Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्यातून तसेच नोतणदास रियल्टि द्वारे वांद्रे वेस्ट येथे आर्ट इंस्टॉलेशन

 बीएमसीच्या सहकार्यातुन आणि नोतनदास रियल्टी द्वारे वांद्रे वेस्ट येथे आर्ट इनस्टॉलेशन


विनायक विसपुते, दिया मिर्झा आणि हर्ष जगवानी यांची प्रमुख उपस्थिती




मुंबई, ----  नोतनदास रियल्टी हे आज मुंबईतील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून ९ मार्च २०२३ रोजी वांद्रे वेस्टच्या पाली नाका येथे एका आर्ट इन्स्टॉलेशनचे अनावरण केले. या खास कार्यक्रमासाठी विनायक विसपुते, दिया मिर्झा आणि हर्ष जगवानी यांच्यासोबतच वाहबिझ दोराबजी आणि फिरोजा दोराबजी यासारखे अन्य मान्यवरही उपस्थित होते.


या खास प्रसंगी बोलतांना नोतनदास रियल्टीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्ष जगवानी म्हणाले, “ या सुंदर आर्ट इन्स्टॉलेशनचे अनावरण करत असताना समाज्याप्रती असलेली आमची बांधिलकी ही आम्ही निर्माण केलेल्या संरचनांच्या पेक्षाही किततरी पर अधिक मोठी आहे ही गोष्ट विसरता कामा नये. लोकांना प्रेरीत करणारी एक खास जागा निर्माण करणे हा या मागिल खरा उद्येश्य आहे. आमचा हा सीएसआर उपक्रम हा आमच्या विश्वासाचा ,सकारात्मक बदलांचा आणि चांगल्या सामाजिक प्रभावासाठी करण्यात आलेल्या एका खास उभारणीचा पाया आहे. आम्ही ज्या समाज्याची सेवा करतो त्यांच्यासाठी समर्पणाचे प्रतीक म्हणून आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावन्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणुन या कलाकृतीची उभारणी केली जात आहे."



भारतीय आणि स्पॅनिश संस्कृतींच्या एकत्रीकरणासाठी ओळखल्या जाणार्‍या अष्टपैलू कलाकार संगीता बाबानी यांनी याची रचना केली आहे. दक्षिणपूर्व स्पेनमध्ये बालपण घालवलेल्या संगीताने यापूर्वी लंडन, पॅरिस आणि दुबईमधील शोसह मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर गॅलरीत देखील दोनदा आपले चित्रप्रदर्शन केले आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी टाटा मोटर्स, बीएमडब्ल्यू, जीप आणि मर्सिडीज-बेंझ मधील उद्योगपतींसोबत देखील काम केले आहे.


नोतनदास रियल्टी हे प्रख्यात रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत, जवळपास दोन दशकांपूर्वी  नोतनदास फाईन ज्वेलरीचे महेश जगवानी यांनी लक्झरी लिव्हिंग उद्योगात प्रवेश करत आपला कार्यविस्तार करण्याचा प्रयत्न केला .आज  त्यांचा हा ब्रँड त्यांच्या नाविन्यपूर्ण डिझाईनसाठी, अखंड ग्राहक सेवेसाठी आणि अतूट वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे रिअल इस्टेटचे काही प्रकल्प मुंबईच्या जवळील व सर्वाधिक पसंत केल्या जाणार्या आणि मुंबईपासुन खुप जवळच्या परिसरात पहावयास मिळतात.  


नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, नोतनदास रियल्टीचे व्यवस्थापकीय संचालक हर्ष जगवानी यांनी त्यांचा उद्योजकीय प्रवास, रिअल इस्टेट उद्योगामध्ये होणारा डिजिटायझेशनचा परिणाम  आणि ब्रँड वाढीच्या आणि विस्तारासाठीच्या धोरणांविषयी चर्चा केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.