*इंद्रायणी आणि #लय आवडतेस तू मला मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग !*
पहा २६ फेब्रुवारी संध्या. ७.०० आणि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.
*मुंबई २४ फेब्रुवारी, २०२५ :* कलर्स मराठीवरील इंद्रायणी आणि #लय आवडतेस तू मला मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग २६ फेब्रुवारी संध्या. ७.०० आणि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. ‘इंद्रायणी’ मालिकेत महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कथानकात नवे वळण येणार आहे. इंद्रायणीचे काका-काकू खरे नसून ते फसवे असल्याचे समजताच ते इंदूला धमकी देतात की, जर तिने हे सत्य कोणालाही सांगितले तर अधूच्या जीवाला धोका होईल. यामुळे इंद्रायणी संभ्रमात पडते आणि या परिस्थितीत इंद्रायणी गुप्तपणे गोपाळला सत्य कळवण्याची योजना आखते. महाशिवरात्रीचा दिवस उगवतो. इंदूला काका-काकूंकडून महाशिवरात्रीच्या कीर्तनाची परवानगी मिळते. कीर्तनाच्या वेळी ती ‘पुत्रणा मावशीचे कीर्तन’ सादर करत असताना गोपाळला काका-काकू खरे नसल्याचे संकेत देते. आता यामुळे इंद्रायणी खोड्या काका - काकूंचा पर्दाफाश कशी करणार ? याची उत्सुकता वाढली आहे.
# लय आवडतेस तू मला मालिकेत सरकार - सानिकाचा कळशी गावातील गावकऱ्यांसोबतच लढा सुरुच आहे. साहेबरावांनी साखर कारखाना बंद केल्यानंतर कळशीगाव बेरोजगारीसाठी सानिका आणि सरकारला जबाबदार धरतं. मात्र, या विरोधातही सानिका हार मानत नाही. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ती एक नवा मार्ग शोधते आणि तो म्हणजे 'चहाचा गूळ’ तयार करण्याचा. मात्र, गावकरी तिच्या कल्पनेला अशक्य मानून तिची खिल्ली उडवतात. सानिका आव्हान स्वीकारून स्वतः गूळ बनवून दाखवण्याचा निर्धार करते. दरम्यान, सरकारदेखील महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कठोर व्रत करताना दिसणार आहे. सानिकाच्या अथक प्रयत्नांना यश मिळावे, म्हणून सरकार प्राचीन महादेव मंदिरातील शिवलिंगावर 101 वेळा नदीचे पाणी वाहण्याचा संकल्प करतो.
एकीकडे सानिका गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि बेरोजगारी मिटवण्याच्या प्रयत्नात आहे तर दुसरीकडे सरकार तिला यश मिळावे यासाठी झुंजतो आहे. एकाला यश पाहिजे, तर दुसऱ्याला देवाचा आशीर्वाद. आता बघूया पुढे मालिकेत काय घडणार ? महादेवाच्या आशीर्वादाने सानिका - सरकार कसे हे आव्हानं पार करणार. *यावर बोलताना तन्मय जक्का म्हणाला,* "हा सीन चित्रीत करताना खूप आव्हानात्मक अनुभव होता. रणरणत्या उन्हात आम्ही हा सिन शूट केला... जवळपास ३-४ तास लागले, तीव्र उन्हामुळे चटके तर लागतच होते पण पाय खरंच पोळले होते आणि १०१ फेऱ्या पूर्ण केल्यासारखं वाटलं. पण त्यानिमित्ताने महादेवाची सेवा करण्याची संधी मिळाली, हे विशेष वाटतं. दरम्यान, उष्णतेमुळे थोडं कठीण झालं पण टीमने त्वरित काळजी घेतली. अशा सीनसाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो, कारण शारीरिक आणि मानसिक तग धरावा लागतो,"
हे जाणून घेण्यासाठी पहा इंद्रायणी आणि #लय आवडतेस तू मला मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग २६ फेब्रुवारी संध्या. ७.०० आणि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर