Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारतातील पहिला 'बीएससी इन बिझनेस एआय' अभ्यासक्रम सुरू

 भारतातील पहिला 'बीएससी इन बिझनेस एआय' अभ्यासक्रम सुरू


~ डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ आणि टीमलीज एडटेक यांचा संयुक्त उपक्रम ~


मुंबई, २१ जुलै २०२५: भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाला चालना देण्यासाठी डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ (एचबीएसयू) आणि टीमलीज एडटेक यांच्या संयुक्त प्रयत्नातून भारतातील पहिला ‘बिझनेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ विषयातील पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा बीएससी इन बिझनेस एआय अभ्यासक्रम व्यवसाय समज आणि प्रत्यक्ष एआय कौशल्य यांचा समन्वय साधतो, ज्यात कोर्स दरम्यान वर्क एक्सपीरियंस घेण्याची संधीही आहे.

हा अभ्यासक्रम व्यवसाय आणि तंत्रज्ञान या दोन क्षेत्रातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एआय समजून घेणे, अंमलात आणणे आणि उद्योगांमध्ये त्याचे नेतृत्व करण्याची तयारी या अभ्यासक्रमाद्वारे केली जाईल. अभ्यासक्रमात प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स वर काम, एआय टूल्स वापरण्याचे प्रशिक्षण आणि व्यवसाय आधारित शिक्षण यावर भर दिला जातो.




टीमलीज एडटेकचे संस्थापक आणि सीईओ शांतनू रूज म्हणाले, “भारताला असे प्रोफेशनल्स हवे आहेत जे बिझनेस लीडरप्रमाणे विचार करतील आणि डेटा सायंटिस्टप्रमाणे काम करतील. बीएससी इन बिझनेस एआय हा अभ्यासक्रम ही गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही उचललेले एक धाडसी पाऊल आहे. हा केवळ एक अभ्यासक्रम नाही, तर एआयमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या पुढील पिढीला घडवण्यासाठीचा एक मंच आहे.”

हा भारतातील पहिला बीएससी इन बिझनेस एआय अभ्यासक्रम असून नोकरीसंदर्भातील प्रशिक्षण व प्रोजेक्ट्स आधारित शिक्षणासाठी शैक्षणिक गुण देणारा पहिला अभ्यासक्रम आहे. तसेच उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन एचबीएसयूने सुरू केलेला पहिला करिअर-केंद्रित अभ्यासक्रम आहे.

या उपक्रमाद्वारे, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ भारतातील पहिलं विद्यापीठ ठरतं जे बिझनेस एआयमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करत आहे, आणि त्याद्वारे विद्यापीठाचं नाविन्यपूर्ण शिक्षण व रोजगारक्षमतेबाबतचं वचन पुन्हा एकदा अधोरेखित होतं.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रजनिश कामत म्हणाले, “एचबीएसयूमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना भविष्यातील गरजांसाठी तयार करण्यावर भर देतो. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे आणि एआय तंत्रज्ञानासोबत काम करण्यासाठी आवश्यक असलेली साधने व कौशल्ये मिळतील.”

 

हा बीएससी इन बिझनेस एआय अभ्यासक्रम 'ब्लेंडेड मोड'मध्ये (ऑनलाइन आणि प्रत्यक्ष शिक्षण एकत्र) शिकवला जाईल. विद्यार्थ्यांना उद्योगातील तज्ज्ञ मार्गदर्शन देतील, एआय लॅबमध्ये प्रात्यक्षिक शिक्षण घेतले जाईल आणि मार्केटिंग, फायनान्स, मानव संसाधन व ऑपरेशन्स यासारख्या क्षेत्रात प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. पहिल्या बॅचसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.