Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ट्रेडबायनरीने वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत २०,००० रोपे लावली

 ट्रेडबायनरीने वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत २०,००० रोपे लावली


भारतीय नौदल, ठाणे महानगरपालिका आणि वन विभागाची लाभली साथ



मुंबई, ८ जून २०२५: कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी भारताच्या कटिबद्धतेला गती देण्याच्या दिशेने धाडसी पाऊल उचलत ट्रेडबायनरी या आघाडीच्या तंत्रज्ञान व सल्लागार कंपनीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेचे नेतृत्‍व करत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. या मोहिमेअंतर्गत एकाच दिवशी २०,००० रोपे लावण्यात आली. हा उपक्रम भारतीय नौदल, ठाणे महानगरपालिका आणि वन विभागासोबत सहयोगाने राबवण्‍यात आला. यासह ट्रेडबायनरीचा विश्वास दृढ झाला की तंत्रज्ञान व शाश्वतता एकत्र येऊन स्थिर, रिजनेटिव्‍ह भारत घडवता येऊ शकतो. 

भारतीय नौदलाने उपलब्‍ध करून दिलेल्‍या जागेवर आयोजित करण्‍यात आलेल्‍या या इव्‍हेण्‍टमध्‍ये ८० हून अधिक नौदल अधिकारी व त्यांचे कुटुंबिय वृक्षारोपण करण्यासाठी आणि पर्यावरणीय संतुलनाचे संवर्धन करण्यासाठी एकत्र आले. कमांडर अमोद यादव यांच्यासोबत ट्रेडबायनरीचे संस्थापक व संचालक आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे-क्रीक्साइडचे अध्यक्ष युवराज शिधये यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले, तसेच वातावरणाप्रती जागरूक विकासाच्‍या दिशेने धोरणात्‍मक पुढाकाराला गती दिली.

ट्रेडबायनरीचे संस्‍थापक व संचालक युवराज शिधये म्‍हणाले, ''आमच्‍यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करण्‍याप्रती कृती फक्‍त उपक्रम नसून आमच्‍या दीर्घकालीन दृष्टिकोनाचा आधारस्‍तंभ देखील आहे. भारत आपल्‍या निव्‍वळ-शून्‍य महत्त्वाकांक्षांच्‍या दिशेने वाटचाल करत असताना कंपनी आपल्‍या मुलभूत तत्त्वामध्‍ये शाश्वततेचा समावेश करत नवीन मापदंड स्‍थापित करत आहे. प्रत्‍यक्ष हरित कृतींना चालना देत, तसेच जागतिक स्‍तरावर डिजिटल परिवर्तनाला गती देत ट्रेडबायनरी दाखवून देत आहे की उद्योग पर्यावरणाच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी जबाबदारी घेऊ शकतात किंवा त्‍यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. वृक्षारोपण मोहिम व्‍यवसाय विकास आणि हवामान कृतीला एकत्र करण्‍यासाठी मोठ्या चळवळीचा भाग आहे.''




लावण्‍यात आलेले प्रत्‍येक रोपटे झाडापेक्षा अधिक आहे, भारतातील कार्बनचे प्रमाण कमी करण्‍याच्‍या प्रवासामध्‍ये महत्त्वाची, हरित गुंतवणूक आहे, जेथे ही रोपे आगामी दशकांमध्‍ये अनेक टन कार्बन डायऑक्‍साईड शोषून घेतील. या मोहिमेमध्‍ये ट्रेडबायनरीच्‍या नेतृत्‍वामधून पर्यावरण प्रयत्‍नांचे विकेंद्रीकरण करण्‍याची, विविध भागधारकांना समाविष्‍ट करण्‍याची आणि क्षेत्रांमधील उद्योगांना हवामान ध्‍येयांना प्राधान्‍य देण्‍यास प्रेरित करण्‍याची त्‍वरित गरज दिसून येते. या उपक्रमामधून नाविन्‍यता, सर्वसमावेशकता व प्रभाव ही मूल्‍ये दिसून येतात, जी ट्रेडबायनरीच्‍या व्‍यापक मिशनला नव्‍या स्‍तरावर घेऊन जातात.   

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.