Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*केदारच सत्य सर्वांसमोर येणार !*

*केदारच सत्य सर्वांसमोर येणार !*



*'सातव्या मुलीची सातवी मुलगी'* मध्ये नेत्रा केदारच्या विरोधात उभी न राहता शेखरला पाठिंबा देते, यामुळे अद्वैत गोंधळलाय. केदार केतकीला मनवून कुटुंबात फूट पाडण्याचा आणि वारंवार मैथिलीला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पण नेत्रा आणि ईशा त्याचे हे प्रयत्न हाणून पाडतात. केदार अद्वैत आणि शेखरमध्ये सुद्धा भांडण लावण्याचा प्रयत्न करतो. इकडे पण नेत्रा त्याचे डाव उधळून लावते. केदार ईशाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करतो, पण चुकून रीमाला यात गोवतो. या सगळ्याचा दोष बंटी नेत्रावर ठेवतो, ज्यामुळे तिच्या आणि रीमामध्ये ताण वाढतो. केतकी नेत्रावर मत्सर करण्याचा आरोप करते आणि अद्वैतला केदारला कंपनीचा सीईओ बनवण्यास प्रवृत्त करते. नेत्रा केदारला इशारा देते, पण केदार तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो.


 नेत्राला केदारच्या खोट्या लंगडण्याचा पर्दाफाश करण्यासाठी ईशाची मदत त्याला पळायला भाग पाडते. ज्यामुळे केदारचं खोटं सगळ्यांसमोर येतं. अखेर अद्वैत आणि इंद्राणीला नेत्राच म्हणणं पटत. आता कंपनी केदारच्या ताब्यात असल्यामुळे अद्वैतला आपली जागा परत मिळवण्यासाठी त्यांच्याकडे एकच पर्याय आहे ते म्हणजे तेजस आणि फाल्गुनीला परत आणणं.



*अद्वैत, तेजस आणि फाल्गुनीला परत आणू आणेल? काय असेल केदारचा नवीन प्लॅन ? बघायला विसरू नका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' दररोज रात्री १०:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.