टोयोटा इनोव्हाने भारतात २० गौरवशाली वर्षे पूर्ण केली
~ १२ लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास ~
मुंबई, ६ ऑगस्ट २०२५: भारतातील आपल्या प्रवासामध्ये अभिमानास्पद टप्पा गाठत टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने आज टोयोटा इनोव्हाची २० उल्लेखनीय वर्षे साजरी केली. ही कार लाखो भारतीय कुटुंबं व व्यवसायांसाठी विश्वसनीय सोबती ठरली आहे. इनोव्हा, इनोव्हा क्रिस्टा आणि इनोव्हा हायक्रॉस या तीन ऑफरिंग्जमध्ये १२ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करण्यासह ब्रँड अविरत ग्राहक विश्वास आणि दीर्घकालीन मूल्याचे प्रतीक आहे. गेल्या दोन दशकांमध्ये इनोव्हा भारतातील ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सतत विकसित झाली आहे, तसेच 'क्वॉलिटी, ड्यूरेबिलिटी अँड रिलायबिलिटी (क्यूडीआर)' या टोयोटाच्या मुलभूत तत्त्वामध्ये सामावलेली आहे. हा फक्त आकडेवारीचा महत्त्वपूर्ण टप्पा नाही, तर आव्हानात्मक काळात देखील उत्तम कामगिरी केलेल्या इनोव्हामुळे शक्य झालेले अनेक प्रवास, आठवणी आणि क्षणांचे साजरीकरण आहे.
टोयोटा इनोव्हाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत मत व्यक्त करत टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या सेल्स-सर्विस-युज्ड कार बिझनेसचे उपाध्यक्ष श्री. वरिंदर वाधवा म्हणाले, ''टोयोटा इनोव्हाने गेल्या दोन दशकांमध्ये ग्राहकांसोबत भावनिक नाते निर्माण केले आहे. ही कार कुटुंबांसाठी विश्वसनीय सोबती ठरली आहे, तसेच आरामदायीपणा व विश्वसनीयतेसाठी सर्वांना आवडली आहे आणि पिढ्यानपिढ्या लोकप्रिय ठरली आहे. दैनंदिन प्रवास असो किंवा संस्मरणीय रोड ट्रिपचा आनंद घ्यायचा असो इनोव्हा अनेक वैयक्तिक प्रवासांचा भाग राहिली आहे. भावनिक नात्याव्यतिरिक्त इनोव्हा उत्पादन मापदंड म्हणून शक्तिशाली आहे. या कारमध्ये एैसपैस जागा असलेले इंटीरिअर्स, शक्तिशाली रचना आणि सुलभ ड्रायव्हिंगक्षमता आहे, ज्यामुळे भारतातील सर्वात विश्वसनीय व लोकप्रिय एमपीव्ही आहे.''
नाविन्यता आणि उत्क्रांतीचा २० वर्षांचा प्रवास
गेल्या २० वर्षांमध्ये टोयोटा इनोव्हा भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रात सातत्यपूर्ण नाविन्यता आणि ग्राहक-केंद्रित उत्क्रांतीची आदर्श राहिली आहे. २००५ मध्ये लाँच करण्यात आलेल्या इनोव्हाने प्रवासादरम्यान उच्च दर्जाचा आरामदायीपणा, एैसपैस इंटीरिअर्स, टिकाऊ बॉडी-ऑन-फ्रेम रचना आणि प्रगत सुरक्षितता अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह एमपीव्ही श्रेणीला नव्या उंचीवर नेले. २०१६ मध्ये, ब्रँडने इनोव्हा क्रिस्टाच्या लाँचसह साहसी पुढाकार घेतला, जेथे या नवीन कारमध्ये पूर्णत: नवीन डिझाइन, शक्तिशाली इंजिन, प्रीमियम वैशिष्ट्ये व सुधारित सुरक्षिततेची भर केली आणि मालकीहक्क अनुभवाला नव्या उंचीवर नेले.
प्रगतीच्या या भावनेला पुढे नेत, २०२२ मध्ये इनोव्हा हायक्रॉस लाँच करण्यात आली, जी सेल्फ-चार्जिंग हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल तंत्रज्ञानात क्रांतिकारी झेप आहे. ग्राहकांच्या सखोल समजूतीवर आधारित हायक्रॉस आरामदायीपणा, कामगिरी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, तसेच इनोव्हाला घराघरात लोकप्रिय बनवणारी विश्वासार्हता आणि एैसपैस जागा कायम ठेवण्यात आली. सेल्फ-चार्जिंग हायब्रिड पॉवरट्रेन, सुधारित ड्रायव्हिंगक्षमता, आकर्षक क्रॉसओवर-प्रेरित डिझाइन आणि कमी उत्सर्जनासह हायक्रॉसने शाश्वत गतिशीलतेमध्ये नवीन युग सुरू केले आहे. या कारमध्ये टोयोटाची फिफ्थ जनरेशन सेल्फ-चार्जिंग हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टम आहे, ज्यामध्ये २.०-लिटर गॅसोलाइन इंजिन आणि ई-ड्राइव्ह ट्रान्समिशन आहे, जे एकत्रित १३७ केडब्ल्यू (१८६ पीएस)चे अधिकतम पॉवर आऊटपूट देते आणि विभागातील सर्वोत्तम फ्यूएल इकॉनॉमी आहे. या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक एलईडी हेडलॅम्प्ससह ऑटो हाय बीम, आकर्षक फ्रण्ट ग्रिलसह गनमेटल फिनिश, फर्स्ट-इन-सेगमेंट ड्युअल-फंक्शन डेटाइम रनिंग लाइट (डीआरएल) अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. इनोव्हा हायक्रॉसने नोव्हेंबर २०२४ दरम्यान आपल्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या वेळी १,००,००० युनिट्स विक्रीचा टप्पा गाठला, ज्यामधून टोयोटाचा यशस्वी बहु-मार्गीय दृष्टिकोन दिसून येतो. तसेच ब्रँड टोयोटावरील ग्राहकांचा विश्वास वाढवत आहे आणि प्रगत तंत्रज्ञान, अद्वितीय आरामदायीपणा व अपवादात्मक कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या इनोव्हा हायक्रॉसच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होत आहे.
आरामदायीपणा, वैविध्यतता आणि शाश्वत मालकीहक्क मूल्य
टोयोटा इनोव्हाच्या शाश्वत यशामागील प्रमुख कारण म्हणजे या कारची आरामदायीपणा, व्यावहारिकता व अनुकलतेचे विनासायास संयोजन देण्याची क्षमता. पिढ्यानपिढ्या टोयोटाने ग्राहक अभिप्रायांना प्राधान्य दिले आहे, सतत सुरक्षितता, कनेक्टीव्हीटी आणि सोयीसुविधेमध्ये विचारशील सुधारणा सादर केल्या आहेत, तसेच सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव देण्याचा दर्जा कायम ठेवला आहे, ज्यामुळे इनोव्हा घराघरांमध्ये लोकप्रिय ठरली आणि टोयोटा चाहत्यांमध्ये पसंतीचा पर्याय बनली. टोयोटाच्या दीर्घकालीन मालकीहक्क मूल्याच्या प्रख्यात वारसाने या शाश्वत आरामदायीपणाला अधिक प्रबळ केले आहे, ज्यामुळे इनोव्हा विश्वासार्ह वेईकल असण्यासोबत जीवनातील प्रत्येक टप्प्यासाठी विश्वसनीय सोबती देखील आहे.