Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पेटीएमवर युपीआय स्टेटमेंट डाउनलोड करणे झाले सोपे

 पेटीएमवर युपीआय स्टेटमेंट डाउनलोड करणे झाले सोपे

मुंबई, २७ मे २०२५: भारतातील आघाडीचे मोबाईल पेमेंट व वित्तीय सेवा व्यासपीठ पेटीएम (Paytm) आता कर भरणा, बजेट नियोजन किंवा एक्सेल आधारित खर्च ट्रॅकिंगसाठी युपीआय स्टेटमेंट सहज डाउनलोड करण्याची सुविधा देते. केवळ काही टॅप्समध्ये, वापरकर्ते आपला युपीआय व्यवहार इतिहास पी.डी.एफ. किंवा एक्सेल फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकतात, जे कर बचतीसाठीचे दस्तऐवज, रिइम्बर्समेंट क्लेम, वैयक्तिक बजेटिंग किंवा मासिक खर्च विश्लेषणासाठी उपयुक्त आहे.

हे नवीन फिचर पेटीएमच्या आर्थिक माहितीच्या स्मार्ट व्यवस्थापनासाठी असलेल्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. पेमेंटशी संबंधित कोणतीही अडचण सोडवायची असो, मागील खर्च तपासायचा असो, किंवा आपल्या सी.ए. (चार्टर्ड अकाउंटंट) किंवा आर्थिक सल्लागारासोबत माहिती शेअर करायची असो — या स्टेटमेंटमध्ये तारीख, वेळ, रक्कम, प्राप्तकर्ता नाव व इतर सर्व महत्त्वाची माहिती समाविष्ट असते, जेणेकरून प्रत्येक युपीआय व्यवहार व्यवस्थित नोंदवलेला असतो.

अ‍ॅक्सिस बँक, येस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, किंवा एच.डी.एफ.सी. बँक यांद्वारे लिंक असलेल्या खात्यांसाठी हे फिचर सर्व पेटीएम युपीआय वापरकर्त्यांना उपलब्ध आहे. विशेषतः जे वापरकर्ते एक्सेल वापरून आर्थिक व्यवस्थापन करतात किंवा आयकर भरतात त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.




पेटीएमवर आपले युपीआय स्टेटमेंट (पी.डी.एफ. किंवा एक्सेलमध्ये) कसे डाउनलोड करावे:

1.         पेटीएम अ‍ॅप उघडा आणि होम स्क्रीनवर ‘बॅलन्स अँड हिस्टरी’ वर टॅप करा.

2.         खाली स्क्रोल करा आणि ‘पेमेंट हिस्टरी’ शेजारील तीन बिंदू असलेल्या मेनूवर टॅप करा.

3.         ‘डाउनलोड युपीआय स्टेटमेंट’ निवडा.

4.         दिनांक श्रेणी किंवा आर्थिक वर्ष निवडा.

5.         पी.डी.एफ. किंवा एक्सेल — तुमचा पसंतीचा फॉरमॅट निवडा.

6.         ‘रिक्वेस्ट’ वर टॅप करा — तुमचे स्टेटमेंट ‘रिक्वेस्टेड स्टेटमेंट्स' विभागात दिसेल.

 

तुम्ही कर भरत असाल, मासिक खर्च नियंत्रित करत असाल, किंवा आर्थिक दस्तऐवजासाठी युपीआय इतिहास डाउनलोड करत असाल तर पेटीएमचे हे सोपे युपीआय स्टेटमेंट डाउनलोड फिचर कोणत्याही अडचणीशिवाय विश्वासार्ह, जलद आणि सुरक्षित मार्गाने आपली माहिती व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.