Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" सत्यशोधक " चित्रपटाच्या टिझरचे मा . शरदचंद्र जी पवार यांच्या कडून कौतुक

 *"सत्यशोधक" चित्रपटाच्या टीझरचे मा. शरदचंद्रजी पवार यांच्याकडून कौतुक*


*मा. शरदचंद्रजी पवार यांनी "सत्यशोधक" चित्रपटाला दिल्या शुभेच्छा* 


 महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, समता फिल्म्स प्रस्तुत महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित "सत्यशोधक" या आगामी चित्रपटाच्या टीमने मा. शरदचंद्रजी पवार यांची पुण्यात भेट घेतली. 




याप्रसंगी भारती विद्यापीठाचे प्र कुलगुरू मा. डॉ. विश्वजित कदम, चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर,  विशाल वाहुरवाघ तसेच लेखक आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांच्यासह चित्रपटातील कलाकार मोनिका तायडे आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. जेष्ठ मार्गदर्शक मा. बाळासाहेब बांगर, मा. हनुमंत माळी,बाबासाहेब पाटील, कार्यकारी निर्माता शिवा बागुल हे उपस्थित होते. या वेळी शिवा बागुल यांनी चित्रपट विषयी माहिती दिली, तसेच निर्माते आप्पा बोराटे यांनी चित्रपट बनवण्यासाठी केलेला प्रवास व चित्रपट प्रदर्शनाविषयी माहिती दिली. त्यानंतर चित्रपटाचा टिझर सर्वांना दाखविण्यात आला.

 

याप्रसंगी पवार साहेबांनी मनोगत व्यक्त करताना, महात्मा फुलेंच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांची आठवण करून दिली. नव्या विज्ञान युगात महात्मा फुले यांनी त्याकाळी मांडलेले विचार किती महत्त्वाचे आहेत याची माहिती दिली. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर चित्रपट येतोय म्हणून त्यांनी आनंद व्यक्त केला व भविष्यात या चित्रपटाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देत त्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.



निर्माते प्रवीण तायडे यांनी "सत्यशोधक" हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.