Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

द बॉडी शॉप इंडियाला भारतात १९ वर्ष पूर्ण

 द बॉडी शॉप इंडियाला भारतात १९ वर्ष पूर्ण



मुंबई, १० जून २०२५: द बॉडी शॉप भारतात १९ वर्षे साजरी करत आहे. यासह ब्रँडने कार्यसंचालनांसाठी प्रमुख असलेले कर्मचारी, पर्यावरण आणि समुदायांची काळजी घेण्‍याप्रती कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. २००६ पासून ब्रिटीश मूळ असलेल्‍या या प्रतिष्ठित नैतिक ब्‍युटी ब्रँडने उद्देश-केंद्रित कृती, लक्षवेधक सौंदर्य आणि सामाजिक सर्वसमावेशकतेला प्राधान्‍य दिले आहे, तसेच दाखवून दिले आहे की नैतिक सौंदर्य फक्‍त दिनचर्या नाही तर जीवन बदलू शकते. यंदा द बॉडी शॉपने विविध उपक्रम राबवले, सकारात्‍मक सामाजिक व पर्यावरणीय प्रभाव घडवून आणला, तसेच गतीशीलता, प्रतिष्‍ठा व संधीच्‍या माध्‍यमातून सर्वोत्तम जीवन देण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १९ इलेक्ट्रिक ट्रायसायकल्‍स दान केल्‍या.



आपली प्रमुख फेस्टिव्‍ह'२७ मोहिम स्‍पार्क ए चेंज २.० चा भाग म्‍हणून द बॉडी शॉपने प्‍लास्टिक्‍स फॉर चेंज (पीएफसी) सोबत सहयोगाने आपल्‍या साहसी कृती अजेंडाच्‍या माध्‍यमातून अर्थपूर्ण प्रभाव घडवून आणणे सुरू ठेवले आहे. या सहयोगाच्‍या पाच वर्षाला साजरे करत या उपक्रमांतर्गत आधीच २,३३० मेट्रिक टनहून अधिक प्‍लास्टिक कचऱ्याचे विघटन करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे ४.४ दशलक्ष किलोहून अधिक कार्बन डायऑक्‍साइड उत्‍सर्जनाला प्रति‍बंध झाला आहे आणि २,००० हून अधिक कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठित उदरनिर्वाह मिळाला आहे. 

भारतभरातील ग्राहकांचे योगदान मिळालेल्‍या या दान मोहिमेची ३१ मार्च २०२५ रोजी सांगता झाली. या मोहिमेमधून उभारण्‍यात आलेला निधी १९ इलेक्ट्रिक ट्रायसायकल्‍सच्‍या किमतींएवढा आहे. या गेम-चेंजिंग वेईकल्‍स कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लांब अंतरापर्यंत प्रवास करण्‍यास, जास्‍त भार वाहून नेणयस आणि त्‍यांचे मासिक उत्‍पन्‍न मोठ्या प्रमाणात वाढवण्‍यास मदत करतात.




श्रीती मल्‍होत्रा, कार्यकारी अध्‍यक्ष, क्‍वेस्‍ट रिटेल, द बॉडी शॉप इंडिया म्‍हणाल्‍या, ''आम्‍ही भारतात द बॉडी शॉपचा १९वा वर्धापन दिन साजरा करत असताना आम्‍हाला नैतिक सौंदर्य, कम्‍युनिटी ट्रेड आणि उद्देश-केंद्रित कृतीमध्‍ये अग्रस्थानी असण्‍याचा अत्‍यंत अभिमान वाटतो. अग्रगण्‍य मोहिमांपासून तळागाळामध्‍ये प्रभाव घडवून आणण्‍यापर्यंत आम्‍ही नेहमी सकारात्‍मक परिवर्तनाला चालना देत आहोत. प्‍लास्टिक फॉर चेंज अशा सीएफसी सहयोगींसोबतच्‍या सहयोगामधून आमच्‍या सारख्‍या वारसा लाभलेल्‍या ब्रँडची क्षमता दिसून येते. आम्‍ही कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्षम करत आहोत, प्‍लास्टिक प्रदूषणाचे निराकरण करत आहोत आणि समुदायांचा उदरनिर्वाह वाढवत आहोत. हा टप्‍पा गतकाळाला साजरे करण्‍यासोबत सर्वांसाठी अधिक शाश्‍वत व सर्वसमावेशक भविष्‍य घडवण्‍याप्रती नवीन कटिबद्धतेला प्रकाशझोतात देखील आणतो.''  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.