हॅबिल्डचा 'हर घर योग' उपक्रम
मुंबई, १२ जून २०२५: हॅबिल्ड या भारतातील पहिल्या हॅबिट बिल्डिंग प्लॅटफॉर्मने आपला नवीन उपक्रम 'हर घर योग'च्या शुभारंभाची घोषणा केली आहे. 'योग फॉर वन अर्थ, वन हेल्थ' थीम असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ पूर्वी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम सर्वांगीण आरोग्यासाठी जागतिक आवाहनाशी संलग्न आहे.
१०० हून अधिक देशांमध्ये १ कोटीहून अधिक सहभागींचा विस्तृत समुदाय असण्यासह हॅबिल्डचा आता प्रत्येक घरामध्ये योगाची क्षमता आणण्याचा मनसुबा आहे. आयआयटीचे माजी विद्यार्थी, सरकार प्रमाणित योग तज्ञ आणि हॅबिल्डचे सह-संस्थापक सौरभ बोथरा यांच्या नेतृत्वांतर्गत हा उपक्रम समान जागतिक सराव म्हणून सातत्यता, उपलब्धता आणि आरोग्याच्या संकल्पनेला चालना देतो. 'हर घर योग' उपक्रमाची मोठ्या प्रमाणात डिजिटल-फर्स्ट आऊटरिच म्हणून संकल्पना मांडण्यात आली आहे, ज्यामध्ये उद्देश आणि कार्यक्षमतेचे संयोजन आहे.
हा उपक्रम योगाला फिटनेस क्रियाकलापासह शाश्वत दैनंदिन सवय म्हणून रूळवतो, जी वय, लिंग किंवा फिटनेस पातळी कोणतीही असो प्रत्येकजण आत्मसात करू शकतो. भावनिकदृष्ट्या संलग्न होण्यासाठी, तसेच लहान, दैनंदिन कृतींच्या माध्यमातून वर्तणूकीला चालना देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या व्हिडिओ गाथांच्या सिरीजद्वारे संदेश दिला जात आहे.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत हॅबिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक सौरभ बोथरा म्हणाले, ''योग टास्क नाही तर एक दिवसाचे सेलिब्रेशन सारखे वाटले पाहिजे. 'हर घर योग'सह आम्ही योगाच्या माध्यमातून वेलनेस सहजसाध्य, मोफत अनुभव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातत्यपूर्ण करत आहोत. आमचा योगाला दैनंदिन सवय करण्याचा मनसुबा आहे.''