३५०० हून अधिक सहभागींसह ‘मुंबईहॅक्स २०२५’ चे यशस्वी आयोजन
~ जगातील सर्वात मोठी एजेंटिक एआय हॅकेथॉन बनली ~
मुंबई, ७ डिसेंबर २०२५: मुंबईतील नेस्को येथे इतिहास रचण्यात आला. टेक आंत्रेप्रीन्युअर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीईएएम) आणि शहरातील तंत्रज्ञान परिसंस्था प्रबळ करण्याचा मनसुबा असलेला ना-नफा तत्त्वावर आधारित उपक्रम मेड इन मुंबई यांनी मुंबईहॅक्स २०२५ चे आयोजन केले. स्वत:चा विक्रम मोडून काढत हा इव्हेण्ट जागतिक स्तरावर सर्वात मोठा एजेंटिक एआय हॅकेथॉन बनला आहे. या इव्हेण्टची व्याप्ती व महत्त्वाकांक्षेमधून भारतातील एआय इनोव्हेशन हब म्हणून मुंबईचा वाढता दर्जा दिसून आला. आघाडीची जागतिक तंत्रज्ञान कंपनी एचसीएलटेकने हा इव्हेण्ट सादर केला होता.
नाविन्यतेला नव्या उंचीवर नेलेल्या तीन विजेत्या टीम्समध्ये १ कोटी रूपयांचे रोख पारितोषिक आणि रिवॉर्ड्स विभागण्यात आले. दर्शन खापेकर, श्रावणी रासम, आदिल शाल व अल्फिया सिद्दीक (हेल्थटेक); हिमांशू शर्मा व हेमिश जैन (फिनटेक); आणि सेजल चौधरी, सुप्रिया नायक, शांभवी पाटील व आकृती सिंग (मिसइन्फॉर्मेशन) यांचा सर्व महिलांचा समूह. हे सर्व त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये अपवादात्मक कौशल्य दाखवत आहेत.
या दोन-दिवसीय उत्साहवर्धक इव्हेण्टमध्ये एचसीएलटेक टायटल स्पॉन्सर होते, तर बँकिंग सहयोगी आयडीएफसी फर्स्ट बँकेने त्यांचे एमडी व सीईओ श्री. वैद्यनाथन यांच्या नेतृत्वांतर्गत आपली सक्रिय भूमिका दाखवली. ३,५०० हून अधिक नवप्रवर्तक, तसेच ९०० महिलांच्या उल्लेखनीय समूहाने (२७ टक्के सहभागी) या इव्हेण्टमध्ये सहभाग घेतला, जेथे त्यांनी एआयच्या मर्यादांना दूर करण्याचा, तसेच फिनटेक, हेल्थटेक व मिसइन्फॉर्मेशन डिटेक्शन या तीन ट्रॅक्समध्ये उल्लेखनीय सोल्यूशन्स शोधण्याचा प्रयत्न केला. या इव्हेण्टमध्ये प्रेरणेची भर करत उद्योगांमधील उद्योजकांनी मार्गदर्शकांची भूमिका बजावली, दिवसरात्र सहभागींना प्रशिक्षित केले, तज्ञ मार्गदर्शन व पाठिंबा दिला आणि फायनालिस्ट्सना शॉर्टलिस्ट करण्यामध्ये मदत केली.
तंत्रज्ञानामध्ये महिलांसाठी नवीन महत्त्वपूर्ण टप्पा स्थापित करत मुंबईतील सर्व महिला असलेल्या टीमने मिसइन्फॉर्मेशन ट्रॅकमध्ये विजय मिळवला, ज्यामधून भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचे वाढते नेतृत्व दिसून येते. या उल्लेखनीय इव्हेण्टने निदर्शनास आणले की¸ भारतातील हुशार व्यक्तींना एका दृष्टिकोनासह एकत्र आणले तर अशक्य देखील शक्य होते आणि तो दृष्टिकोन म्हणजे तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडवून आणणे.
इव्हेण्टमध्ये निर्णायक क्षण ठरलेल्या अनपेक्षित पुढाकारामध्ये आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एमडी व सीईओ श्री. वैद्यनाथन सहभागींची आवड व पुढाकार पाहून प्रभावित झाले आणि त्यांनी स्वत: मंचावरच टॉप १०० टीम्सना प्रति सदस्य ३,००० रुपयांचे व्हाउचर देण्याची घोषणा केली. या पुरस्काराने टॉप १० टक्के सहभागींना प्रशंसित केले, ज्यामधून इव्हेण्टचा स्पर्धात्मक उत्साह आणि नाविन्यतेला चालना देण्यासोबत तंत्रज्ञान उद्योजकांच्या भावी पिढीला पाठिंबा देण्याप्रती आयडीएफसी फर्स्ट बँकेची दृढ कटिबद्धता दिसून येते.
''मुंबईहॅक्स हॅकेथॉनमधून चळवळीमध्ये बदलली आहे, जी भारतातील एआय राजधानी म्हणून मुंबईच्या ओळखला आकार देत आहे,'' असे आयोजक विवेक खेमानी म्हणाले. ''सर्वात मोठा एजेंटिक एआय इव्हेण्ट, तसेच वास्तविक विश्वातील आव्हानांचे निराकरण करणारे सोल्यूशन्स निर्माण करणाऱ्या अपवादात्मक टॅलेंटना पाहून नाविन्यता प्रगत होणारी परिसंस्था घडवण्याप्रती आमचे मिशन अधिक प्रबळ झाले आहे. आमचे नेक्स्ट-जनरेशन टेक प्रोफेशनल्स निश्चितच जागतिक ट्रेलब्लेझर्स बनण्यास सज्ज आहेत. सर्व विजेत्यांचे त्यांच्या दूरदर्शी सोल्यूशन्ससाठी अभिनंदन.''
