*"२०२१ ची दिवाळी माझ्या आठवणीतली सर्वात आवडती दिवाळी"- तितिक्षा तावडे*
*"दिवाळी फराळामध्ये मी लाडू सारखी आहे"- तितिक्षा तावडे*
प्रेक्षकांची लाडकी नेत्रा म्हणजेच *तितिक्षा तावडे* हिने दिवाळीच्या खास आठवणी आणि ती कोणत्या फटाक्या आणि फराळासारखी आहे हे सांगितलं, "माझ्या भाच्यासोबतची आठवण आहे दिवाळीची. जी नेहमी माझ्या स्मरणात राहणार, माझ्या भाच्याचा म्हणजे राघवचा जन्म २ नोव्हेंबरचा आहे. *तेव्हा २०२१ ला मी लंडनला शूटिंग करत होते* आणि त्याच दिवशी मी भारतात परत यायला निघाले होते आणि मला ही गुड न्यूज मिळाली. त्याचा जन्म धनत्रयोदशीचा आहे. ती आमच्या परिवाराची सर्वात खास दिवाळी आहे. दिवाळीत मी फटाक्या आणि फराळ सारखी आहे याच उत्तर मी रॉकेट सारखी आहे असं म्हणेन कारण मला उंच उडायला आणि प्रगतीशील राहायला आवडत. रॉकेट फक्त जे आसपास आहेत त्यांनाच आनंद देत नाही तर ते लांबवर कुणी आकाशात पाहत असेल त्याला ही तितकाच आनंद देतो. माझं ही तसंच आहे. फराळ म्हणाल तर मी लाडू सारखी आहे एकदम चवीला ही गोड माझा स्वभाव ही माझा तसा गोडच आहे."
दिवाळीत ही आवर्जून वेळ काढून बघायला विसरू नका *'सातव्या मुलीची सातवी मुलगी'* दररोज रात्री १०:३० वा. फक्त झी मराठीवर.