अल्ट डीआरएक्सने रिअल इस्टेट पोर्टफोलिओ लॉन्च केला
~ मुंबईतील उपनगरांमध्ये रिअल इस्ट्रेट गुंतवणूक संधी ~
मुंबई, ९ मार्च २०२५: अल्ट डीआरएक्स या डिजिटल रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट फर्म मुंबईतील झपाट्याने वाढणाऱ्या उपनगरांकरिता एक महत्त्वाच्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचे लाँचिंग केले आहे. हा धोरणात्मक उपक्रम भारतातील सर्वात वेगवान रिअल इस्टेट बाजारपेठांपैकी एक असलेल्या मार्केटमधील गुंतवणूकदारांना अतुलनीय संधी उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
या पोर्टफोलिओतील सुरुवातीची प्रॉपर्टी म्हणजे ठाणे येथील लोढा ग्रुपचा प्रमुख लोढा अमरा हा विकास प्रकल्प आहे. मुंबई उपनगरीय निवासी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी या पोर्टफोलिओद्वारे देण्यात येत आहे. या ग्रेड ए डेव्हलपरची प्रॉपर्टी एका शांत खाडीच्या जवळ उत्कृष्ट ठिकाणी आहे. यासोबतच इथे गर्द झाडांचे अप्रतिम दृश्य पहावयास मिळते.
अल्ट डीआरएक्सचे संस्थापक अविनाश राव म्हणाले, “या पोर्टफोलिओचे लाँचिंग हे केवळ रिअल इस्टेटबद्दल नाही. तर व्यक्ती आणि कुटुंबांना भविष्यातील गुंतवणुकीचा मार्ग तयार करून देण्यासाठी आहे. मुंबईची बाजारपेठ संथ गतीने वाढणारी असली तरी तिच्या उपनगरांमध्ये भांडवल वृद्धी आणि भाडे परतावा या दोन्हींसाठी प्रचंड वाव आहे. ग्रेड ए बिल्डर्सकडून निवडलेल्या उच्च गुणवत्तेच्या प्रॉपर्टीमध्ये प्रवेश देऊन गुंतवणूकदारांना सक्षम करणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरून ते या भरभराटीच्या भागात आत्मविश्वासाने गुंतवणूक करतील.”
अल्ट डीआरएक्सच्या पोर्टफोलिओत घाटकोपर ते कल्याण कॉरिडॉर तसेच अंधेरी ते विरार पट्टा यांसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या उपनगरीय भागांमध्ये लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. किफायतशीर, सुधारीत रस्त्यांचे जाळे आणि कार्यालयीन जागांची वाढती मागणी या आधारे सदर प्रदेशांची निवड करण्यात आली आहे. याद्वारे त्यांना चिरंतन विकासाकरिता प्रमुख ठिकाण बनवले जाते.
अल्ट डीआरएक्सचा पोर्टफोलिओ खऱ्या अर्थाने वेगळा यासाठी आहे की, गुणवत्ता आणि सुलभतेसाठी त्यांची बांधिलकी आहे.अल्ट डीआरएक्स निवडक ग्रेड ए बिल्डर्ससोबत करार करून प्रत्येक प्रॉपर्टीचे बांधकाम आणि डिझाइन उच्च प्रतीचे राखण्याची खात्री देते. या विशिष्ट दृष्टीकोनामुळे महत्त्वाचे फायदे मिळतात. उदा. प्रतिष्ठित बिल्डर्सच्या प्रॉपर्टींना आणखी चांगले भाडे मिळते. यासोबतच अल्ट डीआरएक्सद्वारे ग्राहकांसाठी गुंतवणकीचा मार्ग सोपा करण्यात आला आहे. यामुळे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये त्यांना विस्तारीत संशोधन आणि योग्य तपासणीची गरज भासणार नाही. कमी दरात गुंतवणूक देऊन अल्ट डीआरएक्स प्रीमियम रिअल इस्टेट संधींमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.
मुंबईच्या उपनगरांध्ये घरांची वाढती मागणी ही गुंतवणूकदारांसाठी अनोखी संधी आहे. या पोर्टफोलिओद्वारे प्रॉपर्टी वापराची थेट गरज पूर्ण होत नसली तरी विकासासाठी सज्ज असलेल्या भागांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा लाभदायक आहे. तसेच लोढा अमरा ही सुरुवातीची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे अल्ट डीआरएक्सने भविष्यातील अधिग्रहणांसाठी झपाट्याने वाढणाऱ्या निवडक भागांमध्ये सकारात्मक गुंतवणुकीची एक लहान यादी तयार केली आहे. स्थैर्य आणि वाढ शोधणाऱ्या गुंतवणूकदारांच्या विकसाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या प्रॉपर्टीसहह आपला पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी फर्म वचनबद्ध आहे.