बिरला ओपस पेंट्स सादर करत आहे भारताची पहिलीच पेंट प्रॉमिस!
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांनी दर्शवली विनामूल्य रि-पेंटिंगची हमी
बिर्ला ओपस पेंट्सचे संपूर्ण विनामूल्य पुन्हा पेंटिंगची सेवा देण्याचे आश्वासन
मुंबई, 18 ऑगस्ट 2025: आदित्य बिर्ला समूहाच्या ग्रासिम इंडस्ट्रीजचा एक भाग असलेल्या बिर्ला ओपस पेंट्सने आज ‘बिर्ला ओपस अशुरन्स’ या आपल्या नव्या अभियानाची सुरुवात केल्याची घोषणा केली. भारतीय पेंट उद्योगात अशा प्रकारची हमी पहिल्यांदाच दिली जात आहे. या उपक्रमातून बिर्ला ओपस पेंट्सचा आपल्या प्रगत उत्पादनांच्या गुणवत्तेवरील प्रगाढ विश्वास दिसून येतो, तसेच ग्राहकांना असामान्य समाधान देण्याची त्यांची वचनबद्धता देखील अधोरेखित होते.
या ब्रॅंडच्या फिल्म्समध्ये ‘बिर्ला ओपस अशुरन्स’च्या अनोख्या प्रस्तावावर आकर्षक पद्धतीने प्रकाश टाकला आहे. यात बिर्ला ओपस पेंट्स संपूर्ण विनामूल्य पुन्हा पेंटिंगची सेवा देण्याचे आश्वासन देते. एक वर्षाची ही रि-पेंटिंग वॉरंटी सर्व संभाव्य हवामान स्थितींचा करून विचारपूर्वक डिझाईन करण्यात आली आहे, जेणेकरून ही खातरजमा होईल की, भिंती चारही मोसमांत चांगल्या स्थितीत टिकून राहतील आणि त्यांच्या टिकाऊपणाची कसोटी होईल. अशाप्रकारे, बिर्ला ओपस अशुरन्स ही उत्पादनाच्या वर्तमान वॉरंटीच्या अतिरिक्त एक वॉरंटी आहे.
या उत्पादनाचे ब्रॅंड अम्बॅसडर विकी कौशल आणि रश्मिका मंदाना आपल्या मोहक रूपात दिसतात. बिर्ला ओपस पेंट्स सोबत त्यांचा यशस्वी सहयोग अद्याप सुरू आहे. या उपक्रमातून रणवीर शौरी, मुरली शर्मा, सीमा पाहवा आणि जावेद जाफरी हे कलाकार देखील वेगवेगळ्या जाहिरातीत दिसतात. या फिल्म्समध्ये विकी आणि रश्मिकाने वेगवेगळे लुक धारण करून या ब्रॅंडचे आश्वासन लोकांपर्यंत पोहोचवले आहे तसेच डिझाईन आणि बांधकाम क्षेत्राच्या समुदायाला बिर्ला ओपस पेंट उत्पादने वापरण्याची शिफारस केल्याबद्दल सर्जनशील व्यत्यय जाहिरात शैलीत धन्यवाद दिले आहेत. या अभियानाच्या माध्यमातून प्रगत उत्पादने असलेला एक खराखुरा विश्वासार्ह ब्रॅंड म्हणून स्वतःला स्थापित करण्याचा बिर्ला ओपस पेंट्सचा उद्देश आहे.
सदर अभियानाबद्दल टिप्पणी करताना बिर्ला ओपस पेंट्सचे सीईओ रक्षित हरगवे म्हणाले, “आमच्या ‘बिर्ला ओपस अशुरन्स’ अभियानातून आमच्या उत्पादनांची असामान्य गुणवत्ता आणि त्यांची कामगिरी यावरील आमचा प्रगाढ विश्वास प्रतिबिंबित होतो. आम्ही हे जाणतो की, घराला रंग देणे हा उपभोक्त्यांसाठी एक मोठा निर्णय असतो आणि ‘बिर्ला ओपस अशुरन्स’ ही त्यांना संपूर्ण आश्वस्त करण्याची आमची एक रीत आहे. खऱ्या अर्थाने ग्राहक-केंद्री ब्रॅंड बनण्याची आमची वचनबद्धता यातून बळकट होते.”
बिर्ला ओपस पेंट्सचे मार्केटिंग हेड इंद्रप्रीत सिंह म्हणाले, “आमच्या संवाद प्रवासात पुढे जात असताना आम्ही ‘बिर्ला ओपस अशुरन्स’चे अनावरण करत आहोत, जे आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेवरील विश्वासाचे एक सशक्त विधान आहे. या फिल्म्समध्ये विनोद आणि आश्वासन यांच्यात अचूक समतोल साधला आहे. विकी आणि रश्मिका यात वेगवेगळ्या रूपात आणि परिस्थितीत प्रकटतात आणि आपली मोहिनी घालतात. ‘बिर्ला ओपस अशुरन्स’च्या माध्यमातून आम्ही आपल्या शब्दाला जगणारा ब्रॅंड घडवत आहोत.”
बॉलीवूड सुपरस्टार विकी कौशल म्हणतो, बिर्ला ओपस पेंट्सशी सहयोग कायम ठेवून त्यांच्यासाठी हे आगळेवेगळे अभियान करताना मी रोमांचित आहे. ‘बिर्ला ओपस अशुरन्स’ एक धाडसी पाऊल आहे, आणि मला वाटते की, घराच्या मालकांना ही कल्पना नक्की आवडेल. हा संदेश जिवंत करून लोकांपर्यंत पोहोचवताना मला खूप मजा आली.”
समस्त भारताची स्टार रश्मिका मंदाना म्हणते, “मी नेहमी गुणवत्ता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी प्रदान करणारा पर्याय निवडते. बिर्ला ओपस पेंट्सच्या ‘अशुरन्स’ अभियानातून हाच विश्वास झळकतो. बिर्ला ओपस पेंट्ससारख्या ब्रॅंडसाठी असे अभियान करताना मला आनंद होत आहे.”
‘बिर्ला ओपस अशुरन्स’ अभियान हिंदी आणि इतर सर्व मोठ्या प्रादेशिक भाषांमध्ये टीव्ही, डिजिटल आणि प्रिंट माध्यमातून चालवून उपभोक्त्यांचा विश्वास जिंकण्याचा आणि हा पेंट वापरुन बघण्यास त्यांना प्रवृत्त करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.
· Birla Opus Assurance TVC Links
Birla Opus Assurance | Vicky Kaushal - Rockstar| Painting Wapas Karke Dene ka Assurance
Birla Opus Assurance | Vicky Kaushal – Royal Salaam| Painting Wapas Karke Dene ka Assurance
Birla Opus Assurance | Rashmika Mandanna - Politician | Painting Wapas Karke Dene ka Assurance
Birla Opus Assurance | Rashmika Mandanna – Chef | Painting Wapas Karke Dene ka Assurance