टोनटॅगची ७८ दशलक्ष यूएस डॉलर्सची निधी उभारणी
मुंबई, २७ फेब्रुवारी २०२५: नाफा इनोव्हेशन्स प्रा. लि. (टोनटॅग) या भारतातील आघाडीच्या वॉईस-बेस्ड पेमेंट व कॉमर्स सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने आपल्या सिरीज बी२ फंडिंग राऊंडमध्ये ६७४ कोटी रूपयांची गुंतवणूक मिळवली आहे. या फंडिंगमध्ये प्राथमिक व दुय्यम भांडवलाचा समावेश आहे, तसेच या फंडिंग राऊंडचे व्हॅल्यूक्वेस्ट फंड आणि राऊंडमध्ये ५० टक्क्यांहून अधिक योगदान दिलेले तिचे सह-गुंतवणूकदार, आयर्न पिलर, एलीव्हेट इन्फ्लेक्शन कॅपिटल एलएलसी यांनी नेतृत्व केले आहे. विद्यमान गुंतवणूकदार एलीव्हेट इनोव्हेशन पार्टनर्स एलएलसी देखील या राऊंडमध्ये सहभाग घेत आहे. ही गुंतवणूक टोनटॅगला ग्राहकांच्या पेमेंट अनुभवांमध्ये सुधारणा करण्यास आणि त्यांच्या जागतिक विस्तारीकरणाला चालना देण्यास सक्षम करेल.
प्रतिदिन ३० दशलक्षहून अधिक इंटरअॅक्शन्ससह टोनटॅग आपल्या पेटण्टेड साऊंडवेव्ह प्रोटोकॉलचा फायदा घेत ग्राहकांना विनासायास सोल्यूशन देत आहे. या स्तरावर त्यांच्या स्थिरतेमधून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादन कंपन्या निर्माण करण्यामध्ये भारताची क्षमता दिसून येते. टोनटॅगमध्ये जागतिक टेक कंपन्या आणि बी२बी सास ऑफरिंगमधील त्यांच्या ग्राहकांमधील आघाडीच्या भारतीय बँकांचा समावेश आहे.
कंपनीच्या नाविन्यतेप्रती कटिबद्धतेवर आघाडीचे गुंतवणूकदार आणि सहयोगींनी विश्वास दाखवला आहे. उभारण्यात आलेला निधी कार्यसंचालनांमध्ये वाढ करण्यासाठी, आरअँडडी प्रयत्न प्रगत करण्यासाठी, दर्जात्मक टॅलेंट रिक्रूट करण्यासाठी आणि विपणन उपक्रमांमध्ये वाढ करण्यासाठी वापरण्यात येईल. टोनटॅग अधिकाधिक ग्राहकांपर्यंत आपले परिवर्तनात्मक सोल्यूशन्स पोहोचवण्यासाठी आशिया, दक्षिण अमेरिका आणि मिडल ईस्टमधील नवीन बाजारपेठांबाबत माहिती देखील सादर करत आहे.
टोनटॅगचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार अभिषेक म्हणाले, ''या फंडिंग राऊंडमधून आमचा दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान क्षमतेमध्ये गुंतवणूकदारांचा असलेला विश्वास दिसून येतो. त्यांच्या पाठिंब्यासह आम्ही ग्राहकांना अचंबित करणारे अनुभव देण्यामध्ये आणि जागतिक स्तरावर आमच्या सोल्यूशन्सचा विस्तार करण्यामध्ये भावी झेप घेण्यास सज्ज आहोत. हा टोनटॅगसाठी, तसेच भारतातील उत्पादन नाविन्यता लँडस्केपसाठी देखील महत्त्वपूर्ण टप्पा आहे.''