Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबईतील अपघातातग्रस्त चार वर्षीय अनन्या पेडणेकरला इम्पॅक्ट गुरु फंडरेझरद्वारे मिळाली मदत

 मुंबईतील अपघातातग्रस्त चार वर्षीय अनन्या पेडणेकरला इम्पॅक्ट गुरु फंडरेझरद्वारे मिळाली मदत


~ ४८ तासांत २० लाखांहून अधिक रक्कम गोळा केली ~


मुंबई, १३ नोव्हेंबर २०२४: पाम बीच रोडवर ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातात ४ वर्षीय अनन्या पेडणेकर गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक इंटेंसिव्ह केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत. पाम बीच रोडवर ड्राईव्ह आपल्या आई वडिलांसह प्रवास करत असताना त्यांच्या रेनो क्विडला मागून एका वेगवान महिंद्रा थार एसयूव्हीने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की अनन्याचे वडील मनीष पेडणेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर आई स्नेहा आणि अनन्या गंभीर जखमी झाले.




या दु:खद प्रसंगानंतर अनन्याची मावशी समता गवड यांनी तिच्या उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी इम्पॅक्ट गुरुवर एक फंडरेझिंग मोहिम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. या मोहिमेला दयाळू दात्यांचा असाधारण प्रतिसाद मिळाला असून केवळ दोन दिवसांत ५७२ दयाळू दात्यांनी २० लाखांहून अधिकचे योगदान दिले आहे. यामुळे संकटाच्या काळात सामुदायिक पाठिंब्याचा प्रभाव दिसून आला. या मोहिमेत गोळा केलेल्या रकमेचा अधिकतम वापर सुनिश्चित करण्यासाठी अपोलो हॉस्पिटलने सर्व फंडरेझिंग शुल्क माफ केले आहेत. दान केलेला प्रत्येक रुपया अनन्याच्या उपचारांसाठी वापरण्यात येईल.  


अनन्याची वैद्यकीय स्थिती अद्याप गंभीर आहे. तिच्या जबड्याची एक मोठी शस्त्रक्रिया झाली आहे आणि पुढील काही आठवड्यांत तिला आणखी काही शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांचा अंदाज आहे की तिची स्थिती स्थिर होण्यासाठी आणि तिच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी तिला किमान एक महिना पीआयसीयू मध्ये राहावे लागेल. दरम्यान स्नेहावर डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल, नेरुळ येथे उपचार सुरु आहे.

या मोहिमेच्या यशस्वी समाप्तीमुळे इम्पॅक्ट गुरु केवळ उदार योगदानांचा उत्सव साजरा करत नाही तर गरजवेळी सामूहिक प्रयत्नांची ताकद देखील दर्शवतो. गोळा केलेली रक्कम अनन्याच्या चालू असलेल्या वैद्यकीय खर्चांना महत्त्वपूर्ण सहाय्य देईल आणि या कठीण काळात तिच्या कुटुंबाला आवश्यक मदत प्रदान करेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.