*जगातील सर्वात आकर्षक पक्ष्यांना नामशेष होण्यापासून वाचविण्याच्या उद्दिष्टाने मिंटेज वर्ल्डतर्फे 'एन्डेंजर्ड पॅरट्स ऑफ द वर्ल्ड ऑन स्टॅम्प्स, कॉइन्स अँड बँकनोट्स' हे कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित*
*मुंबई, 25 नोव्हेंबर २०२४ :* मिंटाज वर्ल्ड हे जगातील पहिले ऑनलाइन वस्तुसंग्रहालय असून या ठिकाणी आधुनिक नाणी, स्टँप्स, चलनातील नोटा यांचा संग्रह आहे. त्यांच्यातर्फे 'एन्डेंजर्ड पॅरट्स ऑफ द वर्ल्ड ऑन स्टॅम्प्स, कॉइन्स अँड बँकनोट्स' या कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण संकलनाच्या माध्यमातून पोपटांच्या चैतन्यमय सौंदर्याचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या सर्वांच्या आवडत्या पक्ष्यांचे संवर्धन करण्यात येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकाची किंमत केवळ ₹९९९ आहे आणि हे पुस्तक ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर आणि बुकस्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. www.mintageworld.com या त्यांच्या वेबसाइटवरूनही हे पुस्तक विकत घेता येऊ शकते.
या पुस्तकात विविध देशांनी जारी केलेली नाणी, टपाल तिकिटे आणि चलनी नोटांचे अत्यंत दुर्मीळ व चोखंदळपणे निवडलेला संग्रह समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे जगातील सर्वात संकटग्रस्त आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पोपटांच्या प्रजाती दर्शविण्यात आल्या आहेत. आययूसीएन रेड लिस्ट ऑफ थ्रेटन्ड स्पिशीजमधील (जुलै 2024) अद्ययावत माहितीनुसार या पुस्तकात पोपटांच्या वारशाचा आणि विविधतेचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच, त्यांचे संवर्धन करण्याची तातडीची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
पोपट संवर्धनाचा दृश्य आणि माहितीपूर्ण प्रवास
या पुस्तकात ४५९ टपाल तिकिटे, ३७ नाणी आणि १२ चलनी नोटांचा समृद्ध दृश्य अनुभव मिळतो. हे प्रत्येक तिकीट, नाणे आणि नोट पोपटाच्या जगभरातील विविध प्रजाती दर्शवते. यामध्ये डॉमिनिकामधील दुर्मिळ इंपीरियल अॅमेझॉन, आफ्रिकन ग्रे पोपट, फिलीपिन्सचा कॉकटू आणि ब्राझीलमधील लिअर्स मकाव यांचा समावेश आहे. प्रत्येक तिकिट, नाणे आणि नोटेसोबत सविस्तर ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती दिली आहे. त्यामुळे हा संग्रह पक्षीप्रेमी आणि संग्राहकांसाठी एक कलात्मक आणि मौल्यवान माहितीसाधन आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून जागरुकता
"एंडेंजर्ड पॅरट्स ऑफ द वर्ल्ड" हा केवळ संग्रह नसून पोपटांना भेडसावणाऱ्या गंभीर धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचे प्रभावी साधन आहे. बेकायदेशीर पाळीव प्राण्यांचा व्यापार, जंगलतोड, हवामान बदल आणि अधिवास नष्ट होणे यांसारख्या समस्यांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकात पोपटांच्या प्रजाती पाच मुख्य गटांमध्ये वर्गीकृत केल्या आहेत— नामशेष (EX), नामशेष होण्याचा अतिगंभीर धोका असलेले (CR), नामशेष होण्याचा धोका असलेले (EN), संकटग्रस्त (VU), आणि जवळपास संकटग्रस्त (NT). त्यामुळे, हे पक्षी धोक्याच्या कोणत्या पातळीवर आहेत, हे वाचकांना स्पष्टपणे समजते.
पक्षी वारशाचा गौरव
या पुस्तकातील टपाल तिकिटे, नाणी आणि चलनी नोटा केवळ संग्रहणीय वस्तू नसून, आपला पक्षी वारसा जतन करण्यासाठी केलेल्या जगभरात करण्यात आलेल्या प्रयत्नांचे द्योतक आहेत. चांदी, निकेल, सोने, तांबे आणि कांस्य या धातूंमध्ये तयार केलेली नाण्यांमध्ये पोपटाच्या विविध प्रजातींच्या अधिवासांचे आणि वैशिष्ट्यांचे बारकावे अचूकपणे दाखविण्यात आले आहेत. टपाल तिकिटांचे चमकदार रंग आणि नाजूक तपशीलांमध्ये या पक्ष्यांचे सौंदर्य कैद करण्यात आले आहे, तर चलनी नोटांमध्ये जैवविविधतेचे महत्त्व आणि जगभरातर्फे पक्षी संवर्धनासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे महत्त्व दिसून येते.
मिंटेज वर्ल्डचे दूरदृष्टी असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे आजीव सदस्य श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी या प्रकल्पाबद्दल आपले विचार व्यक्त केले : “भारतात प्राचीन ग्रंथ, चित्रकला, महाकाव्ये आणि लोककथांमधून पोपटांना विशेष स्थान मिळाले आहे. वन्यजीवनाविषयीच्या माझ्या आजीव प्रेमातून संकटग्रस्त पोपटांच्या जगाचा अभ्यास करण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची चालना मला मिळाली आहे. या पक्ष्यांच्या दुर्लक्षित कथा जगभरात शोधून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. विशेषतः त्यांच्या बेकायदेशीर व्यापाराच्या धक्कादायक वास्तवावरही प्रकाश टाकला आहे. हे पुस्तक केवळ एक संग्रह नाही, तर पोपटांसंदर्भातील आव्हानांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मनापासून केलेले एक मिशन आहे. यासाठी मिंटेज वर्ल्डच्या कथाकथन क्षमतेसह माझ्या निसर्गप्रेमाची सांगड मी घातली आहे. या पुस्तकाद्वारे या सुंदर पक्ष्यांचा गौरव करण्याचे आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हा संग्रह दीर्घ काळापासून तयार करण्यात येत आहे आणि प्रत्येक तपशील अचूक आणि विश्वसनीय असल्याची खात्री करण्यात आली आहे.”
आगामी काळात मिंटेज वर्ल्डतर्फे विविध संग्रहणीय वस्तू सादर करणार आहे. यामध्ये प्रसिद्ध ऐतिहासिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वे, राजकीय नेते, स्मारके, प्राणी, पक्षी, फुले, क्रीडा, सण, महत्त्वाचे घटनाक्रम यावर आधारित टपाल तिकिटे, नाणी आणि चलनी नोटांचा समावेश असेल.
सप्टेंबर २०२२मध्ये, मिंटेज वर्ल्डने "ग्लोबल कलेक्टिबल्स ऑफ महात्मा गांधी थ्रू बँक नोट्स, कॉइन्स अँड स्टॅम्प्स" नावाचे एक वेगळे कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित केले. १५ ऑगस्ट १९४८पासून आजपर्यंत १४४ देशांनी गांधीजींवर जारी केलेल्या विविध टपाल तिकिटे, नाणी आणि चलनी नोटांचे प्रदर्शन आणि माहिती देणारे हे जगातील एकमेव पुस्तक आहे.
www.mintageworld.com : मिंटेज वर्ल्ड हे प्राचीन आणि आधुनिक नाणी, टपाल तिकिटे आणि चलनी नोटांसाठीचे जगातील पहिले ऑनलाइन संग्रहालय आहे. आधुनिक जगातील तरुण आणि प्रौढ पिढीला नाणी, चलनी नोटा आणि टपाल तिकिटे गोळा करण्याच्या आनंदाचा नव्याने परिचय करून देण्यासाठी हे संग्रहालय सुरू करण्यात आले. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत तसेच जगाचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, परंपरा आणि संस्कृतीविषयी माहिती देणारे हे एक प्रभावी व्यासपीठ आहे. या ऑनलाइन संग्रहालयात नाणी, टपाल तिकिटे आणि चलनी नोटांचा तपशीलवार कॅटलॉग एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे दुर्मिळ आणि मौल्यवान माहिती सहज मिळते. नाणी, टपाल तिकिटे आणि चलनी नोटांविषयीची माहिती आणि ज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे तसेच या क्षेत्रातील जागतिक अद्ययावत घडामोडी सर्वांसाठी पोहोचवणे, हे या उपक्रमाचे एकमेव उद्दिष्ट आहे. सध्या, मिंटेज वर्ल्डच्या वेबसाइटवर १,२५,५००हून अधिक नाणी, ७,३०० टपाल तिकिटे आणि ३,००० चलनी नोटांची सविस्तर आणि वर्गीकृत माहिती तसेच त्यांचा व्हर्च्युअल अनुभव मिळतो. भारत आणि जगभरातील या संग्रहाचा आनंद घेण्यासोबतच, युझर्स मिंटेज वर्ल्डच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून नाणी, टपाल तिकिटे आणि चलनी नोटा खरेदी करू शकतात. तसेच, आपल्या मौल्यवान संग्रहाचे दीर्घकाळ संरक्षण करण्यासाठी, टिकाऊ अॅक्सेसरीजसुद्धा खरेदी करता येतात. यामध्ये आकर्षक केसेस, रिंग बाइंडर्स, प्लास्टिक शीट्स आणि इतर अॅक्सेसरीजचा समावेश आहे. त्यामुळे तुमच्या मेहनतीने जमवलेला संग्रह वर्षानुवर्षे जतन होईल, याची खात्री होते.