीन उत्पादन श्रेणी युरोपियन बाजारपेठांच्या विद्यमान आणि भावी गरजांची योग्यरित्या पूर्तता करेल.
कंपनीने इटली - पेल्पी इंटरनॅशनल एस.आर.एल.मध्ये वितरकांच्या नियुक्तीची घोषणा केली. कंपनीने यापूर्वी स्पेनमधील भागीदार - नोरिया मोटोस एसएलयू, फ्रान्समधील भागीदार - जीडी फ्रान्स आणि यूकेमधील भागीदार मोटोजीबी यूके यांच्यासह व्यावसायिक करार केले होते.
उत्पादनांबाबत सविस्तर माहिती
व्हिडा झेड
हिरोचे पाठबळ असलेल्या व्हिडामधील नवीन उत्पादन व्हिडा झेड जागतिक ग्राहकांच्या गरजांना लक्षात घेत डिझाइन करण्यात आली आहे. ही स्कूटर आनंददायी राइड देते, ज्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी परिपूर्ण आहे, तसेच स्वातंत्र्य व उत्साह देखील देते.
व्हिडा झेड चार्जिंगचे विविध मोड्स, रिमूव्हेबल बॅटरी, विश्वसनीय कार्यक्षमता आणि माय व्हिडा अॅपच्या माध्यमातून कनेक्टेड व सेफ्टी सूटची अतिरिक्त खात्री देत 'चिंतामुक्त मालकीहक्काचा' अनुभव देते.
व्हिडा झेडमध्ये अत्याधुनिक परमनंट मॅग्नेट सिन्क्रोनॉस मोटर (पीएमएसएम) ड्राइव्ह ट्रेन आहे, जी कार्यक्षमता, कमी मेन्टेनन्स व कामगिरीचे सर्वोत्तम मिश्रण देते. मॉड्युलर रचनेमध्ये २.२ केडब्ल्यूएचपासून ४.४ केडब्ल्यूएच क्षमतेपर्यंतची बॅटरी सामावू शकते.
ही वेईकल आमचे नवीन अत्याधुनिक कनेक्टीव्हीटी सूट + क्लाऊड प्लॅटफॉर्मसह सुसज्ज असेल. हे नवीन प्लॅटफॉर्म मालकांना वेईकल हेल्थ, चोरी/मूव्हमेंट डिटेक्शन, जिओफेन्सिंगवर देखरेख ठेवण्याची, तसेच अनधिकृत वापरासंदर्भात वेईकल स्थिर करण्याची आणि सर्विस स्टेशनला भेट न देता ओव्हर द एअर (ओटीए) अपडेट्स करण्याची सुविधा देईल.
स्कूटरच्या सर्वोत्तम डिझाइन घटकांमध्ये स्कूटरच्या पृष्ठभागाला पूरक हँडलबार, मिनिमलिस्टिक डिझाइनला शोभून दिसणारे असेंट्स, टच-सक्षम टीएफटी डिस्प्ले आणि उद्योगातील सर्वोत्तम ग्रेडेबिलिटी आहे.
एक्सपल्स २१०
एक्सपल्स २१० साहसी राइडचा आनंद देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. शक्तिशाली २१० सीसी डीओएचसी लिक्विड-कूल्ड इंजिन २४.५ बीएचपी शक्ती आणि २०.४ एनएम टॉर्कची निर्मिती करते. २१० मिमी फ्रण्ट व २०५ मिमी रिअर सस्पेंशनसह अॅडप्टेबल ब्रेकिंगसाठी स्विचेबल एबीएस मोड्स राइडरला कोणत्याही प्रदेशामध्ये राइडिंग करण्याचा आत्मविश्वास देतात.
डोंगराळ भागामधून नेव्हिगेट करायचे असो किंवा शहरातील रस्त्यांवरून राइड करायचे असो एक्सपल्स २१० रोमांचक, प्रतिसादात्मक राइड देते. ६-स्पीड गिअरबॉक्ससह स्लिपर आणि असिस्ट क्लच सहजपणे गिअर शिफ्ट्सची खात्री देतात.
२२० मिमीच्या उच्च ग्राऊंड क्लीअरन्ससह ही मोटरसायकल खडतर प्रदेशांमधून देखील सहजपणे नेव्हिगेट करू शकते. ४.२ इंच टीएफटी स्पीडोमीटर सुस्पष्ट राइड माहिती देते, तर अॅडजस्टेबल हँडलबार सर्वोत्तम आरामदायीपणाची खात्री देते. ऑफ-रोड सुसज्जतेसाठी रॅली किट असलेली ही मोटरसायकल कोणत्याही साहसी राइडसाठी परिपूर्ण सोबती आहे.
एक्स्ट्रीम २५०आर
नवीन एक्स्ट्रीम २५०आर तिच्या श्रेणीमधील गतीशील मोटरसायकल असण्यासोबत ब्रँडसाठी उद्देशाची प्रतीक आहे. स्पोर्टी हेड-टर्नरमध्ये आकर्षक स्टायलिंग आणि शक्तिशाली स्टान्स आहे. शक्तिशाली २५० सीसी लिक्विड-कूल्ड डीओएचसी इंजिनसह ४-व्हॉल्व्ह सिस्टमपासून ट्रेलिस फ्रेमपर्यंत मोटरसायकलचे प्रत्येक घटक चपळ हाताळणी आणि उत्साहवर्धक कार्यक्षमतेप्रती योगदान देतात. ३० पीएसची सर्वोच्च शक्ती आणि २५ एनएमचे सर्वोच्च टॉर्क निर्माण करणारे इंजिन गतीसाठी डिझाइन करण्यात आले आहे.
यूएसडी फ्रण्ट सस्पेंशन, ६-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक रिअर सस्पेंशन आणि रॅडियल टायर्ससह ५०-५० वेट बॅलन्स अपवादात्मक ग्रिप व प्रतिसाद देतात, ज्यामुळे राइडर्स आत्मविश्वासासह गतीशील राइडचा आनंद घेऊ शकतात.
ही बाइक तिच्यामधील मर्यादांना दूर करते. राइडर-केंद्रित तंत्रज्ञानासह स्विचेबल एबीएस मोड्स, ऑटो-इल्यूमिनेशन क्लास-डी एलईडी प्रोजेक्टर हेडलाइटसह डीआरएल, तसेच लॅप टाइमर आणि ड्रॅग टाइमर अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये असलेली ही बाइक मर्यादांची चाचणी घेण्याची इच्छा असलेल्या राइडर्ससाठी परिपूर्ण आहे. या बाइकमध्ये चालता-फिरता कनेक्टेड व माहितीपूर्ण राहण्यासाठी टीबीटी नेव्हिगेशन आणि म्युझिक कंट्रोल अशी कनेक्टेड वैशिष्ट्ये देखील आहेत.
करिझ्मा एक्सएमआर २५०
करिझ्मा एक्सएमआर २५० मध्ये कार्यक्षमता व स्टाइलचे उत्तम संयोजन आहे. २५० सीसी डीओएचसी ४व्ही लिक्विड-कूल्ड इंजिनची शक्ती असलेली ही मोटरसायकल ३० पीएस सर्वोच्च शक्ती आणि २५ एनएम सर्वोच्च टॉर्क देते, ज्यामुळे प्रत्येक घटकामधून खरी स्पोर्ट्स बाइक आहे. डिझाइन वैशिष्ट्यांमध्ये स्लीक लाइन्स, आक्रमक स्टान्स, रेसिंग-प्रेरित विंगलेअ्स, तसेच एर्गोनॉमिक वैशिष्ट्ये जसे हाइट-अॅडजस्टेबल क्लिप-ऑन हँडलबार्सचा समावेश आहे.
मोटरसायकलच्या संरचनेला प्रबळ ट्रेलिस फ्रेमसह अधिक मजबूत करण्यात आले आहे आणि या मोटरसायकलमध्ये यूएसडी फ्रण्ट सस्पेंशनसह ६-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक रिअर सस्पेंशन आणि सुलभ राइडसाठी स्विचेबल एबीएस मोड्स आहेत. परफॉर्मन्सवर देखरेख ठेवण्यासाठी लॅप टाइमर व ड्रॅग टाइमर, तसेच ऑटो-इल्यूमिनेशन क्लास-डी मल्टी-प्रोजेक्टर एलईडी हेडलाइट आणि एलईडी डीआरएल मोटरसायकलच्या उपयुक्ततेमध्ये वाढ करतात.