पेटीएमची वैयक्तिकृत युपीआय आयडी सुविधा
~ पेमेंट प्रायव्हसी सुधारण्यासह मोबाईल नंबर एक्सपोज होण्यापासून रोखणार ~
मुंबई, ११ जून २०२५: पेटीएमने वैयक्तिकृत युपीआय आयडी सुविधा सादर केली आहे, जी प्रायव्हसी वाढवते आणि मोबाइल पेमेंट करण्याचा अधिक लवचिक मार्ग देते. हा पुढाकार कंपनीच्या रोजच्या डिजिटल पेमेंट्सला सुलभ आणि सुरक्षित बनवण्याच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे. ही नवीन सेवा वापरकर्त्यांना नाव@पीटीयेस किंवा नाव@पीटीएक्सिस यांसारखी वैयक्तिकृत युपीआय आयडी निवडण्याची अनुमती देते, ज्यामुळे व्यक्ती आपला मोबाईल नंबर उघड न करता पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतात. ही सेवा सध्या येस बँक आणि एक्सिस बँक यांनी जारी केलेल्या हँडल्सवर उपलब्ध आहे आणि लवकरच इतर बँकिंग भागीदारांपर्यंत विस्तारित केली जाईल.
तुम्ही एखाद्या दुकानदाराला पैसे देत असाल, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हसोबत हिशेब करत असाल, किंवा नवीन विक्रेत्याकडे पैसे ट्रान्सफर करत असाल, तरीसुद्धा पेटीएम हे भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि सुरक्षित पेमेंटचे साधन राहते. वैयक्तिकृत युपीआय आयडी सह पेटीएम आता अधिक प्रायव्हसी प्रदान करते. जेव्हा वापरकर्ता त्याच्या वैयक्तिकृत युपीआय आयडीचा वापर करून पैसे पाठवतो किंवा प्राप्त करतो, तेव्हा त्याचा मोबाईल नंबर व्यवहाराच्या तपशीलात दिसत नाही. हे वैयक्तिक माहितीचे संरक्षण करते आणि व्यक्तींना एक अद्वितीय आणि सहज ओळखता येणारी पेमेंट ओळख निर्माण करण्याची अनुमती देते. हे एक अखंड अनुभव आहे, जो विश्वास, सुरक्षा आणि दररोजच्या सोयीसाठी तयार केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, पेटीएम आता युएई, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस, भूतान, श्रीलंका आणि नेपाळमध्ये युपीआय पेमेंट्स सक्षम करतो, ज्यामुळे जागतिक भारतीय प्रवाश्यांसाठी अधिक सोयी मिळते.
पेटीएम प्रवक्त्याने सांगितले, “आम्ही पेमेंटमध्ये अधिक पर्याय आणि प्रायव्हसी प्रदान करण्यासाठी वैयक्तिकृत युपीआय आयडी सादर केली आहे. आमच्या ग्राहकांकडून आम्हाला असा फीडबॅक मिळाला की त्यांना त्यांचा मोबाईल नंबर खाजगी ठेवायचा आहे, आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही हे समाधान तयार केले. आम्ही अशा विचारपूर्वक नवकल्पनांच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत ज्या सर्वांसाठी पेमेंट्स अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवतील.”
पेटीएम अॅपमध्ये वैयक्तिकृत युपीआय आयडी तयार करण्यासाठी:
● पेटीएम अॅप उघडा
● प्रोफाइल चिन्हावर टॅप करा आणि 'युपीआय सेटिंग्ज' मध्ये जा
● 'मॅनेज युपीआय आयडी' निवडा आणि वैयक्तिकृत आयडी निवडा
● नवीन युपीआय आयडी पेमेंटसाठी वापरण्यासाठी प्राथमिक युपीआय आयडी म्हणून कन्फर्म करा आणि अॅक्टिवेट करा
पेटीएमने मोबाइल पेमेंट्स अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आणखी सात प्रमुख नवकल्पना सादर केल्या आहेत:
१. प्रायव्हसी वाढवण्यासाठी पेमेंट लपवण्याची किंवा उघड करण्याची क्षमता
२. खर्चाचे स्वयंचलित वर्गीकरण आणि मासिक खर्च सारांश
३. मोबाइल होम स्क्रीनवर येणाऱ्या पेमेंट्ससाठी 'रिसिव्ह मनी' विजेट
४. जलद पेमेंटसाठी होम स्क्रीनवर 'स्कॅन अँड पे' विजेट
५. ५००० रुपयापर्यंतच्या लो-वॅल्यू पेमेंटसाठी पेटीएम युपीआय लाइटसाठी ऑटो टॉप-अप
६. चांगल्या आर्थिक ट्रॅकिंगसाठी युपीआय स्टेटमेंट पीडीएफ आणि एक्सेल फॉरमॅटमध्ये डाउनलोड करण्याचा पर्याय
७. सर्व युपीआय लिंक केलेल्या बँक खात्यांतील एकूण बॅलेन्सचे एकत्रित दृश्य – वैयक्तिक बॅलेन्स जोडण्याची गरज नाही.