रोजगार संधी आणि वेतन वाढीत बंगळुर शीर्ष स्थानी
~ मुंबई, पुण्यातील सरासरी वेतन क्रमशः २५,१०० आणि २४,७०० रुपये ~
बंगळूर पाठोपाठ चेन्नई आणि दिल्लीचा क्रमांक येतो. येथे अनुक्रमे ७.५% आणि ७.३% इतकी मजबूत पगार वाढ आहे. यामधून या रोजगार बाजारपेठांचे स्पर्धात्मक स्वरूप दिसून येते. चेन्नईमधील सरासरी मासिक वेतन २४,५०० रुपये असून दिल्लीत ते २७,८०० रुपये इतके आहे.
मुंबई आणि अहमदाबाद येथे देखील स्थिर वेतनवाढ दिसून आली ज्यामधून प्रमुख रोजगार केंद्रे म्हणून त्यांचे महत्व पक्के होते. मुंबईतील सरासरी वेतन २५,१०० रुपये आहे तर पुण्याचे सरासरी वेतन २४,७०० रुपये असून त्यांनी आपली स्पर्धात्मक वेतन पातळी सांभाळली आहे. या शहरांमध्ये वेतनवाढ ४% ते १०% या श्रेणीत आहे.
उद्योग आघाडीवर ८.४% वेतनवाढीसह सर्वश्रेष्ठ कामगिरी ‘रिटेल’ने केली आहे. हाच कल कन्झ्युमर ड्यूरेबल्स (५.२%) आणि बँकिंग आणि इतर सेवांमध्येही (५.१%) दिसून येतो तसेच या दोन्हींत व्यावसायिकांसाठी वृद्धीच्या दमदार संधी दिसत आहेत. दुसरीकडे, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि फार्मा, बांधकाम आणि रियल इस्टेट यांसारख्या क्षेत्रांत सामान्य वृद्धी दिसली आहे, जी कुशल व्यावसायिकांसाठीची त्यांची स्थिर मागणी दाखवते. सर्वाधिक वेतन देणाऱ्या उद्योगांमध्ये टेलिकम्युनिकेशन्स (२९,२०० रुपये), उत्पादन, इंजिनियरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर (२८,२०० रुपये), हेल्थकेअर आणि फार्मा (२७,६०० रुपये) आणि बांधकाम आणि रियल इस्टेट (२७,००० रुपये) यांचा समावेश आहे.