भारतामध्ये २६५ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद: सेक्यूराइट
~ हे प्रमाण दैनंदिन ७.२७ लाख आणि प्रतिमिनिट ५०५ हल्ल्यांच्या बरोबरीचे ~
मुंबई, ५ डिसेंबर २०२५: जागतिक सायबरसुरक्षा सोल्यूशन्स प्रदाता क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडची उद्योग शाखा सेक्यूराइटने इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ प्रकाशित केला असून अहवालानुसार भारतात तब्बल २६५.५२ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद झाली आहे.
ऑक्टोबर २०२४ व सप्टेंबर २०२५ दरम्यान सेक्यूराइट लॅब्सने ८ दशलक्षहून अधिक एंडपॉइण्ट्सचे विश्लेषण केले आणि २६५.५२ दशलक्ष डिटेक्शन्सची नोंद केली. हे प्रमाण दैनंदिन ७,२७,००० हून अधिक डिटेक्शन्स आणि दर मिनिटाला ५०५ डिटेक्शन्स इतके आहे. या परिसंस्थेमध्ये ट्रोजन्स व फाइल इन्फेक्टर्सचे प्रमाण सर्वाधिक आहे, जेथे ८.४ दशलक्ष ट्रोजन डिटेक्शन्स आणि ७१.१ दशलक्ष फाइल इन्फेक्टर डिटेक्शन्सची नोंद करण्यात आली. भारतातील कंपन्यांवर झालेल्या एकूण हल्ल्यांपैकी एकत्रित त्यांचे ७० टक्के प्रमाण आहे.
नेक्स्ट जनेरशन अॅण्टीव्हायरस (एनजीएव्ही) आणि अॅण्टी रॅन्समवेअर (एआरडब्ल्यू) इंजिन्सनी ३४ दशलक्षहून अधिक असामान्य क्रियाकलापांना ओळखले. जानेवारी २०२५ मध्ये १८५ घटना आणि ११३,००० डिटेक्शन्ससह रॅन्समवेअर क्रियाकलाप सर्वोच्च होते. क्रिप्टोजॅकिंग डिटेक्शन्स ६.५ दशलक्षपर्यंत पोहोचले. नेटवर्क-आधारित घटना ९.२ दशलक्षपर्यंत पोहोचल्या, जेथे वर्डप्रेस प्लगइन्स, अपाचे टॉमकॅट आणि सिसएड सिस्टम्समध्ये तडजोड करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला.
प्रदेशानुसार महाराष्ट्र (३६.१ दशलक्ष डिटेक्शन्स), गुजरात (२४.१ दशलक्ष) आणि दिल्ली (१५.४ दशलक्ष) सर्वाधिक प्रभावित राज्ये ठरली, ज्यामध्ये मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकाता सर्वात जास्त लक्ष्यित शहरे होती. उद्योगासंदर्भात शिक्षण, आरोग्यसेवा आणि उत्पादन क्षेत्रांचे एकत्रितपणे सर्व डिटेक्शन्समध्ये ४७ टक्के प्रमाण होते, ज्यामधून त्यामधील गांभीर्य आणि संसाधने मर्यादित असल्याचे दिसून येते, ज्यामुळे ते मोठ्या प्रमाणात हल्ल्यांना बळी पडतात.
आजची सायबर जोखीम क्षेत्राची गंभीर स्थिती आणि कार्यसंचालनामध्ये अडथळा आल्यामुळे प्रत्येक वेळी व्यवसायांना होणारे मोठे आर्थिक नुकसान पाहता सेक्यूराइटने दोन अत्याधुनिक एंटरप्राइज-ग्रेड उपाय लॉन्च केले असून डिजिटल रिस्क प्रोटेक्शन सर्विसेस हे एआय–एमएल आधारित ब्रँड सुरक्षा, डार्क वेब मॉनिटरिंग आणि डिजिटल जोखीम व्यवस्थापन सक्षम करते तर रॅन्समवेअर रिकव्हरी अॅज अ सर्विस हे हे तज्ज्ञ-नेतृत्वित, फॉरेन्सिक-ग्रेड समाधान असून उल्लंघन आणि पुनर्स्थापनादरम्यानची महत्त्वपूर्ण दरी प्रभावीपणे भरून काढते. त्याची प्रमाणित प्रक्रिया पुनर्घटनेचा धोका कमी करते आणि संस्थांना कोणत्याही लपलेल्या जोखमीशिवाय त्यांच्या कार्यपद्धती आत्मविश्वासाने पुन्हा सुरू करण्यास सक्षम बनवते.
क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर म्हणाले, ''आज भारतातील सायबर सुरक्षा क्षेत्र महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे, जेथे अनपेक्षित जोखीमांचा सामना करत आहे. इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ चा धोरणकर्ते, उद्योग व नागरिकांना इंटेलिजन्स देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे ते सर्वसमावेशक जोखीम ओळखू शकतील आणि सक्रिय सायबर सुरक्षा पद्धतींचा अवलंब करू शकतील.”
ते पुढे म्हणाले “लाँच करण्यात आलेले सेक्यूराइट डीआरपीएस कंपन्या फायरवॉल्स व पांरपारिक सुरक्षिततेच्या पलीकडे त्यांची सुरक्षितता अधिक वाढवण्यास सक्षम करेल, जेथे ब्रँड प्रतिष्ठा, डेटा प्रामाणिकपणा व ग्राहक विश्वासाची सतत परीक्षा होत आहे. आम्ही सेक्यूराइट आरआरएएएस देखील लाँच करत आहोत, जे रॅन्समवेअर रिकव्हरीला समस्यांच्या व्यवस्थापनावरून संरचित, तज्ञ-नेतृत्वित ऑपरेशन्समध्ये बदलते, ज्यामुळे रॅन्समवर अवलंबून राहावे लागत नाही. हे उपक्रम कंपन्यांना अत्याधुनिक टूल्स व माहितीसह सुसज्ज करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला प्रबळ करतात, ज्यामुळे कंपन्या आपल्या डिजिटल मालमत्तांचे संरक्षण करू शकतात, विश्वास कायम ठेवू शकतात आणि झपाट्याने वाढत असलेल्या जोखीम वातावरणामध्ये ऑपरेशनल स्थिरता राखू शकतात.''
भारताचे डिजिटल विस्तारीकरण, क्लाऊड अवलंबन आणि मोठ्या वापरकर्तावर्गामुळे रॅन्समवेअर सिंडीकेट्स, सरकारशी संलग्न असल्याचे खोटे दावे करणारे हल्लेखोर आणि सायबरगुन्हेगार समूहांचे प्रमाण वाढत आहे. ऑपरेशन सिंदूर सारख्या सायबरअॅटॅक मोहिममांमधून आर्थिक, राजकीय व विचाराशी संबंधित उद्देशांनी केल्या जाणाऱ्या हायब्रिड हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येते.
