Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फेडरल बँकेची ईकोफायसह भागीदारी

 फेडरल बँकेची ईकोफायसह भागीदारी

मुंबई, 21 डिसेंबर २०२४: फेडरल बँक या भारतातील एका आघाडीच्या खाजगी क्षेत्राच्या बँकेने एव्हरसोर्स कॅपिटलचे समर्थन लाभलेल्या आणि भारताच्या हरित परिवर्तनास वित्तपुरवठा करणाऱ्या ईकोफाय या भारताच्या ग्रीन-ओन्ली नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीसोबत भागीदारी केल्याचे जाहीर केले आहे. या भागीदारीचा उद्देश व्यावसायिक रूफटॉप इन्स्टॉलेशनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या एमएसएमईजसाठी नावीन्यपूर्ण वित्तपुरवठा उपाययोजना ऑफर करण्याचा आहे. ही अशी पहिली व्यापक सह-कर्ज भागीदारी आहे, जी खास करून एमएसएमईज क्षेत्राच्या वेगळ्या अशा सोलर फायनॅन्सिंग गरजा भागवण्यासाठी योजण्यात आली आहे.


दर वर्षी ३६००केडब्ल्यू रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन्सना वित्तपुरवठा करून अनेक एमएसएमईजसाठीना लाभ करून देण्याचा या भागीदारीचा प्रयत्न असेल. हे साध्य झाल्यास दर वर्षी २५०० टनापेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होईल आणि डीकार्बोनायझेशनला गती मिळेल आणि शाश्वत वृद्धीला प्रोत्साहन मिळेल. बहुतांशी उत्पादकएमएसएमईजसाठी दिवसा प्रामुख्याने वीज वापरतात, त्यांच्यासाठी रूफटॉप सोलर हा उत्तम उपाय आहे. पण, सर्वसामान्यतः आर्थिक अडचणींमुळे अक्षय ऊर्जेकडे वळणे त्यांना शक्य नसते. त्यात अनेक संस्था त्यासाठी कर्ज देण्यास तयार नसतात किंवा कर्ज दिले तरी खूप जास्त व्याज दारावर देतात.



फेडरल बँकेच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शालिनी वॉरियर यांनी टिप्पणी केली, “ईकोफायसोबत केलेल्या या भागीदारीमधून शाश्वत व्यवसाय प्रथांना समर्थन देण्याची आमची वचनबद्धता व्यक्त होते. व्यावसायिक रूफटॉप सोलर उपकरणांसाठी सहजप्राप्य वित्तपुरवठा ऑफर करून आम्ही एमएसएमईजना विजेचा खर्च कमी करण्यास तसेच भारताच्या हवामानविषयक उद्दिष्टांसाठी अर्थपूर्ण योगदान देण्यास सक्षम करत आहोत.”

ईकोफायच्या सह-संस्थापक, मॅनिजिंग डायरेक्टर आणि सीईओ राजश्री नांबियार म्हणाल्या, “एमएसएमई हा भारताच्या आर्थिक पटावरील एक महत्त्वाचा सेगमेन्ट आहे. पण तरीही, शाश्वत ऊर्जा उपाययोजनांचा अंगिकार करण्यात त्यांना अनेक अडचणी आहेत. फेडरल बँकेशी आमची भागीदारी अशाप्रकारे रचण्यात आली आहे, ज्याच्यामुळे २०-२०० केडब्ल्यू या श्रेणीत सोलर इंस्टॉलेशन्ससाठी वित्तपुरवठा संधी खुल्या होतील. ही श्रेणी आजवर वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांसाठी एक आव्हानात्मक कर्ज क्षेत्र समजली जात होती.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.