Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबईत स्टेडफास्ट न्यूट्रिशन प्रो शो आणि अमॅच्युर ऑलंपियाचे यशस्वी आयोजन

 मुंबईत स्टेडफास्ट न्यूट्रिशन प्रो शो आणि अमॅच्युर ऑलंपियाचे यशस्वी आयोजन

~ १५० आंतरराष्ट्रीय स्पर्धक; ४,००० हुन अधिक ऍथलिट्सचा सहभाग ~


मुंबई, २२ डिसेंबर २०२४: आशिया खंडातील सर्वात मोठी आरोग्य आणि फिटनेस स्पर्धा इंटरनॅशनल आरोग्य, क्रीडा आणि फिटनेस फेस्टिवल (आयएचएफएफ) २० ते २२ डिसेंबर दरम्यान मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये पार पडले. यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप स्टेडफास्ट न्यूट्रिशन प्रो शो आणि शौकीन ऍथलिट्ससाठी भारतातील सर्वात मोठी बॉडीबिल्डिंग टूर्नामेंट अमॅच्युर ऑलंपिया या दोन प्रमुख स्पर्धांचा समावेश होता. या दोन्ही स्पर्धांना भारतातील दिग्गज स्पोर्ट्स आणि वेलनेस न्यूट्रिशन ब्रँड स्टेडफास्ट न्यूट्रिशनने प्रायोजकत्व लाभले होते. स्टेडफास्ट न्यूट्रिशन प्रो शो आणि अमॅच्युअर ऑलंपिया जगभरामध्ये बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपसाठीची गव्हर्निंग बॉडी इंटरनॅशनल फिटनेस अँड बॉडीबिल्डिंग फेडरेशन (आयएफबीबी) अंतर्गत आयोजित केले गेले.


गेल्या पाच वर्षांपासून स्टेडफास्ट न्यूट्रिशनआयएचएफएफचा एक महत्त्वाचा सहयोगी आहे. या ब्रँडने भारतातील फिटनेस उद्योगाला अतिशय आवश्यक असलेले प्रोत्साहन दिले आहे आणि भारतीय बॉडीबिल्डिंग ऍथलिट्ससाठी सर्वात मोठ्या जागतिक मंचावर स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. प्रो शो जिंकणाऱ्या ऍथलिट्सना जगातील सर्वात प्रतिष्ठित बॉडीबिल्डिंग स्पर्धा, मिस्टर ऑलंपिया यूएसएमध्ये थेट प्रवेश मिळतो. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात १५० आंतरराष्ट्रीय स्पर्धक, ८०,००० दर्शक आणि उद्योगक्षेत्रातील दिग्गजांसह ४,००० हुन जास्त ऍथलिट्स सहभागी झाले. २०० पेक्षा जास्त प्रदर्शक असलेले हे जगातील सर्वात मोठे आरोग्य, क्रीडा आणि फिटनेस एक्स्पो ठरले.




स्टेडफास्ट न्यूट्रिशनचे संस्थापक श्री अमन पुरी यांनी सांगितले, "भारत क्रीडा प्रतिभांचे पॉवर हाऊस आहे. या टुर्नामेंट्सना सहकार्य करून आम्ही जागतिक स्तरावर भारतीय ऍथलिट्सच्या यशासाठी एक सुस्पष्ट रोडमॅप बनवू इच्छितो, त्यांच्यासाठी जिंकणे ही एक सवय बनवू इच्छितो आणि भारतीय बॉडीबिल्डिंगला जागतिक मानकांपर्यंत नेऊ इच्छितो. २०४० पर्यंत भारत जगाची क्रीडा राजधानी बनावा या आमच्या दृष्टिकोनाला अनुरूप हे पाऊल उचलण्यात आले आहे. २०२२ मध्ये प्रो शो सुरु करणाऱ्या देशाचा पहिला आणि एकमेव ब्रँड म्हणून स्टेडफास्टने भारतीय ऍथलिट्ससाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप - मिस्टर ऑलंपिया यूएसएमध्ये प्रवेश मिळवण्याचा मार्ग खुला केला आहे. त्यांना तिथे जिंकण्याची, पुरस्काराची रक्कम, आंतरराष्ट्रीय मान्यता आणि आकर्षक प्रायोजकत्व मिळवण्याची अनोखी संधी मिळाली आहे. अरनॉल्ड श्वार्जनेगर, फिल हेल्थ आणि डेक्स्टर जॅक्सन यासारख्या दिग्गजांनी याच मंचावर आपले लिजंडरी स्टेटस मजबूत केले आहे."


त्यांनी पुढे सांगितले, "अमॅच्युर ऑलंपिया शौकीन ऍथलिट्ससाठी भारतातील सर्वात मोठी बॉडीबिल्डिंग स्पर्धा ठरली. फिटनेससाठी उत्साही आणि शौकीन याठिकाणी एकत्र आले आणि त्यांना जागतिक एक्स्पोजर मिळाले. या शौकिनांना प्रो कार्ड मिळवण्याची, जीवन बदलवून टाकणारी संधी मिळते, यामुळे ते स्पॉन्सरशिप, पुरस्कार रक्कम आणि शानदार करियरच्या रोमांचक संधींसह व्यावसायिक क्षेत्रात पुढे जातात."

स्टेडफास्ट न्यूट्रिशन प्रो शोमध्ये चार विजेते त्यांच्या संबंधित श्रेणींमध्ये निवडले गेले: पुरुषांची फिजिक, पुरुषांसाठी क्लासिक फिजिक, महिलांसाठी बिकिनी आणि २१२ बॉडीबिल्डिंग. ग्रँड फिनाले २२ डिसेंबरला पार पडला. अमॅच्युअर ऑलंपियामध्ये २५ आयएफबीबी प्रो कार्ड्स दिले गेले.

आयएचएफएफचा उद्देश फिटनेसमध्ये तज्ञ, नेटवर्किंग आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीचा केंद्रबिंदू बनणे हा आहे, त्यामुळे हा फिटनेस आणि न्यूट्रास्युटिकल उद्योगक्षेत्रातील लोकांसाठी एक आवश्यक कार्यक्रम बनला आहे. प्रो शो आणि अमॅच्युअर ऑलंपियाव्यतिरिक्त, या वर्षीच्या आयएचएफएफमध्ये पॉवरलिफ्टिंग, प्रो पंजा आणि झुम्बासहित अनेक इतर स्पर्धा देखील आयोजित केल्या गेल्या. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.