Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाद्वारे स्थानिक स्तरावर ५ लाख इंजिन्सचे उत्पादन

 स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाद्वारे स्थानिक स्तरावर ५ लाख इंजिन्सचे उत्पादन



मुंबई, १७ मार्च २०२५: स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAVWIPL) ने आपल्या चाकण, पुणे येथील अत्याधुनिक उत्पादन सुविधेत स्थानिक पातळीवर ५,००,००० इंजिन्सचे उत्पादन करून उत्पादनात आणखी प्रगती केली आहे. यामधून देशातील आणि जागतिक बाजारपेठांना पॉवरट्रेन सोल्यूशन्सचा पुरवठा करण्याबरोबरच या ग्रुपची उत्पादनक्षमता आणि ‘मेक इन इंडिया’ अभियानाशी असलेली निष्ठा प्रतिबिंबित होते.

हा महत्त्वाचा टप्पा फॉक्सवॅगन समूहासाठीचा मुख्य उत्पादक म्हणून भारताची स्थिती मजबूत करतो. शाश्वत उत्पादन आणि तांत्रिक प्रगतीवर भर देत, ही चाकणची सुविधा या समूहाच्या जागतिक रणनीतीत योगदान देण्याचे धोरण चालू ठेवते.



या महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलताना अँड्रियाज डिक, स्कोडा ऑटो ए. एस. बोर्ड मेंबर फॉर प्रॉडक्शन अँड लॉजिस्टिक्स म्हणाले, “आमच्या पुणे येथील सुविधेत ५,००,००० इंजिने बनविणे ही एक लक्षणीय सिद्धी आहे. यामुळे आमच्या जागतिक उत्पादन नेटवर्कमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत झाली आहे. टेक्नॉलॉजी आणि कार्यबल विकास यामध्ये आम्ही केलेल्या गुंतवणुकीमुळे आमची उत्पादन क्षमता वाढत आहे आणि दर्जेदार आणि किफायतशिर पॉवरट्रेन्सचे उत्पादन होत आहे. भारतातील प्रगत उत्पादन ईकोसिस्टम आणि कुशल कार्यबल यांची दर्जेदार आणि कार्यक्षम पॉवरट्रेन सोल्यूशन्स द्वारे जागतिक मागणी पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका आहे. आम्ही प्राप्त केलेल्या या सिद्धीमुळे या समूहाच्या आंतरराष्ट्रीय संचालनाला आणि भावी विकासाला समर्थन देण्याच्या भारताच्या क्षमतेमधील आमचा विश्वास दृढावला आहे.”



स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनिजिंग डायरेक्टर आणि सीईओ पियुष अरोरा म्हणाले, “ही सिद्धी पॉवरट्रेन उत्पादनात लोकलाईझेशन आणि इनोव्हेशन प्रती असलेली आमची वचनबद्धता अधोरेखित करते. २०१४ पासून आम्ही एक मजबूत पाया घातला आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही मार्केटच्या गरजा जागतिक दर्जाच्या इंजिन्सद्वारे पूर्ण करत आहोत. आमच्या मेड-इन-इंडिया इंजिन्समध्ये असलेल्या उच्च स्तराच्या लोकलाईझेशनमधून भारतीय ऑटोमोटिव्ह उत्पादन आणि पुरवठा ईकोसिस्टम मजबूत करण्यासाठी या ग्रुपचे स्थानिक स्रोतांचा वापर करण्याचे धोरण आणि योगदान दिसून येते. आमच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि जागतिक-दर्जाच्या ऑटोमोटिव्ह उत्पादनासाठीचे केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी गुंतवणूक करण्याचे आम्ही चालू ठेवणार आहोत.”

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.