Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बीएलएस ई-सर्व्हिसेसने आदिफिडेलिस सोल्यूशन्सचे संपादन पूर्ण केले

 बीएलएस ई-सर्व्हिसेसने आदिफिडेलिस सोल्यूशन्सचे संपादन पूर्ण केले


मुंबई, २९ नोव्हेंबर २०२४: बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड (बीएलएसई) या टेक्नॉलॉजी-सक्षम डिजिटल सेवा प्रदाता कंपनीने आज आदिफिडेलिस सोल्यूशन्स प्रा. लि. आणि त्यांच्या सहयोगींमधील (एएसपीएल) ५७% नियंत्रक स्टेकचे संपादन सुमारे १९० कोटी रु. या एंटरप्राइज व्हॅल्यूमध्ये पूर्ण केल्याचे जाहीर केले. आदिफिडेलिस सोल्यूशन्स ही कॉर्पोरेट आणि व्यक्तींना कर्ज वितरण आणि प्रोसेसिंग करणारी भारतातील एक मोठी कंपनी आहे.


बीएलएसईने एएसपीएल मधील ५७% भाग अंदाजे १२३ कोटी रु. इतक्या एकंदर मोबदला मूल्यात संपादन केला. या कंपनीने आधीच सुमारे ७८ कोटी रु. ची गुंतवणूक केली होती, ज्यामध्ये एएसपीएल मध्ये केलेल्या २५ कोटी रु. च्या प्राथमिक गुंतवणुकीचा समावेश आहे. अतिरिक्त पेमेंट जेव्हा काही विशिष्ट एबिटाचे लक्ष्य आर्थिकवर्ष २०२४-२५ आणि आर्थिकवर्ष २०२५-२६ मध्ये साध्य होईल तेव्हा करण्यात येतील. एएसपीएल ८६०० चॅनल पार्टनर्सच्या नेटवर्कच्या माध्यमातून संचालन करते जे १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून कर्जाचे अर्ज मिळवतात. एएसपीएल सध्या दरमहा सरासरी १५०० हून अधिक कोटी रु. ची कर्जे वितरित करत आहे.



बीएलएस ई-सर्व्हिसेस लि. चे अध्यक्ष श्री. शिखर अग्रवाल म्हणाले, “कर्ज वितरण आणि प्रोसेसिंग क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी एएसपीएल मधील नियंत्रक भागांचे संपादन पूर्ण करताना आम्हाला आनंद होत आहे. हे धोरणात्मक पाऊल विशेष लक्षणीय आहे, कारण ते बीएलएसई च्या व्यापक नेटवर्कला अनुरूप आहे आणि ते वंचित समुदायांना आवश्यक अशा लास्ट-माईल बँकिंग सेवा प्रदान करण्यातील आमचे वर्चस्व अधिक मजबूत करेल.


बीएलएसई आपल्या व्यवसाय प्रतिनिधी सेवांना पूरक ठरतील अशा पद्धतीने एएसपीएलच्या कौशल्याचा आणि उच्च-स्तरीय आर्थिक संस्थांशी असलेल्या त्यांच्या संबंधांचा फायदा करून घेईल, ज्यामुळे क्रॉस सेलिंगच्या भरपूर संधी उघड होतील. एएसपीएल चे बीएलएसई मध्ये एकत्रीकरण बीएलएसई साठी सुव्यवस्थित सेवा ऑफरिंग्ज सुनिश्चित करेल तसेच त्यांच्या संचालन क्षमता सुधारून मार्केटमधील त्यांची पोहोच वाढवेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.