Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फेडएक्स सुपर किंग्जच्या प्रवासाला बळ देणार

 फेडएक्स सुपर किंग्जच्या प्रवासाला बळ देणार


मुंबई, २३ डिसेंबर २०२४: फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) साठी भारतात आणि जोहान्सबर्ग सुपर किंग्ज (जेएसके) साठी दक्षिण आफ्रिकेत ‘प्रमुख प्रयोजक’ आणि ‘ऑफिशियल लॉजिस्टिक्स पार्टनर’ म्हणून क्रिकेटमधील आपले जागतिक प्रायोजकत्व आज जाहीर केले.




फेडएक्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, इंटरनॅशनल आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, एअरलाइन- रिचर्ड स्मिथ, फेडएक्स मिडल ईस्ट, इंडियन सबकॉन्टिनेन्ट अँड आफ्रिकाचे अध्यक्ष कामी विश्वनाथन, चेन्नई सुपर किंग्जचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर के. एस. विश्वनाथन आणि चेन्नई सुपर किंग्जचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अंकित बालदी यांच्या उपस्थितीत एका समारंभात ही घोषणा करण्यात आली. ही घोषणा एका भागीदारीच्या शुभारंभाचे प्रतीक असून ही भागीदारी इंडियन प्रीमियर लीग आणि २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या साऊथआफ्रिका२० सीझनमध्येही जारी राहील.


फेडएक्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, इंटरनॅशनल आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, एअरलाइन- रिचर्ड स्मिथ म्हणाले, “कोणतेही खेळ भौगोलिक सीमांचे बंधन मानत नाहीत आणि पॅशन, लवचिकता, चिकाटी आणि सामाईक अनुभवांच्या माध्यमातून समुदायांना जोडतात. क्रिकेट हा तर भारताचा आत्मा आहे. या भागीदारीतून देशातील तसेच देशाबाहेरील व्यवसाय आणि व्यक्तींचा विकास आणि भरभराट यांना ऊर्जा देण्याची आमची वचनबद्धता दिसून येते.”


या भागीदारीचा एक भाग म्हणून फेडएक्सचा लोगो या टीमच्या जर्सीच्या मागील बाजूस ठळकपणे दिसेल. जो परफॉर्मन्स आणि विश्वसनीयता यावरील सामाईक फोकसचे प्रतीक आहे. सुपर किंग्जच्या खेळाडूंना आणि त्यांच्या किट्स, मॅचची उपकरणे आणि औपचारिक साहित्य कार्यक्षमतेने भारतातून जोहान्सबर्ग आणि US ला तसेच जगभरात इतरत्र पोहोचवण्यासाठी फेडएक्स आपल्या जागतिक नेटवर्कचा आणि प्रगत डिजिटल साधनांचा उपयोग करेल. हे प्रायोजकत्व फेडएक्स ब्रॅंड, टीमचे सदस्य, ग्राहक आणि समुदाय यांच्याशी जवळीक साधण्याची संधी देऊन क्रिकेटच्या माध्यमातून जागतिक प्रेक्षकांना समर्थन देण्याची आणि त्यांच्याशी संलग्न होण्याची फेडएक्सची वचनबद्धता अधिक बळकट करते.

फेडएक्स मिडल ईस्ट, इंडियन सबकॉन्टिनेन्ट अँड आफ्रिकाचे अध्यक्ष कामी विश्वनाथन अध्यक्ष कामी विश्वनाथन म्हणाले, “टीमवर्क, परफॉर्मन्स आणि प्रेरित करण्याची क्षमता यावर क्रिकेटची भरभराट होत असते. हे साध्य करणारी सीएसके म्हणूनच सर्वात मौल्यवान आयपीएल फ्रँचाईज आहे. सुपर किंग्जशी आम्ही केलेल्या भागीदारीतून उत्कृष्टतेची आणि मोठे होण्याची ही प्रेरणा दिसते, जी यशासाठी कारणीभूत ठरणारी परिवर्तनात्मक सोल्यूशन्स देण्यावरील आमच्या फोकसशी मिळती जुळती आहे. आम्ही दोघेही मैदानात आणि व्यापार व वाणिज्याच्या जगात नवनवीन मैलाचे दगड पार करण्याचा वारसा जपतो.”




चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ के. एस. विश्वनाथन म्हणाले, “फेडएक्सशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या चाहत्यांना उत्कृष्टता, विश्वसनीयता आणि सर्वोत्तम डिलिव्हर करण्याची वचनबद्धता ही सामाईक मूल्ये या भागीदारीतून प्रतिबिंबित होतात. फेडएक्सची जागतिक उपस्थिती आणि इनोव्हेशनबाबत असलेली फेडएक्सची ख्याती यामुळे ते सुपर किंग्जचे आदर्श पार्टनर ठरतात. आम्ही सुपर किंग्जची कहाणी नव्या क्षितिजावर घेऊन जाऊ! आम्ही एकत्र मिळून मैदानात आणि मैदानाबाहेर सुद्धा अविस्मरणीय क्षण देऊ अशी आशा आहे.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.