Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडिया अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक वेलनेस प्रोग्राम

 एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडिया अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक वेलनेस प्रोग्राम यांच्यासह मुंबईतील आयव्हीएफ क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार

 

उद्योगातील आघाडीच्या फर्टिलिटी शृंखलेने लाइव्ह योग सत्रे, तज्ञांचे वेबिनार आणि निवडक रुग्णांसाठी तिच्या अत्याधुनिक एम्ब्रयोलॉजी प्रयोगशाळेच्या फिजिकल टूर्स यांच्यासह अनोखा, विनामूल्य-क्सेस डिजिटल अनुभव उपलब्ध करवून दिला आहे

 

मुंबई, ३ सप्टेंबर २०२५: देशातील आघाडीची आयव्हीएफ आणि फर्टिलिटी उपचार संस्था, एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडियाने आज एका नवीन वेबसाइटसह फ्री-टू-ऍक्सेस फिजिटल अनुभवांचा एक अभिनव संच लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. आयव्हीएफ आणि फर्टिलिटी उपचारांच्या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर भावी पालकांना मदत करण्यासाठी प्रत्यक्ष आणि डिजिटल अनुभवांचे संयोजन करून, आपल्या देशात प्रजनन देखभाल क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी हे व्यापक व्यासपीठ डिझाइन केले आहे.





 

या क्लिनिकमध्ये दर शनिवारी निवडक जोडप्यांसाठी मोफत प्रयोगशाळा भेटी आयोजित केल्या जातात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्यातील गर्भांचे संरक्षण करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम श्रेणीतील प्रक्रिया समोरासमोर पाहता येतात. गर्भ ट्रॅकिंग आणि आयडेंटिफिकेशन क्लिनिकच्या आरआय विटनेस टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने केलेले हे शैक्षणिक दौरे आयव्हीएफ प्रक्रियेचे रहस्य उलगडतील आणि भावी पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतील. अंडी संकलन आणि हस्तांतरणापासून गर्भ पुनर्प्राप्तीपर्यंतच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यात अभूतपूर्व सुरक्षा, निर्जंतुकीकरण करून हाताळणी आणि अचूकता प्रदर्शित केली जाईल. ही तांत्रिक अचूकता, सखोल आणि सर्वसमावेशक वैद्यकीय कौशल्ये आणि व्यापक रुग्णसेवा दृष्टिकोन या क्लिनिक्सची ओळख आहे. या क्लिनिक शृंखलेने देशभरात सातत्याने सर्वाधिक लाईव्ह जन्मदर प्रदान करून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

 

या लॉन्चच्या वेळी बोलताना, एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडियाच्या रीजनल हेड श्रीमती गुरसिमरन कौर म्हणाल्या, “स्थापनेपासूनच, एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडियाने रुग्ण-प्रथम दृष्टिकोनासह स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे, जे जागतिक दर्जाच्या प्रजनन देखभालीची उपलब्धता सर्वांना मिळवून देण्याच्या आमच्या व्यापक ध्येयाचे द्योतक आहे. आमच्या नवीन वेबसाइटचे लाँचिंग हे त्या दृष्टिकोनाची पूर्तता करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. पालकत्व हा जोडप्यांसाठी एक कठीण, गुंतागुंतीचा निर्णय असू शकतो आणि आम्ही ते अधिक सुलभ आणि परवडणारे बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो. आम्ही केवळ वैद्यकीय आणि देखभाल सेवा देत नाही, तर प्रजनन उपचारांसाठी समर्थन, शिक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची संपूर्ण इकोसिस्टिम उपलब्ध करवून देत आहोत. आमचे ध्येय, ज्ञानातील तफावत दूर करणे आणि त्यांच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर भावी पालकांना हाताशी धरून विश्वास निर्माण करणे, त्यांच्यापैकी अधिकाधिकांना त्यांना आवश्यक असलेल्या आणि पात्र असलेल्या प्रजनन काळजीसाठी निवड करण्यास प्रोत्साहित करणे हे आहे.”

 

पालकत्व कठीण आणि गुंतागुंतीचे असते ही भावना दूर करून, भारतातील जोडप्यांसाठी तज्ञांमार्फत प्रजनन काळजी अधिक सुलभ, परवडणारी आणि अनुरूप बनवण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे पाऊल एक महत्त्वपूर्ण प्रगती दर्शविते. या अनोख्या अनुभवाचा एक भाग म्हणून, एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडिया दर शनिवारी लाईव्ह ऑनलाइन प्रजनन योग सत्रे आयोजित करेल. सर्व सहभागींसाठी मोफत उपलब्ध असलेले हे सत्र सौम्य आसने, श्वास घेण्याची तंत्रे आणि ध्यान पद्धतींवर लक्ष केंद्रित करेल, जे प्रजनन आरोग्य वाढविण्यासाठी आणि भावनिक आणि शारीरिक कल्याणासाठी हे महत्त्वाचे ठरेल. याला पूरक म्हणून दर शुक्रवारी आयव्हीएफ तज्ञांसह मोफत तज्ञ वेबिनार असतील, ज्यामुळे नवीन रुग्णांना पारंपारिक खर्च किंवा जटिलतेच्या अडथळ्यांशिवाय प्रजनन देखभालीबद्दलच्या त्यांच्या शंका आणि प्रश्नांबद्दल आघाडीच्या तज्ञांशी संपर्क साधता येईल.

 

मोफत सेवांबरोबरीनेच, एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडियाने केवळ १,१९९ पासून सुरू होणारे व्यापक कपल फर्टिलिटी स्क्रीनिंग पॅकेजेस देखील प्रस्तुत केली आहेत, जेणेकरून आर्थिक अडथळे जोडप्यांना आवश्यक निदान सेवांचा लाभ घेण्यापासून कधीही रोखणार नाहीत. एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडियाच्या व्यापक सेवांबद्दल अधिक माहितीसाठी, https://artfertilityclinics.in/ ला भेट द्या किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @artfertilityclinicsindia ला फॉलो करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.