हीरो मोटोकॉर्प ने लॉन्च केली नवीन डेस्टिनी 125
सेगमेंट-लीडिंग मायलेज आणि इंडस्ट्री-फर्स्ट वैशिष्ट्यांनी युक्त
हिरो मोटोकॉर्प ही जगातील मोटरसायकल्स व स्कूटर्सची सर्वात मोठी उत्पादक कंपनी नवीन डेस्टिनी १२५च्या लाँचसह १२५ सीसी स्कूटर सेगमेंटला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे.
शहरी गतीशीलता अपग्रेड करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या नवीन डेस्टिनी १२५ मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अद्वितीय मायलेज आणि अविरत विश्वसनीयता आहे. ही स्कूटर कार्यक्षमता व व्यावहारिकतेचे प्रबळ संयोजन देते, शहरामध्ये दररोज राइड्ससाठी नवीन मापदंड स्थापित करते, तसेच राइडरच्या अपेक्षांना नव्या उंचीवर घेऊन जाते.
नवीन हिरो डेस्टिनी १२५ तीन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल:
- डेस्टिनी १२५ व्हीएक्स - ८०,४५० रूपये
- डेस्टिनी १२५ झेडएक्स - ८९,३०० रूपये
- डेस्टिनी १२५ झेडएक्स+ - ९०,३०० रूपये
(दिल्लीमधील सुरूवातीची एक्स-शोरू किंमत)
नवीन डेस्टिनी १२५ मधून हिरो मोटोकॉर्पची नाविन्यतेप्रती समर्पितता दिसून येते. या स्कूटरमध्ये ३० पेटण्ट अॅप्लीकेशन्स आणि इंडस्ट्री-फर्स्ट वैशिष्ट्ये आहेत, जसे इल्यूमिनेटेड स्टार्ट स्विच व ऑटो-कॅन्सल विंकर्स, ज्यामधून राइडरला अधिक सोयीसुविधता व सुरक्षिततेची खात्री मिळते.
नवीन डेस्टिनी १२५ कुटुंबांसाठी योग्य निवड आहे. या स्कूटमध्ये प्रतिलिटर ५९ किमीचे सेगमेंट-लीडिंग मायलेज, एैसपैस लेगरूम आणि फ्लोअरबोर्ड आहे. डेस्टिनी १२५ मध्ये लांब सीट देखील आहे, ज्यामधून राइडरला आरामदायी व एर्गोनॉमिक अनुभव मिळतो.
स्मार्टर, सुलभ व अधिक किफायतशीर राइडचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या स्कूटरमध्ये नवीन डिजिटल स्पीडोमीटर, १९० मिमी फ्रण्ट डिस्क ब्रेक, अपग्रेडेड १२/१२ प्लॅटफॉर्म आणि विस्तृत रिअर व्हील आहे. तसेच, या स्कूटरमध्ये सुधारित कार्यक्षमतेसाठी हिरोचे नाविन्यपूर्ण आय३एस (इडल स्टॉप-स्टार्ट सिस्टम) तंत्रज्ञान देखील आहे. विचारपूर्वक डिझाइन करण्यात आलेले सीट बॅकरेस्ट आरामदायीपणामध्ये अधिक भर करते, ज्यामधून उच्च दर्जाच्या राइडिंग अनुभवाची खात्री मिळते.
या लाँचबाबत मत व्यक्त करत हिरो मोटोकॉर्पच्या इंडिया बिझनेस युनिटचे चीफ बिझनेस ऑफिसर रणजीवजीत सिंग म्हणाले, ''आम्हाला स्टाइल, सोयीसुविधा व प्रगत तंत्रज्ञानाचे प्रतीक असलेली नवीन हिरो डेस्टिनी १२५ लाँच करण्याचा आनंद होत आहे, जी आधुनिक काळातील राइडसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही नाविन्यपूर्ण १२५ सीसी स्कूटर उद्योग मापदंडांना नव्या उंचीवर घेऊन जाते आणि हिरो मोटोकॉर्पचे स्थान अधिक दृढ करते. प्रतिलिटर ५९ किमीच्या प्रभावी सेगमेंट-लीडिंग मायलेजसह या कुटुंबासाठी अनुकूल स्कूटरमधून ग्राहकांना नाविन्यता, मूल्य व अद्वितीय राइडिंग अनुभव देण्याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते.''