Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*हाऊसिंग डॉटकॉमद्वारे मेगा होम उत्सवची घोषणा*

 *हाऊसिंग डॉटकॉमद्वारे मेगा होम उत्सवची घोषणा*

~ भारताचा सर्वात मोठा ऑनलाइन प्रॉपर्टी उत्सव ~


मुंबई, १४ सप्टेंबर २०२५: हाऊसिंग डॉटकॉम या देशातील आघाडीच्या रियल इस्टेट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मने आपल्या बहु-प्रतीक्षित वार्षिक इव्हेंट मेगा होम उत्सव २०२५ ची सुरुवात केल्याचे जाहीर केले आहे. या महत्त्वपूर्ण प्रॉपर्टी फेस्टिव्हलची यंदा नववी आवृत्ती असून १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सणासुदीच्या मोसमातच हा उत्सव चालणार आहे. या उत्सवात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना देशभरातील मालमत्तेच्या खास सौद्यांचा शोध घेण्याची नामी संधी मिळेल.


या सणासुदीच्या कालावधीत सर्वत्र भरपूर खरेदी होते. अशा वेळी हाऊसिंग डॉटकॉम आपल्या या संपूर्ण डिजिटल इव्हेंटच्या माध्यमातून निवासी मालमत्ता आणि गुंतवणुकीच्या संधींचे एक व्यापक संकलन सादर करेल. ३८०० पेक्षा जास्त विकासक आणि चॅनल पार्टनर्सचा सहभाग असलेल्या या इव्हेंटमध्ये मुंबई, दिल्ली- एनसीआर, बंगळूर, चेन्नई, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाता सहित ३० पेक्षा जास्त शहरांना सामावून घेण्यात येईल.


गेल्या वर्षी, मेगा होम उत्सवमध्ये ५३ मिलियनपेक्षा जास्त यूझर्सचा सहभाग होता, तर हाऊसिंग न्यू होम २०२५ ने आकर्षक सहभागासह हा टप्पा देखील मागे टाकला. या वर्षी, मेगा होम उत्सव २०२५ हा ५५ मिलियनचा विक्रमी पल्ला पार करेल अशी अपेक्षा आहे. यामधून देशातील सर्वात विश्वसनीय रियल इस्टेट प्लॅटफॉर्म म्हणून हाऊसिंग डॉटकॉमच्या नेतृत्वाची पुष्टी होते.



या वर्षी, नवीन फीचर्स दाखल करून हाऊसिंग डॉटकॉमने घर खरेदी करण्याचा अनुभव अधिक चांगला केला आहे. व्यक्तीविशिष्ट शिफारसी आणि स्मार्ट सर्च टूल्सचा उपयोग करून खरेदीदार आपल्यासाठी आदर्श अशी मालमत्ता सहज शोधू शकतात. हाऊसिंग शॉर्ट्स सारखे परस्पर-संवादी फॉरमॅट आणि वेधक असे ऑडिओ वॉकथ्रू घरांचा शोध घेण्याची प्रक्रिया अधिक आकर्षक बनवतात.


हाऊसिंग डॉटकॉमचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर श्री. अमित मसलदान म्हणाले, “हाऊसिंग डॉटकॉममध्ये आम्ही मानतो की, घर शोधण्याची प्रक्रिया रोमांचक, सुलभ आणि सक्षम करणारी असली पाहिजे. मेगा होम उत्सव २०२५ सह आम्ही बेजोड पर्याय, खास ऑफर्स आणि सत्यापित केलेल्या सूची घेऊन येत आहोत आणि या सर्वांच्या पाठीशी पारदर्शकता आणि विश्वास याबाबतची आमची निष्ठा आहे. त्यामुळे, घर खरेदी करू इच्छिणारे यूझर्स त्यांच्या शोध प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वासाने आणि सुलभतेने संधींचा शोध घेऊ शकतील. हा इव्हेंट म्हणजे केवळ हाऊसिंग डॉटकॉमचा एक उपक्रम नाही, तर विकासक, ब्रोकर्स आणि चॅनल पार्टनर्सच्या आमच्या विश्वसनीय नेटवर्कने केलेला हा एकत्रित प्रयास आहे. गेल्या अनेक वर्षांची त्यांची अढळ वचनबद्धता देशातील लक्षावधी लोकांच्या घर खरेदी करण्याच्या प्रवासाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण ठरली आहे. आम्ही सर्व मिळून एक असा प्लॅटफॉर्म उभारत आहोत, ज्यामध्ये स्केल, कौशल्य आणि सचोटी आहे, ज्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना आपल्या स्वप्नातले घर खरेदी करण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल.


आपल्या मालमत्तांचे प्रदर्शन मांडणाऱ्या काही आघाडीच्या विकासकांमध्ये कासाग्रँड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड, हिरानंदानी डेव्हलपर्स प्रा. लि., सत्त्व ग्रुप, प्रॉव्हीडेन्ट हाऊसिंग लिमिटेड (पुरवांकर ग्रुप), रहेजा ग्रुप, अॅसेट्झ प्रॉपर्टी ग्रुप, आशियाना हाऊसिंग लिमिटेड, गेरा डेव्हलपमेंट्स, कल्पतरू ग्रुप, प्रेस्टीज ग्रुप, सोभा लिमिटेड, आदर्श रियल्टी, रुपारेल रियल्टी, वासवी ग्रुप, सायबरसिटी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., अरविंद स्मार्टस्पेसेस लिमिटेड, प्राइड ग्रुप वगैरेंचा समावेश आहे.


या फेस्टिव्हलदरम्यान घर प्राप्त करणे अधिक सोपे व्हावे यासाठी कित्येक विकासक आकर्षक डील्स ऑफर करत आहेत. उदाहरणार्थ, अॅसेट्झ प्रॉपर्टी ग्रुप निवडक ३ आणि ४ बीएचके घरांवर ३६ महिन्यांचा प्री-ईएमआय हॉलिडे ऑफर करत आहे, तर टीजी डेव्हलपर्स १२ महिन्यांचा ईएमआय हॉलिडे प्रदान करत आहे. जीआरसी इन्फ्रा प्रा. लि. घर सोपवण्यास सुरुवात होईपर्यंत प्री-ईएमआय रिलीफ वाढवून देत आहे, तर ब्रिगेड ग्रुपने खरेदीदारांना आत्ता फक्त २०% आणि बाकीचे मार्च २०२६ पर्यंत देण्याची सूट दिली आहे- शिवाय पहिल्या १०० घरांसाठी विशेष लॉन्च लाभ देखील देऊ केले आहेत. या व्यतिरिक्त, कासा मर्यादित कालावधीची ’९६ अवर्स ऑफर’ सादर करत आहे. अशाप्रकारे, घर शोधत असलेल्या लोकांजवळ या फेस्टिव्हल दरम्यान आपले घर शोधण्याची आणि ते खरेदी करण्याची रास्त कारणे आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.