फेडएक्सचे ‘सक्षम’च्या माध्यमातून महिला उद्योजकतेला प्रोत्साहन
मुंबई, ९ मार्च २०२५: जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (“फेडएक्स”) ही सलग चौथ्या वर्षी सक्षम उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील सर्वसमावेशक उद्योजकतेला प्रोत्साहन देत आहे. या वर्षी सक्षम उपक्रमाने २७० पेक्षा अधिक महिला उद्योजक तसेच जवळपास १६० एलजीबीटीक्यूआयए+ कम्युनिटी सदस्यांना सक्षम केले. या उद्योजकांना त्यांच्या गरजांनुसार, व्यावसायिक साहित्य असलेली सक्षम किट, मार्गदर्शन आणि विशिष्ट उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाद्वारे टिफिन सेवा, टेलरिंग, हस्तकला, खाद्यपदार्थ सेवा आणि ब्युटी या क्षेत्रातील लहान व्यवसायांना सहाय्य करण्यात आले. जेणेकरून या व्यवसायिकांना विस्तार करण्यास व यशस्वी होण्यासाठी मदत मिळेल.
महिलांना पुरुषांच्या बरोबरीने व्यवसाय सुरु करण्यास आणि वाढवण्यासाठी एकत्रितपणे आणि सतत प्रयत्न केले तर ५ ते ६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स एवढे नवीन जागतिक उत्पादन मिळू शकते, असे ग्लोबल आंत्रप्रेन्योरशिप मॉनिटर यांनी विशेषत्वाने सांगितले आहे, अशी माहिती फेडएक्सचे इंडिया ऑपरेशन्स उपाध्यक्ष सुवेंदू चौधरी यांनी दिली. भारतात महिलांच्या मालकीचे २.२ कोटी उद्योग आहेत. त्यांची क्षमताही मोठी आहे. मात्र भांडवल, व्यावसायिक माहिती आणि बाजारपेठेत प्रवेश यांतील अडचणी अजूनही कायम आहेत. सक्षम उपक्रमाद्वारे युनायटेड वे च्या सहकार्याने फेडएक्स ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच महिला उद्योजकांना भक्कम व्यवसाय स्थापन करण्यास तसेच आर्थिक वृद्धीकरिता हातभार लावत आहे.
युनायटेड वे मुंबई यांच्या सहकार्याने २०२१ मध्ये सुरुवातीपासून ‘सक्षम’ने महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. फक्त २०२४ मध्ये ज्या लाभार्थ्यांचे उत्पन्न काहीही नव्हते, त्यापैकी ३८% जणांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ६१,१७६ रुपये एवढे आहे. तर ज्यांचे उत्पन्न वर्षाला १५,००० रुपये रुपयांपेक्षा कमी होते, त्यांचे सरासरी उत्पन्न ६६,७८२ रुपयेपर्यंत पोहोचले आहे. उपक्रमामुळे झालेल्या थेट आर्थिक प्रगतीचे संकेत या आकडेवारीवरून मिळतात.
सर्वसमावेशक वाढीसाठीच्या व्यापक वचनबद्धतेचा भाग म्हणून सक्षम एलजीबीटीक्यूआयए+ कम्युनिटलाही पाठिंबा देते. या उपक्रमात सहभागी होण्यापूर्वी ४५ टक्के लाभार्थी बेरोजगार होते. त्यापैकी ६८ टक्के जणांना आता खासगी क्षेत्रात दरमाह १४,०००–१५,००० रुपये कमावत आहेत. तर २३ टक्के लोकांनी सांस्कृतिक कायक्रम, ब्युटी सर्व्हिस आणि टेलरिंगमध्ये यशस्वी उपक्रम सुरु केले आहेत.