मुंबई एआय २०३५ अहवालाचे अनावरण
आशियातील सर्वात मोठा एआय आणि टेक इव्हेंट मुंबई टेक वीक २०२५ मध्ये 'मुंबई एआय २०३५: इंडियाज हब ऑफ एआय अॅडॉप्शन अँड प्रॉफिटेबल इनोव्हेशन' या अहवालाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी अमृता सिंग, पार्टनर, मॅककिन्से अँड कंपनी, सत्य प्रतिपती, सिनियर पार्टनर, मॅककिन्से अँड कंपनी, निखिल व्यास, पार्टनर, मॅककिन्से अँड कंपनी, आकृत वैश, सह-अध्यक्ष, टीम, नय्या सग्गी, एडिशन (ईडीटी), गुडग्लॅम आणि टीम प्रवक्ते उपस्थित होते. हा अहवाल भारताची एआय राजधानी म्हणून मुंबईचा उदय, स्टार्टअप इकोसिस्टमची जलद वाढ आणि येत्या दशकात एआय-आधारित नवोपक्रमांचे संभाव्य आर्थिक परिणाम यावर प्रकाश टाकतो.