ऑडी इंडियाच्या डिलर सहयोगींकडून नवीन ‘अशुअर्ड बायबॅक प्रोग्राम' सादर
मुंबई, २८ ऑगस्ट २०२५: ऑडी इंडियाच्या देशभरातील डिलरशिप्सनी नवीन अशुअर्ड बायबॅक प्रोग्राम लाँच केला आहे. हा प्रोग्राम ग्राहकांच्या भावी वेईकल मूल्याला सुनिश्चित करतो, तसेच ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढवतो आणि सणासुदीच्या काळात मागणीची पूर्तता करतो. या प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना ३ वर्षे / ४५,००० किमीनंतर एक्स-शोरूम किमतीवर ६० टक्के आणि ४ वर्षे / ६०,००० किमीनंतर एक्स-शोरूम किमतीवर ५० टक्के हमीपूर्ण भावी मूल्य मिळेल. ही सवलत ऑडी ए४, ऑडी क्यू३, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक, ऑडी ए६, ऑडी क्यू५ आणि ऑडी क्यू७ या सहा मॉडेल्सवर उपलब्ध असेल.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “ग्राहकांसाठी ऑडीचे मालक बनण्याचा आनंद मूल्याच्या बाबतीत समाधानाशी संलग्न आहे. आमच्या डिलर सहयोगींनी लाँच केलेल्या अशुअर्ड बायबॅक प्रोग्रामसह ग्राहकांना पारदर्शक एक्झिट किंमत, तसेच सुलभ वित्तपुरवठा आणि विमा संरक्षण मिळते, जे मुदतीच्या शेवटी मूल्यामधील कोणतीही तफावत दूर करते. आमचा विश्वास आहे की, आमच्या डिलर्सनी लाँच केलेला हा प्रोग्राम सणासुदीच्या काळात लक्झरी गतीशीलतेच्या उपलब्धतेमध्ये वाढ करेल.''
