Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*माझाच्‍या नवीन कॅम्‍पेनसह जीवनातील दैनंदिन विजयाचा जल्‍लोष*

 *माझाच्‍या नवीन कॅम्‍पेनसह जीवनातील दैनंदिन विजयाचा जल्‍लोष*


नवी दिल्‍ली, फेब्रुवारी ३, २०२५: माझा हे भारतातील लोकप्रिय मँगो ड्रिंक लाखो आंबाप्रेमींचे पसंतीचे राहिले आहे, जेथे या पेयाच्‍या प्रत्‍येक सिपमधून स्‍वादिष्‍ट आंब्‍यांचा आस्‍वाद मिळतो. अस्‍सल ज्‍यूसी हापूस आंब्‍यांच्‍या पौष्टिकतेसह बनवण्‍यात आलेल्‍या माझाची नवीन कॅम्‍पेन 'माझा हो जाए'सह कोका-कोला इंडिया स्‍वदेशी ब्रँड सेलिब्रेशनला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे.   


कॅम्‍पेन प्रबळ सांस्‍कृतिक पैलूमध्‍ये सामावलेली आहे, ते म्‍हणजे भारतात भव्‍य सेलिब्रेशन्‍स व मोठ्या टप्‍प्‍यांना साजरे केले जात असले तरी लहान विजय देखील व्‍यक्‍तींच्‍या जीवनाला आकार देतात, ज्‍याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. याच क्षणांमधून अभिमानाची भावना जागृत होते, ज्‍याला क्‍वचितच मान्‍यता मिळते. माझाने या लहान सेलिब्रेशन्‍ससाठी परिपूर्ण ट्रीट म्‍हणून पुढाकार घेतला आहे, ज्‍यामुळे साधारण प्रसंग देखील असाधारण होऊन जाईल. 


माझा दैनंदिन विजयासाठी परिपूर्ण पेय आहे आणि ही संकल्‍पना कॅम्‍पेन जाहिरातीमध्‍ये सुरेखरित्‍या सादर करण्‍यात आली आहे. ही जाहिरात काहीसे थांबून लहान-लहान क्षणांचा आनंद घेण्‍याची आठवण करून देते. माझाने हे ओळखले आहे आणि या दैनंदिन विजयाला सन्‍मानित व साजरे करण्‍यासाठी सोपा, पण प्रबळ मार्ग देते. 



या कॅम्‍पेनबाबत मत व्‍यक्‍त करत कोका-कोला इंडिया व नैऋत्‍य आशियाचे विपणन, न्‍यूट्रिशन श्रेणीचे संचालक अजय कोनाले म्‍हणाले, ''माझा जवळपास पाच दशकांपासून भारतातील ग्राहकांना अस्‍सल आंब्‍याचा आस्‍वाद देत आहे आणि देशातील सर्वात लोकप्रिय बेव्‍हरेज ब्रँड आहे. आम्‍ही माझाच्‍या अस्‍सल आंब्‍याचा आस्‍वाद ग्राहकांच्‍या दैनंदिन जीवनात आणत माझाचा दर्जा अधिक प्रबळ करण्‍यासाठी आमचे ब्रँड धोरण विकसित करत आहोत. तसेच, आम्‍ही ग्राहकांच्‍या बदलत्‍या डिजिटल जीवनशैलीशी संलग्‍न राहत आमचा ग्राहक सहभाग दृष्टीकोन देखील सुधारत आहोत.'' 

डब्‍ल्‍यूपीपीमधील ओपनएक्‍सचा भाग म्‍हणून ओगील्‍व्‍ही इंडियाने या कॅम्‍पेनची संकल्‍पना मांडली आहे. 


या कॅम्‍पेनमागील क्रिएटिव्‍ह इनासाइटबाबत मत व्‍यक्‍त करत ओगील्‍व्‍ही इंडियाचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर सुकेश नायक म्‍हणाले, ''माझाच्‍या नवीन पोझिशनिंगने आम्‍हाला ब्रँडसाठी नवीन विश्‍वाला एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍यास प्रेरित केले. म्‍हणून, आम्‍ही भारताचे 'आम लोग' असलेल्‍या बॉटलवरील पात्रांसह लहान-लहान विजयाला साजरे करण्‍याबाबतच्‍या गाथा शेअर करण्‍याचे ठरवले. तुमच्‍या व माझ्यासारखे व्‍यक्‍ती दररोज माझासह लहान विजयांना साजरे करण्‍याचा आनंद घेतात. या संपूर्ण कॅम्‍पेनमधून निदर्शनास येते की, माझा जीवनातील प्रत्‍येक लहान विजयाला साजरे करण्‍यासाठी पसंतीचे व आल्‍हाददायी पेय आहे.''   


नवीन कॅम्‍पेन जीवनातील सोप्‍या आनंदांना साजरे करण्‍यासाठी सोबती म्‍हणून माझाच्‍या कटिबद्धतेला दृढ करते, ज्‍यामुळे हे पेय भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये अत्‍यंत लोकप्रिय आहे. भारतीयांच्‍या आंब्‍यांप्रती असलेल्‍या प्रेमाला साजरे करत आणि लहान विजयांसाठी अल्टिमेट ट्रीट म्‍हणून स्‍वत:ला स्‍थापित करत माझा अस्‍सल हापूस आंब्‍यांचा स्‍वाद देत आहे. तसेच स्‍वादिष्‍ट आंब्‍यांचा आस्‍वाद देत वैयक्तिक अभिमानाला जागृत करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.