मुंबईत ‘हेल्थ ऑन व्हील्स’ उपक्रमाचा शुभारंभ
~ आजाराचे घरबसल्या वेळीच निदान होण्याची व सक्रिय देखभालीची हमी ~
मुंबई, २९ एप्रिल २०२५: घरच्याघरी निदानात्मक सेवा पुरविणारी भारतातील अग्रगण्य कंपनी हेल्दियन्सने (Healthians) मुंबईमध्ये आपल्या बहुप्रतिक्षित ‘हेल्थ ऑन व्हील्स’ उपक्रमाचा शुभारंभ केला असून सहजप्राप्त, घरच्याघरी उपलब्ध होणारी निदानात्मक सेवा शहरभरातील नागरिकांच्या समीप आणून ठेवली आहे. अंधेरीतील कल्प निसर्ग सहकारी गृहनिर्माण सोसायटी व त्यापाठोपाठ पाम कॉम्प्लेक्स आणि सर्वोदय लीला येथून या मोफत आरोग्य शिबिरांची सुरुवात झाली असून येत्या आठवड्यांमध्ये अशाच अनेक निवासी संकुलांमध्ये ही शिबिरे घेतली जाणार आहेत.
सकाळी ७:०० ते दुपारी ३:०० या वेळेत रहिवाशांना विनामूल्य रक्तदाब (बीपी), बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि ईसीजी स्क्रिनिंग्ज करून घेता येणार आहेत व त्याचबरोबर वैयक्तिकृत तपासणीपूर्व व तपासणीनंतरचा स्वास्थ्य सल्लाही मिळणार आहे. निवडक रक्तचाचण्याही केल्या जाणार आहेत व त्यासाठी शिबिरातच रक्ताचे नमुने जमा करण्याची सुविधा असणार आहे किंवा (फास्टिंगची गरज असल्यास) त्यासाठी नंतरची वेळ दिली जाणार आहे. आरोग्यावर सक्रियपणे देखरेख ठेवण्याच्या सवयीचा पुरस्कार करण्यासाठी हेल्दियन्सकडून सर्वसमावेशक पॅकेजेसवर खास ७० टक्क्यांची सूटही दिली जात आहे – ही सवलत केवळ शिबिराला उपस्थित असलेल्या व्यक्तींनाच मिळू शकणार आहे.
महाराष्ट्रामध्ये जीवनशैलीशी निगडित दीर्घकालीन आजार व सहव्याधींचे प्रमाण वाढत असताना उच्च दर्जाच्या, तंत्रज्ञान सुसज्ज आरोग्य सेवा थेट निवासी संकुलांमध्ये पोहोचवित लवकरात लवकर केलेले निदान आणि प्रतिबंधात्मक निदान यांच्यातील दरी सांधण्याचे हेल्दियन्सचे लक्ष्य आहे.
हेल्दियन्सचे संस्थापक आणि सीईओ दीपक साहनी म्हणाले, "चांगल्या आरोग्याची सुरुवात सजगतेपासून होते, मात्र वेळच्यावेळी निदान करून देणाऱ्या सुविधांची उपलब्धता ही माणसांना त्यांच्या स्वास्थ्याची सूत्रे खऱ्या अर्थाने आपल्या हाती घेण्याचे बळ देते. हेल्थ ऑन व्हील्सच्या साथीने आम्ही आरोग्यसेवा उपलब्ध, सहजप्राप्य व सक्रिय बनवित आहोत, जेणेकरून प्रतिबंधात्मक तपासण्या आपल्या दररोजच्या जगण्याचा भाग बनतील, याची काळजी घेतली जाईल.”
सध्या दिल्ली एनसीआर भागामध्ये दर महिन्याला १४-२० आरोग्य शिबिरांसह कार्यरत असलेल्या हेल्दियन्सने मुंबईत केलेला आपला कार्यविस्तार हा प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याची १० वर्षे वाढविण्याच्या हेल्दियन्सच्या मोहिमेतील एक नवा अध्याय सुरू करणारा आहे. मुंबईच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्यक्रमाची व्याप्ती वाढत असताना, पुढील टप्प्यांमध्ये सुरू होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या सबस्क्रिप्शनवर आधारित ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीत नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या अधिक सखोल कार्यक्रमांचा शोध घेतला जाणार आहे.