टाटा मोटर्सने नवीन हॅरियर.इव्हीचे उत्पादन सुरू केले
मुंबई, ६ जुलै २०२५: भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्रांतीचे अग्रणी आणि देशातील आघाडीचे एसयूव्ही उत्पादक टाटा मोटर्सने आज हॅरियर.इव्ही या भारतातील अत्यंत दमदार, सक्षम आणि आजवरच्या सर्वात बुद्धिमान अशा एसयूव्हीचे उत्पादन सुरू केले. हॅरियर.इव्हीने आज टाटा मोटर्सच्या पुणे येथील अत्याधुनिक सुविधेच्या प्रॉडक्शन लाइनमधून धमाकेदार पदार्पण केले. बाजारपेठेचा उदंड प्रतिसाद आणि मोठ्या प्रमाणातील बुकिंगचे पाठबळ असलेली हॅरियर.इव्ही आता देशभरातील डीलर्सकडे पोहोचण्यास सज्ज आहे आणि जुलै २०२५ मध्ये डिलिव्हरी सुरू होणार आहे.
क्वॉड व्हील ड्राइव्ह आणि रियर व्हील ड्राइव्ह या दोन ड्राइव्ह कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असलेल्या हॅरियर.इव्हीमध्ये चार आकर्षक रंगांचे पर्याय आहेत- नैनिताल नॉक्टर्न, एम्पॉवर्ड ऑक्साइड, प्रिस्टिन व्हाइट आणि प्युअर ग्रे. या गाडीत खूप वाखाणली गेलेली स्टील्थ आवृत्ती देखील आहे, ज्यात एक गडद मॅट ब्लॅक एक्स्टीरियर आणि संपूर्ण ब्लॅक इंटीरियर आहे. या आक्रमक रंगामुळे गाडी एक ठळक स्टेटमेंट करते.
हॅरियर.इव्हीची बांधणी प्रगत एक्टि.इव्ही+ आर्किटेक्चरवर करण्यात आली असून ती सर्वाधिक टॉर्क आणि भारतीय एसयूव्हीमध्ये आजवर न दिसलेले सगळ्यात जलद एक्सलरेशन देणाऱ्या दमदार क्वॉड व्हील ड्राइव्ह ड्युअल मोटर सेट-अपद्वारा संचालित आहे. अशी हॅरियर.इव्ही म्हणजे परफॉर्मन्सचे मूर्त स्वरूप आहे. एसयूव्हीच्या एका धाडसी, नवीन युगाची सुरुवात करत ती कमांडिंग पॉवर आणि जगातली तसेच सेगमेन्ट मधली पहिली अशी अनेक फीचर्स ऑफर करते. या फीचर्समध्ये सामील आहेत- सॅमसंग निओ क्यूएलईडीद्वारा संचालित हर्मन डिस्प्ले, इमर्सिव्ह डॉल्बी अॅटमॉस अॅकॉस्टिक्स आणि क्रांतिकारी ५४०° सराऊंड व्ह्यू प्रणाली, जी ब्लाइंड स्पॉट ठेवत नाही, अगदी वाहनाच्या खालचे देखील दिसू शकते.