प्राजक्ता माळीने लुटला आंब्याच्या हंगामाचा आनंद
मुंबई. : महाराष्ट्राची स्माईल क्वीन आणि मराठी चित्रपट व मालिकांतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी तिचा यावर्षीच्या आंब्याच्या मूडमध्ये शिरत स्वतःला ताजेतवाने करताना दिसत आहे. कट्टर आंबाप्रेमी प्राजक्ता दरवर्षी आंब्याच्या मोसमाची वाट पाहत असते आणि पिकलेल्या, ताज्या, पौष्टिक अशा हापूस आंब्यांची हौस भागवित असते. आंब्याच्या सवयींबद्दल काटेकोर असलेल्या प्राजक्ताने गेल्या दोन वर्षांप्रमाणे या वर्षीही किसान - कनेक्ट करीत भारतातील एका सर्वात मोठ्या आंबा महोत्सवातून, रत्नागिरी व देवगडच्या शेतकऱ्यांच्या बागेतून ऑनलाईनच्या एका क्लीकवर ताजे, रासायनिक द्रव्ये न वापरलेले आणि सुरक्षितपणे हाताळलेले आंबे मागवून परिवारासह आंब्याचा हंगाम सुरू केला.
प्राजक्ता तिच्या आरोग्यदायी आहाराच्या सवयींशी कधीही तडजोड करीत नाही. आंब्यांच्या बाबतीतील तिच्या या ‘चूझी’ सवयींमुळेच आपल्याला कायम रसाळ आणि पौष्टिक आंब्यांचा स्वाद चाखता येतो, असे तिचे म्हणणे आहे. यावर्षी आणखी एक वेगळी गोष्ट प्राजक्ताला करता आली, ती म्हणजे आपण खात असलेले आवडीचे हापूस आंबे कुठल्या शेतातून आले, रत्नागिरी व देवगडचे ते आंबा उत्पादक कोण, त्या आंब्यात किती पोषणमूल्य आहेत इत्यादी सगळी माहिती तिने जी आय् टॅगिंग असलेल्या आंब्यांमधून मिळविली. “माझ्यासाठी हा दुहेरी आनंदच आहे. चविष्ट आणि ताज्या आंब्याचा आस्वाद घेताना, हे आंबे कोठून आले हे देखील मला कळले. असे अस्सल आंब्याचे क्षण हे अनमोलच! या नवीन गोष्टींचे मी खरोखरच कौतुक करते,” प्राजक्ता म्हणाली.
प्राजक्ताने आंबाप्रेमींनाही जी आय् टॅगिंग केलेले, उत्तम गुणवत्तेचे आंबे घ्यावेत हे सिक्रेटही सांगितले. "यावर्षी माझ्या आवडत्या हापूस व्यतिरिक्त मी केसर, लालबाग आणि लंगडा इत्यादी प्रकारचे आंबेही चाखून पाहणार आहे,” असेही ती पुढे म्हणाली.