Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पीव्‍ही सिंधू बनली किराणाप्रोची गुंतवणूकदार व ब्रँड ॲम्बेसेडर

 पीव्‍ही सिंधू बनली किराणाप्रोची गुंतवणूकदार व ब्रँड ॲम्बेसेडर 

मुंबई, २६ फेब्रुवारी २०२५: किराणाप्रो या भारतातील आघाडीच्‍या एआय-समर्थित क्विक कॉमर्स प्‍लॅटफॉर्मने भारताच्‍या बॅडमिंटन आयकॉन पीव्‍ही सिंधू यांचे गुंतवणूकदार व ब्रँड ॲम्बेसेडर म्‍हणून स्‍वागत करत मोठी झेप घेतली आहे. किराणाप्रोने प्रख्‍यात भारतीय बॅडमिंटनपट्टू व ऑलिम्पिक पदक विजेत्‍या पीव्‍ही सिंधू यांच्‍यामधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक प्राप्‍त केली आहे. त्‍यांनी किराणाप्रो सीड फंडिंग राऊंडमध्‍ये पहिल्‍यांदाच गुंतवणूक केली आहे. या धोरणात्‍मक सहयोगामधून परिसरातील किराणा स्‍टोअर्सना अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि एआय-संचालित सोल्‍यूशन्‍ससह सक्षम करत भारतातील रिटेल क्षेत्रात क्रांती घडवून आणण्‍याच्‍या ब्रँडच्‍या मिशनवरील सिंधू यांचा विश्‍वास दिसून येतो. पीव्‍ही सिंधू आणि किराणाप्रो यांच्‍यामधील सहयोग कॉर्नरस्‍टोन स्‍पोर्टद्वारे सुव्‍यवस्थित केला जात आहे, ज्‍यामधून विनासायास सहयोगाची खात्री मिळेल, जो ब्रँडच्‍या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे.  




पीव्‍ही सिंधू किराणप्रोच्‍या चेहरा असणार आहेत तसेच इतरही भूमिका बजावतील. त्‍या लहान रिटेलर्ससाठी डिजिटल तफावत दूर करण्‍याच्‍या ब्रँडच्‍या दृष्टिकोनाप्रती सक्रियपणे योगदान देतील. आयपीएल २०२५ दरम्‍यान ब्रँडच्‍या अधिकृत अॅम्‍बेसेडर म्‍हणून त्‍या राष्‍ट्रीय स्‍तरावर किराणाप्रोची उपस्थिती अधिक वाढवतील, ज्‍यामुळे क्विक कॉमर्समधील कॅटेगरी लीडर म्‍हणून ब्रँडचे स्‍थान अधिक दृढ होईल.


किराणाप्रोचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक रविंद्रन म्‍हणाले, “हा सहयोग किराणाप्रोसाठी महत्त्वाचा टप्‍पा आहे. पीव्‍ही सिंधू कौशल्‍य व निश्‍चयाच्‍या प्रतीक आहेत. आम्‍ही देशभरात नेटवर्क निर्माण करण्‍याचे काम हाती घेतले आहे, जेथे लाखो किराणा स्‍टोअर्सना लाखो स्‍थानिक ग्राहकांशी कनेक्‍ट केले जोईल. सिंधू यांनी दिलेल्‍या पाठिंब्‍यामधून आमचे प्रयत्‍न दिसून येतात आणि आमच्‍यासाठी उत्‍प्रेरक ठरेल, ज्‍यामधून आम्‍हाला स्‍थानिक समुदायांचे सक्षमीकरण करण्‍यासाठी अधिक मेहनत घेण्‍यास प्रेरणा मिळेल.'' 




किराणाप्रोच्‍या ब्रँड ॲम्बेसेडर पीव्‍ही सिंधू म्‍हणाल्‍या, “माझा नेहमी सक्षमीकरणाच्‍या क्षमतेवर विश्‍वास आहे आणि किराणाप्रो परिसरातील किराणा स्‍टोअर्सना तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍यास, नवीन संधी धुंदाळण्‍यास आणि झपाट्याने विकसित होत असलेल्‍या डिजिटल विश्‍वामध्‍ये प्रगती करण्‍यास मदत करत वास्‍तविक बदल घडवून आणत आहे. हे प्रयत्‍न रिटेलपलीकडे देखील केले जात आहेत, जेथे ग्रामीण अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये परिवर्तन घडवून आणत आहेत आणि भारताच्‍या एकूण विकासाप्रती योगदान देत आहेत. मला समुदायांचे सक्षमीकरण आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्‍याच्‍या या अर्थपूर्ण मिशनला पाठिंबा देण्‍यासाठी ब्रँड अॅम्‍बेसेडर व गुंतवणूकदार म्‍हणून किराणाप्रोसोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.