रुग्णांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटल्सने डोझीच्या सहयोगाने सुरू केला महाराष्ट्राचा पहिला ‘एआय-पॉवर्ड कमांड सेंटर’ उपक्रम
पुणे, भारत, १3 डिसेंबर २०२४: अत्याधुनिक आरोग्यसेवा पुरविणाऱ्या संस्थांमधील एक अग्रगण्य संस्था सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स डोझी (Dozee) या भारताच्या अव्वल क्रमांकाच्या रिमोट पेशंट मॉनिटरिंग कंपनीच्या सहयोगाने ‘एआय-पॉवर्ड हेल्थ कमांड सेंटर’ या आपल्या पथदर्शी उपक्रमाच्या शुभारंभाची घोषणा करत आहे. हा परिवर्तनकारी कार्यक्रम अचूक सेवा पुरविण्यासाठी, सक्रीय हस्तक्षेपांसाठी आणि बेजोड चिकित्सात्मक परिणामांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून घेत रुग्णसुरक्षेच्या निर्धारित मापदंडांची नवी व्याख्या करतो. यात एआय-सुसज्ज पेशंट मॉनिटरिंग यंत्रणेचा समावेश आहे, जी रुग्णाच्या स्थितीवर अखंडपणे देखरेख ठेवत राहते आणि रुग्णाची तब्येत ढासळत असल्याच्या अगदी सुरुवातीच्या लक्षणांचेही निदान करते. त्याचबरोबर ही यंत्रणा गंभीर आणि अत्यंत गंभीर प्रकरणेही ओळखते, आपत्कालीन पथकांना तत्काळ कृतीच्या सूचना देते, ज्यातून रुग्णाला वेळच्यावेळी व प्राण वाचविणाऱ्या उपाययोजना मिळतील याची खबरदारी घेतली जाते.
सध्या सह्याद्रीच्या हडपसर आणि डेक्कन येथील युनिट्समध्ये कार्यरत असलेल्या या कमांड सेंटरची कार्यकक्षा येत्या सहा महिन्यांमध्ये सर्व सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये विस्तारली जाईल, जेणेकरून या परिवर्तनकारी तंत्रज्ञानाचा सह्याद्री हॉस्पिटल्सच्या संपूर्ण साखळीमध्ये सहज अंगिकार होण्याची हमी मिळावी.
या घोषणेविषयी बोलताना सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. अब्रारअली दलाल म्हणाले, “महाराष्ट्राचे पहिले एआय-पॉवर्ड कमांड सेंटर सुरू करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. रुग्णदेखभाल आणि रुग्णसुरक्षेच्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारे हे एक क्रांतीकारी पाऊल आहे. डोझीबरोबरच्या भागीदारीतून उभा राहिलेल्या या उपक्रमातून सक्रीयतेने आरोग्यसेवेचे व्यवस्थापन करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा करून घेण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, ज्यामुळे प्रत्येक रुग्णाचे स्वास्थ्य सुरक्षित राखण्यासाठी रुग्णावर प्रत्येक क्षणी देखरेख ठेवणे व निर्णय घेण्यामध्ये अखंडितता राखणे शक्य होते.”
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे ग्रुप सीओओ कर्नल (नि.) डॉ. सुनिल राव म्हणाले, “सह्याद्रीमध्ये आम्ही आरोग्यसेवा क्षेत्रातील नवसंकल्पनांच्या सीमारेषा विस्तारण्याप्रती कटिबद्ध आहोत. एआय-पॉवर्ड हेल्थ कमांड सेंटर उपक्रम म्हणजे एक अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम हेल्थकेअर परिसंस्था निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयाचे मूर्त रूप आहे. एआयची ताकद वापरात आणून रुग्णांना सर्वोच्च पातळीवरील देखभाल पुरविण्याचे व क्लिनिकल निष्कर्षांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. या उपक्रमातून सह्याद्रीने तंत्रज्ञान-प्रेरित आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील आपले अग्रस्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. डोझीबरोबरच्या भागीदारीमधून आम्ही आमच्या रुग्णांसाठी एक अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट व अधिक कनेक्टेड भविष्य तयार करत आहोत.”
हा मुद्दा पुढे नेताना सह्याद्री हॉस्पिटलचे डिरेक्टर ऑफ क्रिटिकल केअर डॉ. कपिल बोरावाके म्हणाले “रुग्णांची सुरक्षा आमच्या सर्व कामकाजाच्या केंद्रस्थानी आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने आम्ही प्रतिसादात्मक प्रारूपाकडून अंदाजक्षम आणि प्रतिबंधात्मक प्रारूपाकडे वळत आहोत. रिअल-टाइम डेटा आणि लवकर प्राप्त होणाऱ्या धोक्याच्या सूचनांचा वापर करून आमच्या टीम्स रुग्णाची स्थिती ढासळू लागल्यालागल्याच व ती गंभीर बनण्याआधीच योग्य प्रकारे हाताळू शकतील, यातून रुग्णाचे प्राण वाचतील व रुग्ण बरा होण्याच्या दृष्टीने अधिक चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतील. डॉक्टर्सच्या उपचारात्मक निर्णय-क्षमतेमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी डोझीसारख्या प्रगत एआय-सुसज्ज तंत्रज्ञानांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. आरोग्यक्षेत्राच्या सध्याच्या बदलत्या चित्राचा विचार करता, आता रुग्णांना अपेक्षित करणारी देखभालीचा उच्च दर्जा गाठण्यासाठी रुग्णचिकित्सेमध्ये एआय तंत्रज्ञान समाविष्ट करणे अत्यावश्यक बनत चालले आहे.”