विन्झोने भारतातील पहिल्या ट्रान्समीडिया प्लॅटफॉर्मवरील मायक्रोड्रामासाठी बालाजी टेलिफिल्म्ससोबत विशेष सहयोग केला, त्यांची लायब्ररी ५०० हून अधिक मायक्रोड्रामा शीर्षकांपर्यंत वाढली
● विन्झो मोबाइल-केंद्रित विश्वासाठी कथानकाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे, ज्यामध्ये २-मिनिट गेम्स, २-मिनिट स्टोरीज आणि ऑडिओ ड्रामांचा समावेश आहे.
● बालाजी टेलिफिल्म्स ऑनबोर्ड येण्यासह सिनेमॅटिक कथानकामध्ये भारतातील सर्वात मोठ्या परस्परसंवादात्मक मनोरंजन प्लॅटफॉर्मच्या क्षमतेची भर झाली आहे.
नोव्हेंबर १३, २०२५: विन्झो या भारतातील २५० दशलक्ष वापरकर्ते असलेल्या सर्वात मोठ्या परस्परसंवादात्मक मनोरंजन प्लॅटफॉर्मने आज बालाजी टेलिफिल्म्ससोबत महत्त्वपूर्ण सहयोगाची घोषणा केली. या सहयोगांतर्गत भारतातील पहिली ट्रान्समीडिया युनिव्हर्स, सर्जनशील परिसंस्था निर्माण करण्यात येईल, जेथे कथानक, गेम्स व पात्र विनासायासपणे स्वरूपांसोबत पुढे जातात. आपले मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्म झेडओ टीव्हीच्या लॉंचच्या अवघ्या तीन महिन्यांमध्ये विन्झोने जागतिक स्तरावर संपादित किंवा भारतात संचालित ५०० शीर्षकांचा टप्पा पार केला आहे, ज्यासह शॉर्ट-फॉर्मेट मनोरंजन क्षेत्रात झपाट्याने कन्टेन्टचा विस्तार झाला आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा भारताला २६ बिलियन अमेरिकन डॉलर्स शॉर्ट-ड्रामा उद्योगाच्या जागतिक मंचावर प्रबळपणे स्थापित करतो, जी जगभरातील झपाट्याने विकतसित होणारी सर्जनशील श्रेणी आहे.
कंपनी १०० हून अधिक गेम्सचे प्रकाशन व वितरण करण्यामधील, ७५,००० कन्टेन्ट क्रिएटर्सचा दृढ समुदाय तयार करण्यामधील आणि भारत व यूएस सारख्या प्रसिद्ध बाजारपेठांमध्ये २५० दशलक्ष वापरकर्त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यामधील यशस्वी वारसाचा फायदा घेत आहे, तसेच ब्राझील सारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये अल्पावधीत प्लॅटफॉर्मवर १०० दशलक्षहून अधिक एपिसोड्स पाहण्यात आले आहेत, ज्यासह नवीन सर्जनशील अर्थव्यवस्था नव्या उंचीवर पोहोचत आहे, जेथे मनोरंजन, तंत्रज्ञान व संस्कृती एकत्र येतात.
जागतिक स्तरावर मायक्रोड्रामाने बाजारपेठ आकार, वापरकर्ता वर्ग, मोबाइल अॅप डाऊनलोड्स व कन्टेन्ट निर्मितीमध्ये मोठी वाढ केली आहे. जागतिक शॉर्ट-ड्रामा उद्योग २०२५ मधील १२ बिलियन अमेरिकन डॉलर्सवरून २०३० पर्यंत २६ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जागतिक ट्रान्समीडिया फ्रँचायझी तयार करण्यासाठी भारताने मायक्रोड्रामा स्वरूपामध्ये चित्रपट स्तराचे कन्टेन्ट निर्माण करण्याची गरज आहे. विन्झोचा बालाजी टेलिफिल्म्ससोबत विशेष दीर्घकालीन सहयोगाचा हे ध्येय साध्य करण्याचा मनसुबा आहे. भारतीय टेलिव्हिजन व स्ट्रीमिंग कन्टेन्टला नव्या उंचीवर घेऊन गेलेला स्टुडिओ बालाजी टेलिफिल्म्सने सिनेमॅटिक दर्जा व सांस्कृतिक सखोलतेसह प्रीमियम मायक्रोड्रामांची निर्मिती करण्यासाठी विन्झोसोबत सहयोग केला आहे, जे भारतीय व जागतिक प्रेक्षकांसाठी डिझाइन करण्यात येतील.
''आम्ही भारतासाठी जगातील पहिले ट्रान्समीडिया प्लॅटफॉर्म डिझाइन करत आहोत, जेथे गेम्स, कथानक व इतर डिजिटल अनुभवांचे मनोरंजन मिळेल. हे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही सहयोग व गुंतवणूक करत आहोत, ज्यामुळे संपूर्ण सर्जनशील परिसंस्था एकत्र येईल,'' असे विन्झोचे सह-संस्थापक पावन नंदा म्हणाले. ''मायक्रोड्रामा भावी जागतिक अग्रणी आहे. बालाजी टेलिफिल्म्ससोबत आमचा धोरणात्मक सहयोग सर्वोत्त्म कथाकार व सर्वोत्तम तंत्रज्ञानाला एकत्र आणत वास्तविक, संबंधित कथानक निर्माण करतो, जे भारत व संपूर्ण जगाशी संलग्न होतात. आम्हाला या सहयोगाच्या माध्मयातून आमच्या २५० दशलक्षहून अधिक नोंदणीकृत वापरकर्तावर्गासाठी कथानक सादर करण्याचा आनंद होत आहे.''
बालाजी टेलिफिम्स लि.च्या व्यवस्थापकीय संचालक एकता कपूर म्हणाल्या, ''बालाजीचा नेहमी विश्वास आहे की कथानक काळासह बदलले पाहिजे. टेलिव्हिजनपासून डिजिटलपर्यंत आणि आता मायक्रोड्रामापर्यंत आमच्या प्रवासाला सर्वत्र प्रेक्षकांशी दृढपणे संलग्न होण्यासाठी नाविनयता व महत्त्वाकांक्षेद्वारे चालना मिळाली आहे. विन्झोसोबत या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही मायक्रोड्रामा तयार करत आहोत, ज्यामधून भारतातील विकसित होत असलेली डिजिटल संस्कृती दिसून येते.''
बालाजी टेलिफिल्म्सचे सीआरओ नितीन बर्मन म्हणाले, ''आज प्रेक्षक लघु स्वरूपाती कन्टेन्ट पाहण्याचा आनंद घेत आहेत, पण अजूनही भावना, ड्रामा व संबंधाचे मनोरंजन मिळण्याची मागणी करत आहेत, जे बालाजीच्या कथानकाचे आधारस्तंभ आहेत. विन्झोसोबत हा सहयोग सर्जनशीलता व तंत्रज्ञानाचे प्रबळ संयोजन आहे, जेथे तंत्रज्ञान पोहोच वाढवते आणि कथानक अधिक परस्परसंवादात्म्क व सर्वसमावेशक बनते.''
विन्झोचा श्रेणीमध्ये सर्जनशील परिवर्तन घडवून आणण्याचा मनसुबा आहे, ज्यासाठी दर्जात्मक लेखन, अस्सल पात्र आणि खोलवर रूजलेल्या सांस्कृतिक कथानकांवर लक्ष केंद्रित करत आहे, जे भारताच्या कथानक दर्जाचे जतन करतात, तसेच जागतिक ट्रान्समीडिया फ्रँचायझीसाठी पाया रचतात. कंपनी वर्कशॉप्स, क्रिएटर अॅक्सेलेटर्स, तसेच वेव्ह्ज फिल्म बझार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाने (एमआयबी) आयोजित केलेले इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (आयएफएफआय) अशा मार्की स्वरूपांमध्ये उद्योग सहयोगांच्या माध्यमातून भारतातील कथाकारांच्या भावी पिढीमध्ये देखील गुंतवणूक करत आहे. या उपक्रमांचा क्रिएटर्सच्या नवीन लाटेला निपुण करण्याचा मनसुबा आहे, जे ट्रान्समीडियामधील त्यांचे पहिले पाऊल म्हणून मायक्रोड्रामाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताच्या कथा सांगतील.

