*टाटा मोटर्सने पंतनगरमध्ये कर्मचाऱ्यांच्या परिवहनासाठी इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवला, कार्बन न्यूट्रॅलिटीप्रती कटिबद्धता अधिक दृढ केली*
टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज उत्तराखंडमधील आपल्या पंतनगर प्लांट येथे कर्मचाऱ्यांच्या परिवहनासाठी समर्पित इलेक्ट्रिक बसेसच्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवला. या स्वदेशी निर्माण करण्यात आलेल्या शून्य-उत्सर्जन बसेसमध्ये आधुनिक वैशिष्ट्ये आहेत, तसेच प्रगत बॅटरी सिस्टम्सची शक्ती आहे. टाटा मोटर्सची पूर्णत: मालकीची उपकंपनी टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्यूशन्स लिमिटेड (टीएससीएमएसएल) टाटा अल्ट्रा ९ मीटर इलेक्ट्रिक बसेसच्या आधुनिक ताफ्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना प्रवास सेवा देईल.
सुरक्षित, आरामदायी व सुखकर प्रवास देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली ही ई-बस सेवा ५,००० हून अधिक व्यक्तींना शुद्ध व हरित परिवहन सुविधा देत कार्बन फूटप्रिंट कमी करेल, ज्यामुळे दरवर्षाला जवळपास १,१०० टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी होईल. १६ मेगावॅट सौरऊर्जा प्लांटमधून निर्मित वीज ई-बस ताफ्याला चार्ज करेल, ज्यामुळे एण्ड-टू-एण्डपासून संपूर्ण कार्यसंचालन हरित होईल.
या लाँचची घोषणा करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष व प्रमुख श्री. विशाल बादशाह म्हणाले, “प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक बसेसचे सादरीकरण २०४५ पर्यंत निव्वळ-शून्य ग्रीनहाऊस गॅस (जीएचजी) उत्सर्जन संपादित करण्याचा टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सचा मनसुबा पूर्ण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. आम्ही आमच्या सर्व उत्पादन केंद्रांच्या संपूर्ण मूल्य साखळीमध्ये म्हणजेच सोर्सिंगपासून विकासापर्यंत आणि रचनेपासून कार्यसंचालनांपर्यंत शाश्वततेला एकीकृत करत या केंद्रांना हरित करण्याप्रती कटिबद्ध आहोत. मला पंतनगरमध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम लाँच करण्याचा आनंद होत आहे, जो केंद्राच्या अनेक शाश्वतता उपक्रमांमध्ये अधिक भर करण्यासोबत त्यांच्या यशाला सन्मानित करतो. हा प्लांट प्रमाणित झीरो वेस्ट टू लँडफिल केंद्र आहे आणि सीआयआय-जीबीसीकडून वॉटर-पॉझिटिव्ह प्रमाणन देखील मिळाले आहे. लाँच करण्यात आलेली शन्यू उत्सर्जन, ई-फ्लीट सेवा प्लांटच्या शाश्वतता प्रवासामधील आणखी एक मोठा टप्पा आहे.''
फुल-इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेनची शक्ती असलेली टाटा अल्ट्रा ईव्ही ९ मीटर इलेक्ट्रिक बस रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम व इंटेलिजण्ट ट्रान्सपोर्ट सिस्टम्स अशा स्मार्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. भारतातील इलेक्ट्रिक मास मोबिलिटी सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सच्या उल्लेखनीय यशावर हा ताफा तैनात करण्यात आला आहे, जेथे कंपनीने आधीच १० शहरांमध्ये ३,१०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस तैनात केल्या आहेत. या बसेसनी एकूण २४ कोटी किलोमीटरहून अधिक प्रवास केला असून ९५ टक्क्याहून अधिक अपटाइम आहे, ज्यामधून टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक मास माबिलिटी सोल्यूशन्सची विश्वसनीयता आणि कार्यक्षमता दिसून येते.