माँडेलीझ इंडियाचा २०० हेल्थ अँड वेलनेस सेंटर्सना पाठिंबा
~ १.४५ दशलक्ष व्यक्तींसाठी आरोग्यसेवा उपलब्धता दृढ केली ~
मुंबई, ११ मार्च २०२५: माँडेलीझ इंडियाने आपला दशकभरापासूनचा सीएसआर उपक्रम ‘शुभ आरंभ'च्या माध्यमातून सोलन (हिमाचल प्रदेश), भिंड (मध्यप्रदेश), तिरूपती (आंध्रप्रदेश) आणि पुणे (महराष्ट्र) या चार जिल्ह्यांमील २०० हेल्थ अँड वेलनेस सेंटर्सना पाठिंबा देत प्राथमिक आरोग्यसेवा दृढ करण्यास मदत केली. या प्रयत्नाने ८०० हून अधिक गावांमध्ये आवश्यक वैद्यकीय सेवा प्रबळ केल्या आहेत, १.४५ दशलक्षहून अधिक व्यक्तींपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवल्या आहेत, ज्यांना पूर्वी मर्यादित स्वरूपात आरोग्यसेवा उपलब्ध होत होत्या. मातृत्व बालकाचे आरोग्य सुधारत, असंसर्गजन्य आजारांच्या व्यवस्थापनाला पाठिंबा देत आणि समुदाय सहभागाला प्रेरित करत हा उपक्रम व्यक्तीच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो, ज्यामधून अधिकाधिक कुटुंबांना आवश्यक असलेले केअर मिळते.
भारत सरकारच्या आयुष्मान आरोग्य मंदिर उपक्रमाशी संलग्न असलेल्या ब्रँडने संबंधित सरकारी अधिकाऱ्यांकडे महत्त्वपूर्ण प्रभाव अहवाल सादर केला आहे, ज्यामधून या २०० हेल्थ अँड वेनेस सेंटर्सचे व्यवस्थापन करण्याबाबत प्रमुख माहिती निदर्शनास येते. या उपक्रमामुळे रूग्ण उपस्थितीमध्ये ५८ टक्के वाढ झाली, तर ११,६१८ उच्च-जोखीम असलेल्या गर्भधारणा ओळखण्यात आल्या आणि विशेष केअरसाठी संदर्भ देण्यात आल्या. तसेच, पाच वर्षांखालील ७,८०० हून अधिक मुलांना प्रगत उपचारासाठी संदर्भ देण्यात आला, तर १६० जन आरोग्य समित्यांना समुदाय-संचालित आरोग्यसेवा देखरेख वाढवण्यासाठी टूल्ससह सुसज्ज करण्यात आले. अत्यावश्यक वैद्यकीय सेवांची उपलब्धता सुधारून या उपक्रमामुळे खिशाला न परवडणाऱ्या वैद्यकीय खर्चात २१ टक्के कपात झाली आहे, ज्यामुळे स्थानिक समुदायांसाठी आरोग्यसेवा अधिक परवडणारी बनली आहे.
माँडेलीझ इंडियाच्या उपाध्यक्ष, सीजीए प्रमुख (भारत व एएमईए) ओफिरा भाटिया म्हणाल्या, “दशकापासून आम्ही समुदायांना प्रबळ करण्यावर आणि उदरनिर्वाह सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या कटिबद्धतेचा भाग म्हणून आम्ही आरोग्यसेवेला प्रमुख प्राधान्य दिले, ज्यामधून दर्जेदार वैद्यकीय सेवांची खात्री मिळते. आम्ही सरकार नेतृत्वित हेल्थ अँड वेलनेस सेंटर प्रबळ करत तळागाळापासून उपलब्धता, किफायतशीरपणा आणि सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांसोबत सहयोगाने काम केले. आम्ही ८०० हून अधिक गावांमध्ये बदल घडवून आणण्यामध्ये यशस्वी ठरलो आहोत. या उपक्रमामधील माहिती देशभरातील प्राथमिक आरोग्यसेवा विस्तारित करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक व समुदाय-केंद्रित आरोग्यसेवा सोल्यूशन्सचे महत्त्व दाखवण्यासाठी आदर्श ठरेल.''