Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ईजबझचा व्‍हीटीपी रिअॅल्‍टीला सहयोग

 ईजबझचा व्‍हीटीपी रिअॅल्‍टीला सहयोग

~ मालमत्ता बुकिंग संकलनांमध्‍ये ६० टक्‍के वाढीची नोंद केली ~

मुंबई, १६ डिसेंबर २०२४: ईजबझ या आघाडीच्‍या फुल-स्‍टॅक पेमेंट सोल्‍यूशन्‍स प्‍लॅटफॉर्मने व्‍हीटीपी रिअॅल्‍टीला त्‍यांची पेमेंट कार्यसंचालने सुव्‍यवस्थित करण्‍यास सक्षम केले आहे, ज्‍यामुळे ९० टक्‍क्‍यांहून अधिक पेमेंट यशस्‍वी दरांसह मालमत्ता बुकिंग संकलनांमध्‍ये ६० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे; ग्राहक चौकशीपासून मालमत्ता बुकिंग व पेमेंट्सपर्यंत भारतीय रिअल इस्‍टेटमध्‍ये मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन होत असताना व्‍हीटीपी रिअॅल्‍टीने ईजबझसोबत सहयोग केला आहे. 


ईजबझने व्‍हीटीपी रिअॅल्‍टीच्‍या सेल्‍सफोर्स सिस्‍टमसोबत विनासायास एकीकरणाच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या सर्वसमावेशक पेमेंट व सास सोल्‍यूशन्‍सची श्रेणी उपलब्‍ध करून दिली. ईजीकलेक्‍ट वैशिष्‍ट्याने बुकिंग्‍ज, एक्‍स्‍प्रेशन ऑफ इंटरेस्‍ट (ईओआय), मोठी पेमेंट्स, जीएसटी, मुद्रांक शुल्‍क व क्‍लबहाऊस शुल्‍क अशा विविध व्‍यवहारांसाठी पेमेंट्सच्‍या विनासायास संकलनाची खात्री घेतली. त्‍यांच्‍या ऑटोमेटेड व सुव्‍यवस्थित पेमेंट प्रक्रियांनी मॅन्‍युअल हस्‍तक्षेप कमी केले, मानवी त्रुटी कमी केल्‍या आणि कार्यक्षम प्रयत्‍नांमध्‍ये ७० टक्‍के घटसह समेट करण्‍याला गती दिली.   


पार्शियल पे वैशिष्‍ट्याने ग्राहकांना आंशिक पेमेंट्स करण्‍यास सक्षम केले, ज्‍यामुळे ग्राहक समाधान व सहभागामध्‍ये वाढ झाली. याव्‍यतिरिक्‍त, ईजबझने व्‍हीटीपी रिअॅल्‍टीच्‍या २३ प्रकल्‍पांसाठी कस्‍टमाइज केलेले अहवाल देखील दिले. तपशीलवार विश्‍लेषण व इनसाइट्ससह या अहवालांनी व्‍हीटीपीला प्रकल्‍प विक्री आणि एण्‍ड-टू-एण्‍ड आर्थिक कार्यसंचालनांवर उत्तमप्रकारे देखरेख ठेवण्‍यास मदत केली, ज्‍यामुळे अचूकपणे आर्थिक निर्णय घेता आले. ईजबझ प्‍लॅटफॉर्मने पीसीआय डीएसएस लेव्‍हल-१ अनुपालनासह पेमेंट व्‍यवहारांसाठी उच्‍च स्‍तरीय सुरक्षितता देखील दिली.




ईजबझचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी रोहित प्रसाद म्‍हणाले, ''व्‍हीटीपी रिअॅल्‍टीसोबतच्‍या आमच्‍या सहयोगामधून रिअल इस्‍टेट क्षेत्रासारख्‍या गुंतागूंतीच्‍या पेमेंट वातावरणांना सुव्‍यवस्थित करण्‍यासाठी डिजिटल सोल्‍यूशन्‍सची क्षमता दिसून येते. या क्षेत्राला अद्वितीय पेमेंट सोल्‍यूशन्‍सची गरज आहे, जे स्थिर पेमेंट संरचना, कस्‍टमायझेबल पेमेंट पेजेस्, व्‍यवहारानुसार सेटलमेंट्स आणि रिअल-टाइम समेटसह मल्‍टी-एन्टीटी अहवाल देतील. आम्‍हाला आनंद होत आहे की, आमच्‍या रिअल इस्‍टेट सॉफ्टवेअर सोल्‍यूशन्‍स स्‍टॅसह एम्‍बेडेड पेमेंट पायाभूत सुविधेने व्‍हीटीपी रिअॅल्‍टीला कार्यरत कार्यक्षमता वाढवण्‍यास आणि त्‍यांच्‍या ग्राहकांसाठी सुलभ व सुरक्षित मालमत्ता खरेदी अनुभव देण्‍यास मदत केली.''

 

व्‍हीटीपी रिअॅल्‍टीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सचिन भंडारी म्‍हणाले, ''आम्‍ही आम्‍हाला आमच्‍या पेमेंट प्रक्रियांसह मदत करणाऱ्या आणि विविध प्रकल्‍पांसाठी सानुकूल सेटलमेंट अहवालांची सुविधा देणाऱ्या पेमेंट सहयोगीचा शोध घेत होतो. ईजबझ टीमने त्‍यांच्‍या ईजीकलेक्‍ट, पार्शियल पे इत्‍यादी सारख्‍या पेमेंट सोल्‍यूशन्‍सच्‍या सर्वसमावेशक श्रेणीसह आमच्‍या पेमेंट प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सोप्‍या केल्‍या आहेत. आमचे क्‍लायण्‍ट्स आता बुकिंग्‍ज, माइलस्‍टोन्‍स, जीएसटी, मुद्रांक शुल्‍क किंवा क्‍लबहाऊस शुल्‍क यासाठी सुलभपणे पेमेंट्स करू शकतात. आम्‍हाला ईजबझ पेमेंट सोल्‍यूशन्‍सनी दिलेल्‍या निष्‍पत्तींचा आनंद होत आहे.''  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.