Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*सूर्या, शिवा, लीला आणि वसुचा लग्नानंतरचा पहिला दिवाळसण !*



 

*मनोरंजनाची दिन दिन दिवाळी* 

*सूर्या, शिवा, लीला आणि वसुचा लग्नानंतरचा पहिला दिवाळसण !*



झी मराठीवर *२९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर होणार मनोरंजनाची ‘दिन दिन दिवाळी’* ' *लाखात एक आमचा दादा'*  मालिकेत नियतीने जोडलेल्या नात्यामध्ये प्रेम फुलणार, यंदाची दिवाळी सूर्या आणि तुळजासाठी प्रेममयी असणार. डॅडी, सूर्याला, घरी बोलावतात, सगळे तणावात आहेत की डॅडीनी अचानक सगळ्यांना का बोलावलं असेल ? दुसरीकडे  दिवाळीच्या तयारीला सुरुवात झालेय. बहिणी सूर्याला दिवाळीसाठी काय काय हवं सांगतात. सूर्या सगळ्यांसाठी काहीतरी गिफ्ट आणतो.  पण  स्वतःसाठी काहीच आणत नाहीत. हे बघून बहिणी भावूक होतात.  


 

*'शिवा'* मालिकेत शिवा आणि आशु एकत्र चार्टर्ड फ्लाइटमधून प्रवास करतात. तिथेच शिवाने आशूसाठी प्रपोज प्लान केलंय. शिवाची ही अनपेक्षित कृती पाहून आशु थक्क होतो. तो आपल्या भावना सांगणार इतक्यात, आशूला फॅक्ट्री मधून येतो. कामगारांना  दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे ते संप पुकारतात, ज्याने शिवा आणि आशु मुंबईला परतावं लागत. शिवा, आशु देसाई कुटुंबाच्या रक्षणासाठी पाऊल उचलतात. ते कामगारांना आश्वासन देतात की ते या घोटाळ्याचा शोध घेऊन दोषीला पकडतील.



*'पुन्हा कर्तव्य आहे'* मध्ये पार्टीच्या वेळेस लकी वसूला सांगतो की आज रात्री तिला त्याच्या बेडरूममध्ये यायचे आहे. वसु त्याच्या खोलीत  जाणार, पण लकीला धडा शिकवायला. याचा  राग येऊन लकी वसूला सांगतो की ही दिवाळी ठाकूर कुटुंबासाठी नरक असेल. वसु ही लकीला आव्हान देते की एका आठवड्यात तू घराबाहेर असशील. काय असेल वसुंधराचा हा नवीन प्लन. 

 


*'नवरी मिळे हिटलरला'* मालिकेत सरोजिनी लीलाला एजे आणि अंतरा यांच्या कॉलेजच्या दिवसांची गोष्ट सांगते, की एजेने कॉलेजमध्ये अंतराला कसं प्रपोज केलं होतं. सरोजिनीच्या गोष्टीने लीला भारावून जाते. आता लीला सासू म्हणून पुन्हा घरात येणार. लीला २.० आल्यामुळे दिवाळीत सुनांची कशी तारांबळ उडणार  ज्यामुळे एजे आश्चर्यचकित होणार. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, एजे लीलाचं मन जिंकण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलणार आणि स्वतःहून तिच्या गळ्यात मंगळसूत्र परत घालणार आहे. 

 

*तेव्हा बघायला विसरू नका मनोरंजनाची ‘दिन दिन दिवाळी’ फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.