कियारा आडवाणी बनली व्हॅनेसाची नवी ब्रॅंड अम्बॅसडर
मुंबई, ८ एप्रिल २०२५: आधुनिक महिलांसाठीचा प्रीमियम सुगंध ब्रॅंड- व्हॅनेसाने बॉलीवूड तारका कियारा आडवाणीला आपली नवीन ब्रॅंड अम्बॅसडर म्हणून नेमल्याची घोषणा केली आहे. हा रोमांचक सहयोग व्हॅनेसाच्या प्रवासातील एक लक्षणीय टप्पा आहे, जो महिलांना सशक्त करून त्यांच्यात आत्मविश्वास प्रेरित करण्याबाबतची आपली वचनबद्धता मजबूत करत आहे.
आपले सौंदर्य, मोहकता आणि अस्सलपणा याबद्दल ओळखल्या जाणाऱ्या कियारा आडवाणीमध्ये व्हॅनेसाचे गुणधर्म मूर्तिमंत स्वरूपात आहेत. चित्रपट उद्योगातील तिच्या वाटचालीतून तिचा आत्मविश्वास आणि स्वतःला अभिव्यक्त करण्याची क्षमता स्पष्ट दिसते, ज्याचे ब्रॅंडच्या तत्वज्ञानाशी पुरेपूर साधर्म्य आहे.
कियारासाठी अंगाला लावण्याचा सुगंध हा केवळ एक वास नाही, तर तो तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विस्तार आहे. कियाराच्या सुगंधविषयक व्यक्तिगत आवडीनिवडीमधून तिचे चैतन्यमय व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होते. ती दिवसा ताजे आणि फुलांचे सुगंध वापरते, तर संध्याकाळी सुखद अंबर नोट्स! या सहयोगाच्या मदतीने व्हॅनेसा हा दुहेरी पैलू आपल्या कलेक्शनमध्ये समाविष्ट करू इच्छित आहे. आपल्या सुगंधांमध्ये वैविध्य आणि शालीनता शोधणाऱ्या आधुनिक उपभोक्त्यांच्या अभिरुचीला साजेसे हे कलेक्शन असेल.
आपला उत्साह व्यक्त करताना कियारा आडवाणी म्हणाली, “व्हॅनेसाशी सहयोग करताना मी रोमांचित झाले आहे. माझ्यासाठी, आत्मविश्वासाचा अर्थ स्वतःचे ‘स्व’त्व स्वीकारणे, स्वतःची ताकद आणि हळवेपणा स्वीकारणे आणि सच्चेपणाने जीवन जगणे. त्यामुळे व्हॅनेसासोबत काम करणे माझ्यासाठी खास आहे. कारण हा ब्रॅंड वैयक्तिक अभिरुचीचा मान ठेवतो, जे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे.”
हॅमिल्टन सायन्सेस प्रा. लि. चे एमडी आणि सीईओ सौरभ गुप्ता म्हणाले, “आम्ही कियारा आडवाणीचे व्हॅनेसा परिवारात सहर्ष स्वागत करत आहोत. कियारा आपला डौल, मोहकता आणि अपीलमधून आमच्या ब्रॅंडचे गुणधर्म साकार करते. तिचा आजवरचा प्रवास आणि तिचे व्यक्तिमत्व यांचे वैयक्तिक अभिरुची आणि आधुनिक स्त्रीत्व साजरे करण्याच्या व्हॅनेसाच्या तत्वज्ञानाशी खूप साधर्म्य आहे. मला खात्री आहे की, ही भागीदारी महिलांना आपले व्यक्तिमत्व जपण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी प्रेरित करेल.”
कियाराशी सहयोग करून व्हॅनेसाने कणखर, प्रेरणादायक महिलांसोबत काम करण्याची आपली परंपरा चालू ठेवली आहे. या परंपरेतील त्यांची पहिली ब्रॅंड अम्बॅसडर करीना कपूर खान होती. आता कियारा या भूमिकेत आल्यानंतर या ब्रॅंडच्या कालातीत सत्वाचा मान राखत ती या ब्रॅंडसाठी एक नवीन, आधुनिक दृष्टिकोन घेऊन आली आहे.