Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्नेहल तरडे यांची ऑस्ट्रेलियात स्काय डायव्हिंग

 *ऑस्ट्रेलियात स्नेहल तरडेंची महिलादिनानिमित्त १५ हजार फुटांवरून उडी! व्हिडिओ व्हायरल* 


मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री या नेहमीच अभिनयासह अनेक आवडीच्या गोष्टी करताना दिसतात. असंच काहीसं धाडसी पाऊल उचललं आहे अभिनेत्री स्नेहल प्रविण तरडे यांनी! सध्या त्या ऑस्ट्रेलियाची सफर करत आहेत आणि ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये त्यांनी स्काय डायव्हिंग केलं आहे. त्यांच्या स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.



जागतिक महिला दिनानिमित्त काहीतरी हटके करण्यासाठी स्नेहल तरडे व त्यांच्या मैत्रिणींनी सिंडनीमध्ये तब्बल १५ हजार फुटांवरून उडी मारत स्काय डायव्हिंग केले आहे. त्यांच्यासह अनिता पाटील आणि रूपाली पवार या त्यांच्या मैत्रिणींनीही स्काय डायव्हिंगचा थरार अनुभवला. ‘आम्ही आई जिजाऊच्या लेकी आहोत, १५ हजार फुटावरून काय, ३० हजार फुटावरूनही उडी मारू शकतो... मी उडी मारणार... जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र!’ असं म्हणत स्नेहल स्काय डायव्हिंगसाठी सज्ज झाल्या आणि तब्बल १५ हजार फुटांवरून त्यांनी उडी मारली. त्यांच्या स्काय डायव्हिंगच्या व्हिडिओमध्ये त्या मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. कोणतीही भिती न बाळगता त्यांनी बिनधास्त उडी मारली अन् महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा केला.  




स्नेहल तरडे अलीकडेच मु. पोस्ट धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात झळकल्या होत्या. त्या नेहमीच दर्जेदार भूमिका साकारताना दिसतात.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.